Breaking News LIVE Updates: मी आज महाराष्ट्राचा निकाल सांगतो, महायुतीचं सरकार येणार - अमित शाह

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राजकीय प्रचाराचा चढलेला जोर, पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच अमित शाहांसहीत शरद पवार, उद्धव ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्यांच्या सभा आणि बरंच काही केवळ एका क्लिकवर...

Breaking News LIVE Updates: मी आज महाराष्ट्राचा निकाल सांगतो, महायुतीचं सरकार येणार - अमित शाह

12 Nov 2024, 19:38 वाजता

महायुतीचं सरकार येणार - अमित शाह 

मी आज महाराष्ट्राचा निकाल सांगतो, येथे महायुतीच सरकार येणार, महाविकास आघाडीचे सुपडासाफ होणार

खरगे यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना सांगितले वादा असे करा तो पूर्ण करू शकतो.

काँग्रेस अध्यक्ष यांनी दिलेली आश्वासनं त्यावर विश्वास नाही मग जनतेचा विश्वास कसा बसेल

पण मोदी यांची स्वत: गॅरंटी दिली आहे जनतेन पाहिले

आम्ही 370 हटवले, भारतात काश्मीर जोडण्याचं काम केलं. शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे सगळेजण विरोध करत राहिले. 370 हटवले तर रक्ताचे पाट वाहतील असं विरोधक म्हणत होते. 

12 Nov 2024, 18:48 वाजता

महाराष्ट्रातील सरकार पाडा, आमदारांना खरेदी करा असं संविधानात लिहिलं आहे का? - राहुल गांधी

आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी काँग्रेस नेते राहूल गांधी गोंदियात आले असता विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. संविधानात कुठे उल्लेख आहे की महाराष्ट्रातील सरकार पाडा. आमदारांना खरेदी करा असं संविधानात लिहिलं आहे का? तरी यांनी हे कृत्य केलं. त्यामुळे भाजपला संविधान संपवायचं आहे. असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे

12 Nov 2024, 17:31 वाजता

नितीन गडकरी यांच्याही बॅगची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासारशिरसी येथे आज महविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारानिमित्त हेलिकॉप्टरने आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बॅगची निवडणूक विभागाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आल्याची बातमी ताजी असतानाच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही बॅगची निवडणूक विभागाच्या पथकाने तपासणी केल्याची माहिती समोर आलीय. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी येथे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज हेलिकॉप्टरने किल्लारी येथे आले असता त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आलीय.

 

12 Nov 2024, 16:29 वाजता

- छगन भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या येवला मतदारसंघात शरद पवार दाखल 

- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सभेला सुरुवात 
 
- शरद पवार गटाचे उमेदवार माणिकराव शिंदेंच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन

12 Nov 2024, 15:42 वाजता

निवडणूक आयोगाला बॅगा तपासण्याचा अधिकार - प्रवीण दरेकर

उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ हा बालिशपणा आहे. उद्धव ठाकरेंनी सभ्यतेनं वागायला हवं . आता त्यांच्या हाती काहीही उरलेलं नाही. पैशांचे वाटप होऊ नये असं आयोगाला वाटत असेल. प्रलोभन देऊ नये यासाठी आयोग सतर्क दिसत आहे. आयोगाला काही संशय असेल त्यामुळे तपासणी केली असेल असं भाजपा नेते प्रवीण दरेरकर म्हणाले आहेत. 

12 Nov 2024, 14:35 वाजता

पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी! औसा हेलिपॅडवर घडला हा प्रकार

उद्धव ठाकरे धाराशीवला जात असताना पुन्हा एकदा त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. औसा येथील हेलीपॅडवर ही तपासणी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकरदेखील होते. काल जालना येथे दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती.

12 Nov 2024, 14:08 वाजता

रायगड: मध्यरात्री CM शिंदेंच्या पदाधिकाऱ्याची कार फोडली

रायगडच्या विळे गावात मध्यरात्री गाड्यांची तडफोड करण्यात आली. विळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवसेना शिंदे गटाचे गजानन मोहिते यांची गाडी अज्ञात इसमांनी फोडली. निजामपूर भागात शिवसेना विळे शाखेसमोर ही गाडी उभी होती. अज्ञात इसमांनी केलेल्या हल्ल्यात गाडीचे नुकसान झालंय. विरोधकांनी आपली गाडी फोडल्याचा आरोप मोहिते यांनी केलाय. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थानी रास्ता रोको केला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.

12 Nov 2024, 13:38 वाजता

जरांगेंचं मराठ्यांना आवाहन! म्हणाले, 'यांना सत्तेत येऊच...'

सामूहिक आमरण उपोषणाची तयारी सुरु करा असं सांगत जरांगे यांनी अंतरवालीसहीत संपुर्ण राज्यातील मराठे सामूहिक उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. निवडणूक झाल्यानंतर तारीख जाहीर करणार असल्याचं देखील जरांगे यांनी स्पष्ट केलं. यांना सत्तेत येऊच देऊ नका, असं आवाहन देखील जरांगे यांनी केलं आहे.

12 Nov 2024, 13:32 वाजता

मुख्यमंत्री शिंदे इतके हलके निघाले की...; आदित्य ठाकरेंचा टोला

'मला हल्क्यात घेतले म्हणून सरकार पाडले', या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रेवर आदित्य ठाकरेंनी खोचक प्रतिक्रिया नोंदवली आहे. "ते इतके हलके ते आहेत की वाहत सुरत आणि गुवाहाटीकडे गेले. फक्त हे आता मान्य केले की गद्दार लोकांनी  सरकार पाडले," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

12 Nov 2024, 12:08 वाजता

राहुल गांधींची चिखलीमधील सभा अचानक रद्द

राहुल गांधींची चिखलीची सभा रद्द झाली आहे. विमानात बिघाड झाल्यानं राहुल गांधी चिखली येथील सभा रद्द करावी लागल्याचं काँग्रेसने सांगितलं आहे. आता राहुल गांधी थेट गोंदिया इथल्या सभेला पोहोचणार आहेत.