Maharashtra Breaking News LIVE : ठाकुर्ली स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरमधे बिघाड, कल्याणला येणाऱ्या स्लो लोकल मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Breaking News LIVE: महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आज बैठक... जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होणार का?

Maharashtra Breaking News LIVE : ठाकुर्ली स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरमधे बिघाड, कल्याणला येणाऱ्या स्लो लोकल मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

1 Oct 2024, 18:20 वाजता

उद्या मुंबईत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा लाँग मार्च

उद्या मुंबईत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा लाँग मार्च आहे.महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमीत्त महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षांच्या दोन वेगवेगळ्या पदयात्रा असतील.काँग्रेसचा लॉन्ग मार्च दुपारी 3 वाजता असेल. त्यांचा मार्ग आझाद मैदान- फ्लोरा फाऊंटन, लालबहादूर शास्त्री पुतळा- बाळासाहेब ठाकरे पुतळा- बाबासाहेब आंबेडकर-  रिगल थिएटर- महात्मा गांधी पुतळा असा असेल. तर राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट सकाळी 10 वाजता महात्मा गांधी पुतळा ते रिगल टॉकीज जवळील लालबहादुर शास्त्री पुतळा या मार्गावरुन लाँग मार्च काढेल.

1 Oct 2024, 15:57 वाजता

पाथर्डी शेवगाव मतदार संघासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीवेळी गोंधळ

1 Oct 2024, 12:19 वाजता

धनंजय जाधव यांची हाकेंवर टीका 

हाके तुम्ही सुर्यावर थुंकण्याचा प्रकार करत आहात, स्वतःला वेळीच सावरा, तुमची लायकी नाही - धनंजय जाधव

काल दारू पिऊन टुल्ल असणाऱ्या हाकेने मग्रुरीत पुन्हा एकदा छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टिका केली. त्यांची कृती म्हणजे सुर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे.

काल हाके दारू प्यायले होते हे कॅमेरामार्फत सर्वांसमोर आलं. ते ससूनला जाऊन स्वतःचा चेकअप करतील परंतु ससून रुग्णालयाचा फेरफारीचा इतिहास महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा आहे, त्यामुळे हाके सारख्या दारुड्या लोकांना उत्तर देण्यात आम्हांला रस नाही. आमचा पक्ष नोंदणीकृत झाला आम्हाला पक्ष चिन्ह मिळाले. हाके सारख्या चिल्लर गोष्टींसाठी आम्हाला वेळ नाही.

1 Oct 2024, 11:39 वाजता

संजय राऊतांची महाविकास आघाडीवर टीका

तीन पक्षांचा जागावाटप अत्यंत सुरळीत सुरू आहे. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाही, एकेका जागेसाठी कदाचित जास्त वेळ लागतोय ते ठीक आहे. कारण अशा काही जागा आहेत तिथे दोन किंवा तीन पक्षांचा दावा आहे अशा वेळेला आम्ही एकत्र बसून निर्णय घेतो. कालही आम्ही सहा ते सात तास बसलो होतो आजही बसणार आहोत, दसऱ्याच्या खूप अगोदर आम्ही जागा वाटपाचा निकाल लावू, असं संजय राऊत म्हणाले. 

1 Oct 2024, 11:31 वाजता

संजय राऊतांची अमित शाह यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया 

अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत, गृहमंत्री देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषय बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या शाखा शाखांना भेटी देत आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे. देशाच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री किती गंभीर आहेत हे यातून दिसतं, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. 

खरं म्हणजे ते मणिपूरला जाऊन थांबायला पाहिजे, कश्मीरमध्ये जे अतिरिके हल्ले सुरू आहेत तिथे जाऊन थांबायला पाहिजे, असं देखील संजय राऊत म्हणाले. 

1 Oct 2024, 10:16 वाजता

राज्यातील भाजप कुचकामी - संजय राऊत 

मोदींनी पुण्याच्या मेट्रोचं उद्घाटन 6 वेळा केलं 
संजय राऊतांची राज्यातील भाजपवर टीका

1 Oct 2024, 09:51 वाजता

काँग्रेसकडून राज्यभरात सरकारचा निषेध; `लापता लेडीज´ पोस्टर्स 

काँग्रेसकडून राज्यभरात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. 'लापता लेडीज' पोस्टर्स राज्यभरात लावण्यात आले आहेत. पोस्टर्समधून महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यात आला आहे. एका वर्षात 64 हजार महिला बेपत्ता झाल्याच्या आशयाचे बॅनर आहेत. शिंदे, फडणवीस, अजित पवारांचे चेहरे या पोस्टरवर दाखवत सरकारवर टीका करण्यात आली आहे. राज्याला भ्रष्टयुतीची नजर लागली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

महाराष्ट्र राज्य हे महिलांचा सन्मान करणारं राज्य आहे, पण राज्याला भ्रष्टयुतीची नजर लागली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसकडून राज्यभरात सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी `लापता लेडीज´ पोस्टर्स लावण्यात आलेत. पोस्टर्समधून बेपत्ता महिलांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यात आला आहे. पोस्टर्समधून कलात्मकरित्या शिंदे, फडणवीस, अजित पवारांचे चेहरे दाखवत सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील महिलांची सुरक्षा धोक्यात आली असून राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचं काँग्रेसने दर्शवलं आहे.

1 Oct 2024, 08:57 वाजता

भाजपकडून 150 जागांवर लढण्याची तयारी सुरु असल्याची सूत्रांची माहिती. संभाव्य बंडखोरीचा आढावा घेत उमेदवारांच्या आढाव्यासाठी निरीक्षक पाठवण्याची शक्यता आहे. 

1 Oct 2024, 08:55 वाजता

अमित शाह यांचा मुंबई दौरा

अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई, ठाणे आणि कोकण मतदारसंघाचा घेणार आढावा घेणार.

 

1 Oct 2024, 08:50 वाजता

निवडणुकीच्या सर्व्हेवर भावना गवळींची प्रतिक्रिया 

निवडणुकीतील चुकीच्या सर्व्हेमुळे  बळी गेल्याची खदखद स्वत:भावना गवळींनी व्यक्त केली आहे. उमेदवारी सर्वे तुमच्या बाजूनं नाही असं कारण देत महायुतीकडून लोकसभेचं तिकीट कापण्यात आलं अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. वाशिमच्या नंधाना येथील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  यावेळी त्यांच्या सोबत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे देखील होते. आता कुणाचा बळी जाऊ देऊ नका. मतदारसंघाची खरी परिस्थिती वरिष्ठांना कळवा अशी विनंती यावेळी त्यांनी सदाभाऊ खोत यांना केली.