ना ऑफिसला जाते, ना घरची कामं करते; काही न करता फक्त झोपा काढून 9 लाख रुपये कमावले

एका तरुणीने फक्त झोपा काढून नऊ लाख रुपये कमावले आहेत. हा नेमका काय प्रकार आहे जाणून घेऊया. 

वनिता कांबळे | Updated: Sep 30, 2024, 11:02 PM IST
ना ऑफिसला जाते, ना घरची कामं करते; काही न करता फक्त झोपा काढून 9 लाख रुपये कमावले  title=

Sleep Champion : काही काम न करता कुणी आपल्याला पैसे दिले तर किती बरं होईल ना... असा विचार आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाच्याच मनात येतो.  बेंगळुरू येथील साईश्वरी पाटील नावाच्या तरुणीने खरचं काही न करता फक्त झोपा काढून  9 लाख रुपये कमावले आहेत. साईश्वरी ना ऑफिसला गेली ना तिने घरात एकही काम केले. तरीही साईश्वरी लखपती झाली आहे. 

शरीरासाठी झोप अत्यंत महत्वाची आहे. निरोगी रहायचे असेल तर पुरेशी झोप घेतलीच पाहिजे असा सल्ला डॉक्टर देखील देतात. मात्र, कामाच्या तणावामुळे बऱ्याच लोकांची जोप पूर्ण होत नाही. अशा स्थितीत कुणाला तुम्ही फक्त पुरेशी झोप घेण्याचे पैसे दिले जातील असे सांगितले विश्वास बसणार नाही. साईश्वरी पाटील   होम आणि स्लीप सोल्यूशन ब्रँड वेकफिटच्या स्लीप इंटर्नशिप प्रोग्राममध्ये सहभागी झाली होती. साईश्वरी पाटीलने यांची Sleep Champion स्पर्धा जिंकली आहे. 

साईश्वरी पाटील व्यवसायाने बँकर आहे. होम आणि स्लीप सोल्यूशन ब्रँड वेकफिटच्या स्लीप इंटर्नशिप प्रोग्रामच्या तिसऱ्या सिजनमध्ये तिने भाग घेतला होता. साईश्वरी 12 निवडक स्लीप इंटर्नपैकी एक होती. निवडलेल्या सर्व इंटर्नला वेकफिटकडून उच्च दर्जाचे मॅट्रेस आणि स्लीप ट्रॅकर देण्यात आला होता. चांगली झोप कशी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी त्यांना तज्ञांकडून मार्गदर्शनही करण्यात आले. दिवसभरात 20 मिनिटे चांगली डुलकी घेणे हा देखील या प्रोग्रामचा एक भाग होता. यात साईश्वरीने बाजी मारली आणि ती स्लिपींग चॅम्पियन बनली.