Breaking News LIVE: निवडणुकीत शिवसेनेसह राष्ट्रवादीलाही सोबत घ्या - भाजप अध्यक्ष जे पी नड्डा

Maharashtra Breaking News LIVE: मुंबई, नागपूर, पुणे, नाशिकबरोबरच महाराष्ट्रासहीत देशभरातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरात घडणाऱ्या घटनांचे महत्त्वाचे अपडेट्स अगदी थोडक्यात जाणून घ्या एकाच ठिकाणी...

Breaking News LIVE:  निवडणुकीत शिवसेनेसह राष्ट्रवादीलाही सोबत घ्या - भाजप अध्यक्ष जे पी नड्डा

14 Sep 2024, 10:51 वाजता

धाराशिवमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंना मोठा धक्का

शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख तथा कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांनी राजीनामा दिला आहे. ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कापसे हजारो समर्थकासह परंडा येथे शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत. कळंब नगर परिषदचे नगर सेवकही शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. धाराशिव विधानसभा मतदारसंघात शिवाजी कापसे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

14 Sep 2024, 10:49 वाजता

ऑगस्टमध्ये एक कोटी 31 लाख लोकांचा विमान प्रवास

देशात विमानप्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून, ऑगस्टमध्ये एक कोटी 31 लाख लोकांनी विमान प्रवास केल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रसिद्ध केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एकूण एक कोटी 24 लाख लोकांनी विमानप्रवास केला होता. त्या तुलनेत यंदाच्या वर्षी ऑगस्टमध्ये ही वाढ 5.7 टक्के अधिक आहे.

14 Sep 2024, 10:47 वाजता

रात्री दर्शनासाठी चिंता नको, मध्य रेल्वेच्या 22 सेवा

गणेशोत्सवानिमित्त रात्री गणपतीच्या दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे रात्री 22 विशेष उपनगरी लोकल सोडणार आहे. 14 ते 18 सप्टेंबर दरम्यान विशेष लोकल सोडण्यात येतील.

14,15,17 सप्टेंबरला विशेष सेवा सीएसएमटी कल्याण- 1.40, 2.30, 3.25.
कल्याण-सीएसएमटी - 00.05
सीएसएमटी- ठाणे 01.00
ठाणे - सीएसएमटी- 02.00 विसर्जनाच्या दिवशी हार्बर सेवा सीएसएमटी पनवेल 01.30, 02.45
पनवेल-सीएसएमटी - रात्री 01.00, 01.45

14 Sep 2024, 10:44 वाजता

महाराष्ट्रात इंजिनीअरिंग प्रवेशाचा रेकॉर्ड

राज्यात इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना यंदा सुगीचे दिवस आले असून यंदा इंजिनीअरिंग शाखेच्या विविध अभ्यासक्रमांना विक्रमी अशा 1 लाख 40 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यातून इंजिनीअरिंगच्या जवळपास 78 टक्के जागा भरल्याचे सीईटी सेलच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. तसेच संस्था पातळीवरील प्रवेशप्रक्रिया अद्याप सुरू असून, पुढील काही दिवसांत यात वाढीची शक्यताही वर्तविली जात आहे. राज्यात यंदा इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या विविध कोट्यांतून एकूण 1 लाख 79 हजार 877 हजार उपलब्ध आहेत. सद्यःस्थितीत
त्यातील 39 हजार 447 जागा रिक्त आहेत.

14 Sep 2024, 10:42 वाजता

मुख्यमंत्री शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर

पारंड्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रमाला उपस्थित लावणार आहेत. तसेच बार्शी रोड येथील शिवसेना पक्ष मेळाव्यालाही ते उपस्थित असतील. 

14 Sep 2024, 10:41 वाजता

गणपती दर्शनासाठी नड्डा आज मुंबईत

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री श्री जेपी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि वांद्रातील गणेश मंडळात जाऊन ते गणरायांचं दर्शन घेणार आहेत.

14 Sep 2024, 10:39 वाजता

मुंबईतील कोस्टल रोड पालघरच्या वाढवण बंदरापर्यंत नेण्याचा सरकारचा मानस; विमानतळही उभारणार?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडला आगामी वाढवण बंदराशी जोडण्यासंदर्भात अहवाल मागवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच पालघरमध्ये विमानतळ बांधण्याबाबत जमीन आणि साध्यता अहवाल मुख्यमंत्र्यांकडून मागवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे, वाढवण बंदर विमानतळ आणि कोस्टल रोडशी जोडल्यास तिथे कनेक्टिविटी वाढून त्या भागाचा विकासही मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होईल.