Animal Fat Used In Laddu Prasadam: तिरुपती मंदिर हे देशातील पवित्र स्थानांपैकी एक आहे. येथे लाखो भाविक भेट देत असतात. पण येथे मिळणाऱ्या प्रसादामुळे मंदिर प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी मागच्या सरकारवर आरोप लावलाय. राज्यातील आधीच्या जगन मोहन यांच्या वायएसआरसीपी सरकारने जगप्रसिद्ध तिरुपति मंदिरातील लाडूमध्ये दर्जाहिन पदार्थ आणि प्राण्यांच्या चरबीचा वापर केला होता, असा आरोप त्यांनी केला. जनतांत्रिक गठबंधन (राजग) आमदारांच्या बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते. तिरुमला लाडूदेखील दर्जाहिन सामग्रीपासून बनवण्यात आला होता. त्यांनी तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर केला होता.
मागच्या 5 वर्षांमध्ये वायएसआर काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी तिरुमलाची पवित्रता कलंकित केली आहे. त्यांनी अन्नदानम (मोफत भोजन) च्या गुणवत्तेशीदेखील तडजोड केली. तूपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करुन पवित्र तिरुमला लाडू दुषित करुन टाकले. मुख्यमंत्री नायडू तेलगूमध्ये आमदारांना संबोधित करत होते. आता आम्ही शुद्ध तुपाचा उपयोग करतोय. आम्ही टीटीडीच्या पवित्रतेची रक्षा करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले.
इतक्या मोठ्या आणि गंभीर आरोपानंतर वायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार वाय सुब्बा रेड्डी यांनी पलटवा केलाय. नायडू हेच तिरुमलाच्या पवित्रता आणि कोट्यावधी हिंदुंच्या आस्थेला नुकसान पोहोचवत असल्याचे रेड्डी म्हणाले. तिरुमला प्रसादासंदर्भातील त्यांचे विधान अत्यंद दुर्भाग्यपूर्ण आहे. कोणताच व्यक्ती अशा शब्दात बोलणार नाही, असे आरोप लावणार नाही, असे ते म्हणाले.
चंद्रबाबू नायडू राजकीय फायद्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.भक्तांची आस्था मजबूत करण्यासाठी आपल्या परिवारासोबत तिरुमला 'प्रसाद' संदर्भात देवासमोर शपथ घ्यायला तयार असल्याचे काँग्रेस खासदार रेड्डी म्हणाले. चंद्रबाबू नायडू आपल्या परिवारासोबत असं करु शकतील का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
तिरुपतीच्या श्री वेंकटेश्वर मंदिरात लाडू प्रसाद म्हणून दिले जातात. मंदिराचे संचालन तिरुमला तिरुपति देवस्थानम (टीटीडी) करतं. आंध्र प्रदेशमध्ये तिरुपति जिल्ह्याच्या तिरुमालामध्ये असलेल्या प्रसिद्ध वेंकटेश्वर मंदिरामध्ये भक्त दर्शनाच्या नंतर प्रसाद नक्की घेतात.