Breaking News LIVE: निवडणुकीत शिवसेनेसह राष्ट्रवादीलाही सोबत घ्या - भाजप अध्यक्ष जे पी नड्डा

Maharashtra Breaking News LIVE: मुंबई, नागपूर, पुणे, नाशिकबरोबरच महाराष्ट्रासहीत देशभरातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरात घडणाऱ्या घटनांचे महत्त्वाचे अपडेट्स अगदी थोडक्यात जाणून घ्या एकाच ठिकाणी...

Breaking News LIVE:  निवडणुकीत शिवसेनेसह राष्ट्रवादीलाही सोबत घ्या - भाजप अध्यक्ष जे पी नड्डा

14 Sep 2024, 20:39 वाजता

गणेशोत्सवानिमित्त मध्य-हार्बरवर विशेष लोकल फेऱ्या

मुंबईकरांसाठी Good News! रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेश मंडळाना भेट देणाऱ्या प्रवाशांना आता शेवटच्या लोकलची चिंता न करता फिरता येणार आहे. उत्सव काळातील संभाव्य गर्दी लक्षात घेता सुट्टीच्या तीन दिवसात एकूण 22 रात्रकालीन विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने घेतला आहे.

14 Sep 2024, 19:05 वाजता

निवडणुकीत शिवसेनेसह राष्ट्रवादीलाही सोबत घ्या - भाजप अध्यक्ष जे पी नड्डा 

भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आज मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी 'मोठ्या भावाची भूमिका बजावताना दोन्ही भावांना सांभाळून घ्या, निवडणुकीत शिवसेनेसह राष्ट्रवादीलाही सोबत घ्या' असे निर्देश भाजप नेत्यांना दिले. राष्ट्रवादी काँग्रेसला सामावून घेण्यासाठी केंद्र भाजपचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. 

14 Sep 2024, 17:48 वाजता

महाविकास आघाडीच्या नेत्यांची 20 सप्टेंबरला बैठक होणारे...त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या विधानसभा जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय..

14 Sep 2024, 15:37 वाजता

आमच्या जागा वाटपानंतर तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळणार नाही असं वक्तव्य उदय सामंत यांनी केले आहे. किती जागांवर दावा हे जरा गोपनीय राहू देत असंही  उदय सामंत म्हणाले आहेत. 

14 Sep 2024, 12:49 वाजता

राष्ट्रवादी काँग्रेससोबत होणारे वादविवाद टाळण्याचे भाजप नेतृत्वाचे प्रयत्न -  सूत्रांची माहिती

- विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला महायुतीशी एकसंध ठेवण्यावर केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न 

- राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे संबंध, महायुतीत होणारे वाद आणि अजित पवारांच्या भूमिकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महायुती कायम ठेवण्यासाठी भर

- स्थानिक पातळीवरील वाद टाळा - केंद्रीय नेतृत्वाचे भाजप नेत्यांना निर्देश

- काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनीही आमदारांना दिल्या होत्या सूचना

14 Sep 2024, 11:00 वाजता

अजित पवारांनी मानले मोदींचे आभार

देशांतर्गत अन्नधान्य महागाई कमी करण्यासाठी गेल्या वर्षी लागू केलेले बासमती तांदूळ आणि कांद्यावरील किमान निर्यात मूल्य (एमईपी) रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशातील कांदा, बासमती तांदूळ आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.

14 Sep 2024, 10:58 वाजता

पारोळा तालुक्यातील शाळेत 113 विद्यार्थ्यांना विषबाधा

शिवरे दिगर येथे सारंग माध्यमिक विद्यालय शिवरे येथे गणपती विसर्जनानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. गणपती भंडाऱ्यात जेवणानंतर विद्यार्थी विद्यार्थिनींनी जेवण केल्यानंतर त्यांना उलट्या, चक्कर, मळमळ होणे, हातपाय गळणे आदी त्रास होवून विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. उपचारानंतर 113 पैकी 100 विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. तर दहा विद्यार्थ्यांवर आज सकाळपर्यंत पारोळ्यात उपचार सुरू होते. त्या सर्वांना बंर वाटत असल्याने घरी पाठवण्यात आले आहे. या घटनेत आता फक्त तीन विद्यार्थ्यांवर धुळे येथे उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

14 Sep 2024, 10:56 वाजता

अनिल देशमुख यांचे पुत्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारीसाठी अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख शर्यतीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हर्षवर्धन देशमुख, विक्रम ठाकरे यांच्यापाठोपाठ सलील देशमुखही वरुड मोर्शी विधानसभा मतदार संघात तिकिटासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. नवा चेहरा देण्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. नवीन चेहरा म्हणून सलील देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. वरुड मोर्शी मतदारसंघ काटोल मतदारसंघाला लागून आहे.

14 Sep 2024, 10:53 वाजता

पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी 41 जण इच्छूक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. दिनांक 10 सप्टेंबरपर्यंत शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातून तब्बल 41 इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज दाखल केल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे. लवकरच या सर्व इच्छुक उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर करण्यात येईल असेही प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे.

14 Sep 2024, 10:52 वाजता

पुण्यात 7 नवे पोलीस स्टेशन

पुण्यामध्ये 7 नवीन पोलीस स्टेशन होणार आहेत. शहराचा विस्तार लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. आंबेगाव, नांदेड सिटी, काळेपडळ, फुरसुंगी खराडी, बाणेर आणि वाघोली ही नवीन पोलीस स्टेशन होणार असून त्यांचे कामकाज लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सध्या 32 पोलीस स्टेशन आहेत.