Maharashtra Breaking News LIVE : नागपुरात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर राजकीय घडामोडीसह राज्यातील इतर बातम्या एका क्लिकवर तुम्ही पाहू शकता. 

Maharashtra Breaking News LIVE : नागपुरात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या

2 Oct 2024, 09:33 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : सांगलीत आजी-माजी खासदारांची चांगलीच जुपली

सांगलीत आजी-माजी खासदारांची चांगलीच जुपली. विशाल पाटील रंग बदलणारा सरडा आहे, अशी टीका माजी खासदार संजयकाका पाटलांनी केलीय. विशाल पाटील अपघाताने झालेला खासदार असल्याचं संजयकाकांनी म्हटलं. तर दुसरीकडे विद्यमान खासदार विशाल पाटलांनीही संजयकाकांवर पलटवार केलाय. लोकसभेत पराभूत झाल्यानं ते वैफल्यग्रस्त काका बनलेत, अशी टीका विशाल पाटलांनी केलीय.

 

2 Oct 2024, 09:32 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : अमित शाह आणि फडणवीसांमध्ये दीड तास चर्चा

सागर बंगल्यावर काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. दोघांमध्ये जवळपास दीड तासाहून अधिक काळ चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री फडवणीस आणि अजित पवार यांच्यात जागा वाटपासंदर्भात ज्या काही बैठका झाल्या ,त्याचा आढावा अमित शहा यांनी यावेळी घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. भाजप अंदाजे किती जागा लढवू शकते या विषयी दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांकडून मिळतेय. 

 

2 Oct 2024, 09:30 वाजता

Breaking News LIVE : इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटलंय

आता बातमी आंतरराष्ट्रीय इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटलंय..इराणनं इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केलाय. क्षेपणास्त्र  हल्ल्यात इस्त्रायलचं मोठं नुकसान झालंय. तसेच हल्ल्यात इस्त्रायलचं मोठं नुकसान झालंय.. तसेच अनेक इमारतींना आग लागलीय.. इराणच्या हल्ल्यात इस्त्रायलचे सैन्य ठिकाणं नष्ट झालीय..इस्त्रायलचं नेवातिम एअरबेस पूर्णपणे उद्धवस्त झालंय.. 

बातमी सविस्तर वाचा - इराणचा इस्रायलवर एकामागून एक 100 क्षेपणास्त्रांचा मारा; देशभरात हाय अलर्ट... सध्या काय स्थिती?

 

2 Oct 2024, 09:29 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : मुंबई, नाशिकमध्ये धुक्याची चादर

मुंबईवर धुक्याची चादर पसरलीये. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसानं विश्रांती घेतल्यानं वातावरणात बदल झालाय. यामुळे सकाळी धुकं तर दुपारी कडक उन्हाचा तडाखा असल्याचं पाहायला मिळतंय. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झालीये. 

 

2 Oct 2024, 09:21 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक 

महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक होणारेय. विधानसभा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्यानं मविआचं बैठकीचं सत्र अजूनही सुरूच आहे. त्यामुळे आज दुपारी 2 वाजता शिवालयात पुन्हा महत्त्वाची बैठक पार पडणारेय. बैठकीत जागावाटपाचा मुद्दा विदर्भावर येऊन थांबलाय. यावर तोडगा काढण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक होणारेय. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष दोघांनी दावा केलेल्या जागांवरचा तिढा अजून सुटलेला नाही. विदर्भातील जास्तीत जास्त जागा लढण्यावर काँग्रेस ठाम आहे. तर ठाकरे गटानंही विदर्भातील काही जागांवर दावा केलाय. त्यामुळे चर्चेचं गु-हाळ विदर्भाच्या मुद्द्यावर अडकलंय. 

2 Oct 2024, 09:18 वाजता

Gandhi Jayanti Live Updates : पंतप्रधान मोदी राजघाटावर जाऊन वाहिली आंदराजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर जाऊन त्यांनी बापूंना पुष्पांजली अर्पण केली .सत्य, समरसता आणि समतेवर आधारित त्यांचं जीवन आणि आदर्श देशवासीयांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील. दरम्यान पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. ज्यांनी देशाचे सैनिक, शेतकरी आणि स्वाभिमानासाठी आपले जीवन समर्पित केलं. 

2 Oct 2024, 09:16 वाजता

Gandhi Jayanti Live Updates : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बापूंना वाहिली पुष्पांजली

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजघाट येथे त्यांना आदरांजली वाहिली.

2 Oct 2024, 09:15 वाजता

Gandhi Jayanti Live Updates : महात्मा गांधी यांची 155 जयंती 

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पोरबंदरमध्ये महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कीर्ती मंदिरात जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. कीर्ती मंदिर हे पोरबंदरमध्ये महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या स्मरणार्थ बांधलेले स्मारक आहे. येथे गांधीजी कुटुंबाचे वडिलोपार्जित घर आहे. जिथे महात्मा गांधी यांचा जन्म झाला. जे कीर्ती मंदिराला लागून आहे.

2 Oct 2024, 09:11 वाजता

Live Updates : माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती

उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विजय घाटावर आदरांजली वाहिली.

2 Oct 2024, 09:09 वाजता

Gandhi Jayanti Live Updates : आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 155 वी जयंती आहे. यावेळी पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधींपासून ते केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनी बापूंची आठवण काढली. अनेक दिग्गजांनी राजघाट जाऊन बापूंना आदरांजली वाहिली.