Maharashtra Breaking News LIVE : अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजेंनी आक्रमक

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर राजकीय घडामोडीसह राज्यातील इतर बातम्या एका क्लिकवर तुम्ही पाहू शकता. 

Maharashtra Breaking News LIVE : अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजेंनी आक्रमक

2 Oct 2024, 11:40 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : रिफायनरी आंदोलकांवर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया

कोकणातील रिफायनरी विरोधी आंदोलकांना विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा दिलासा मिळणार आहे. कारण रिफायनरी विरोधी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सुरूवात झालीय. पोलिसांच्यावतीनं याबाबतची कागदपत्रे न्यायालयात सादर केली गेलीत. त्यामुळे अगदी मोजक्याच दिवसांमध्ये हे गुन्हे मागे घेतले जाणारेत.. रिफायनरी विरोधी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारच्यावतीनं उदय सामंत यांनी बैठकीत शब्द दिला होता. त्यानुसार हि प्रक्रिया आता केली गेलीय. रिफायनरी आंदोलकांवर एकूण 10 गुन्हे आहेत. त्यामुळे गुन्हे मागे घेतल्यानंतर शेकडो आंदोलकांना मोठा दिलासा मिळणारेय. 

 

2 Oct 2024, 11:39 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजेंनी आक्रमक 

अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजेंनी आक्रमक भूमिका घेत शिवप्रेमींना आवाहन केलंय . येत्या 6 तारखेला सकाळी 11 वाजता मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ येण्याचं आवाहन संभाजीराजेंनी केलंय.   24 डिसेंबर 2016 रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन करण्यात आलं होतं.  या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील केल्याचं सरकारी दफ्तरी नोंद आहे. मात्र,स्मारकाच्या कामाला अद्याप सुरूवात देखील न झाल्यानं शिवप्रेमी नाराज आहेत.

 

2 Oct 2024, 11:38 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : 'तुतारी चिन्हावरच लढणार'

यवतमाळमध्ये उमेदवारी मिळणार आणि तुतारी चिन्हावरच लढणार, असा दावा संदीप बाजोरिया यांनी केलाय...  मविआमध्ये तिकीट वाटपाआधीच बाजोरियांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार सुरू केलाय.... भाजप आमदार मदन येरावार यांनी गुंडगिरीला खतपाणी घातलं, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला, असा आरोप ही यावेळी बाजोरियांनी केलाय.. त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून,  भयमुक्त वातावरण देऊ असं वचन बाजोरियांनी जनतेला दिलं... 

 

2 Oct 2024, 11:37 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : 'नवरात्रीत अधिकाधिक जागांची घोषणा होणार'

जागावाटपात आम्ही खूप पुढे गेलोय. नवरात्रीत अधिकाधिक जागा आम्ही घोषित करू, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दिलीये. तर यासंदर्भात  8,9,10 ऑक्टोबरला सलग बैठक होणार असल्याची माहिती वडेट्टीवारांनी दिलीय

 

2 Oct 2024, 09:34 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात

पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झाला असून दुर्घटनेत 2 पायलट आणि एका इंजिनियरचा मृत्यू झालाय. दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. 

2 Oct 2024, 09:33 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : सांगलीत आजी-माजी खासदारांची चांगलीच जुपली

सांगलीत आजी-माजी खासदारांची चांगलीच जुपली. विशाल पाटील रंग बदलणारा सरडा आहे, अशी टीका माजी खासदार संजयकाका पाटलांनी केलीय. विशाल पाटील अपघाताने झालेला खासदार असल्याचं संजयकाकांनी म्हटलं. तर दुसरीकडे विद्यमान खासदार विशाल पाटलांनीही संजयकाकांवर पलटवार केलाय. लोकसभेत पराभूत झाल्यानं ते वैफल्यग्रस्त काका बनलेत, अशी टीका विशाल पाटलांनी केलीय.

 

2 Oct 2024, 09:32 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : अमित शाह आणि फडणवीसांमध्ये दीड तास चर्चा

सागर बंगल्यावर काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. दोघांमध्ये जवळपास दीड तासाहून अधिक काळ चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री फडवणीस आणि अजित पवार यांच्यात जागा वाटपासंदर्भात ज्या काही बैठका झाल्या ,त्याचा आढावा अमित शहा यांनी यावेळी घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. भाजप अंदाजे किती जागा लढवू शकते या विषयी दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांकडून मिळतेय. 

 

2 Oct 2024, 09:30 वाजता

Breaking News LIVE : इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटलंय

आता बातमी आंतरराष्ट्रीय इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटलंय..इराणनं इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केलाय. क्षेपणास्त्र  हल्ल्यात इस्त्रायलचं मोठं नुकसान झालंय. तसेच हल्ल्यात इस्त्रायलचं मोठं नुकसान झालंय.. तसेच अनेक इमारतींना आग लागलीय.. इराणच्या हल्ल्यात इस्त्रायलचे सैन्य ठिकाणं नष्ट झालीय..इस्त्रायलचं नेवातिम एअरबेस पूर्णपणे उद्धवस्त झालंय.. 

बातमी सविस्तर वाचा - इराणचा इस्रायलवर एकामागून एक 100 क्षेपणास्त्रांचा मारा; देशभरात हाय अलर्ट... सध्या काय स्थिती?

 

2 Oct 2024, 09:29 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : मुंबई, नाशिकमध्ये धुक्याची चादर

मुंबईवर धुक्याची चादर पसरलीये. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसानं विश्रांती घेतल्यानं वातावरणात बदल झालाय. यामुळे सकाळी धुकं तर दुपारी कडक उन्हाचा तडाखा असल्याचं पाहायला मिळतंय. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झालीये. 

 

2 Oct 2024, 09:21 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक 

महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक होणारेय. विधानसभा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्यानं मविआचं बैठकीचं सत्र अजूनही सुरूच आहे. त्यामुळे आज दुपारी 2 वाजता शिवालयात पुन्हा महत्त्वाची बैठक पार पडणारेय. बैठकीत जागावाटपाचा मुद्दा विदर्भावर येऊन थांबलाय. यावर तोडगा काढण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक होणारेय. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष दोघांनी दावा केलेल्या जागांवरचा तिढा अजून सुटलेला नाही. विदर्भातील जास्तीत जास्त जागा लढण्यावर काँग्रेस ठाम आहे. तर ठाकरे गटानंही विदर्भातील काही जागांवर दावा केलाय. त्यामुळे चर्चेचं गु-हाळ विदर्भाच्या मुद्द्यावर अडकलंय.