Breaking News LIVE: रायगडमध्ये एस टी बस 50 फूट खोल दरीत कोसळली

दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Breaking News LIVE: रायगडमध्ये एस टी बस 50 फूट खोल दरीत कोसळली

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

9 Oct 2024, 10:37 वाजता

सामनातून काँग्रेसवर टीका 

हरियाणातील पराभवावरुन सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे. हरियाणात मित्रपक्षांना दूर ठेवल्याचा काँग्रेसला फटका बसला आहे. त्यामुळे या निकालातून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी धडा घ्यावा असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे. 

9 Oct 2024, 10:35 वाजता

अजित पवारांकडून रोहित पवारांच कौतुक 

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भर सभेत आमदार रोहित पवारांचं कौतुक केल आहे. रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये चांगलं काम करतोय, अशा शब्दांत अजित पवारांनी कौतुक केल आहे. राजकीय भूमिका बदलताना शरद पवारांनी अगोदर होकार दिला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी भूमिका बदलली, असा गौप्यस्फोटही  अजित पवारांनी केला आहे. तर घरामध्ये पुरूष मंडळी असेपर्यंत घर एकत्र असतं विधान अजित पवारांनी केल आहे. अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे आहे? याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

9 Oct 2024, 10:27 वाजता

संजय राऊतांची हरियाणा निकाला पत्रकार परिषद 

हरियाणात काँग्रेसचा पराभव दुर्दैवी - राऊत 
हरियाणाच्या निकालाचा परिणाम होणार नाही - राऊत
कोणाला स्वतःला मोठाभाऊ समजू नये - राऊत 
निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही 
पराभवातून आम्हाला खूप काही शिकता येईल 

 

9 Oct 2024, 10:24 वाजता

पंढरपुरात भाविकांची फसवणूक

पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासाचं बनावट संकेत स्थळ....भाविकांची फसवणूक होत असल्याचं उघड....भक्तनिवास आरक्षणासाठी  HTTPS यात्राधाम डॉट ओआरजी याच संकेत स्थळाचा वापर करण्याचं आवाहन...

9 Oct 2024, 10:14 वाजता

नवी मुंबईत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला खिंडार

शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा तुतारी फुंकणार आहेत. विजय नहाटा शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान निवासस्थानी बैठक होणार आहे. नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटलांचं नाव देण्याचा ठराव बैठकीत पास होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

 

9 Oct 2024, 10:13 वाजता

अभिजीत पाटील हाती तुतारी घेणार?

-अभिजीत पाटलांनी पुन्हा घेतली पवारांची भेट
-अभिजीत पाटील हाती तुतारी घेणार?
-अभिजीत पाटील माढा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक
-अभिजीत पाटील फडणवीसांचे निकटवर्तीय

 

9 Oct 2024, 10:11 वाजता

बैठकीत तिढा सोडवणार

-काही जागांवर तिढा कायम राहिल्यास तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत तिढा सोडवणार, तर उर्वरित एकमत झालेल्या जागा लवकरच जाहीर करणार

-शिवसेना ठाकरे गट १०० च्या आसपास  तर काँग्रेस पक्ष १०० पेक्षा अधिक जागा लढवण्याच्या तयारीत, तिढा पूर्णपणे सुटल्यानंतर कोणता पक्ष किती जागा लढवणार हे समोर येणार

-महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या आहेत अश्या १५४  जागा त्याच पक्षांकडे ठेवण्यात आल्यात... अगदी काही मोजक्या जागांवर फेरफार करण्यात आलाय