शिल्पा शेट्टी अडकली कायदेशीर कचाट्यात, कोर्टात तक्रार दाखल... अभिनेत्रीवर 'हा' आरोप

Shilpa Shetty : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. तिच्या विरोधात मुझफ्फूर सीजेएम कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणाची सुनावणी 11 नोव्हेंबरला होणार आहे.

राजीव कासले | Updated: Oct 8, 2024, 08:54 PM IST
शिल्पा शेट्टी अडकली कायदेशीर कचाट्यात, कोर्टात तक्रार दाखल... अभिनेत्रीवर 'हा' आरोप

Shilpa Shetty : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. तिच्या विरोधात मुझफ्फूर सीजेएम कोर्टात (Muzaffarpur CJM Court) तक्रार दाखल करण्यात आली आहे.  शिल्पा शेट्टीबरोबर आणखी चार जणांचं या तक्रारीत नाव आहे. याप्रकरणी 11 नोव्हेंबर 2024 ला सुनावणी होणार आहे. सर्वसामान्यांच्या सुविधांमध्ये अडथळा आणल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण?
अभिनेत्री शिल्पा शेट्टी रविवारी मुझफ्फूरमधल्या शाम कल्याण ज्वेलरच्या उद्घाटनच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. शिल्पा शेट्टीच्या हस्ते या दुकानाचं उद्घाटन करण्यात आलं. हा कार्यक्रम कलम बाग चौकाजवळच आयोजित करण्यात आला होता. शिल्पा शेट्टीला पाहाण्यासाठी रस्ताच्या दुतर्फा चाहत्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे सामान्य लोकांना आणि वाहतुकीला ट्रॅफिक जामच्या समस्येला सामोरं जावं लागलं. 

शिल्पा शेट्टी विरोधात तक्रार
याविरोधात वकिल सुधीर कुमार ओझा यांनी कोर्टात तक्रार दाखल केली. खासगी कार्यक्रमामुळे अनेक तास रस्त्यावर गर्दी होती. त्यामुळे वाहन चालकांबरोबरच सामान्य लोकांनाही मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे सुधीर कुमार ओझा यांनी तक्रार दाखल केलीय. यात शिल्पा शेट्टीबरोबरच डीएम सुब्रत सेन, कल्याण ज्वेलर्सचे टीएम कल्याण रमन आणि आणखी एकाविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणाची सुनावणी 11 नोव्हेंबरला होणार आहे.

हे ही वाचा : पाकिस्तानातून भारतात येणार श्रीदेवीची तिसरी मुलगी, बिग बजेट चित्रपटात करणार काम

या वर्षाच्या जून महिन्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. एका सराफा व्यापाऱ्याला फसवणूकीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी कोर्टाने सर्व प्रकरणाच्या सखोल तपासाचे आदेश दिले होते. 

Latest News in Marathi

Political News, Bollywood News, Tech News, Auto News, Sports News आणि  LifeStye News वाचण्यासाठी मराठी न्यूजमधील विश्वसनीय वेबसाईट ZEE 24 तास अॅप डाऊनलोड करा आणि फक्त एका क्लिकवर सर्व ताज्या बातम्या आणि माहितीशी कनेक्ट रहा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x