Maharashtra Breaking News LIVE: अभिनेत्री प्राजक्ता माळींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील ठळक घडामोडींचे वेगवान अपडेट्स एका क्लिकवर 

Maharashtra Breaking News LIVE:  अभिनेत्री प्राजक्ता माळींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावरुन राजकारण तापलं आहे. राज्यातील ठळक घडामोडींचा वेगवान आढावा, एका क्लिकवर 

29 Dec 2024, 22:05 वाजता

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर बंगल्यावर जाऊन तिनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आमदार सुरेश धस यांनी बीड सरपंच हत्याकांडाचा संदर्भ देताना आपला चुकीच्या पद्धतीनं उल्लेख केला. त्यासाठी सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळी यांनी केली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनीही लक्ष घालून कारवाई करावी अशी विनंती करण्यासाठी तिनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसंच सुरेश धस यांच्यावर कारवाई न झाल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही तिनं दिलाय. 

29 Dec 2024, 20:48 वाजता

मुंबई गोवा महामार्गावर वाहतूकीची मोठी कोंडी झाली आहे.  माणगाव बाजारपेठ ते गारळ फाट्या पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जवळपास सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.  सुट्टीत फिरायला गेलेले पर्यटक परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडीत अडकले आहेत.  कोकणातून मुंबईकडे येताना पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे.  मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक ठप्प झाली आहे. 

29 Dec 2024, 19:50 वाजता

बीड हत्याकांड प्रकरणावर पंकजा मुंडे यांचं ट्विट

शक्ती' शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची. 'दुर्दैवी घटना'हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे. भावना कुठे आहेत? चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना पण कायद्याने, नियमाने!! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक. दुर्दैवाने soft targetआहे स्त्री आणि तिचे सत्व. काल पाहवलं नाही, पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे? तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी. 

29 Dec 2024, 19:09 वाजता

संतोष देशमुख हत्याप्रकरणी धक्कादायक बातमी समोर 

बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणी धक्कादायक बातमी समोर आली आहे. हत्येप्रकरणातील आरोपींचे मृतदेह सापडले अशी माहिती देणारा व्यक्ती दारुच्या नशेत. दमानिया यांनी दिली होती आरोपींच्या हत्येची माहिती

29 Dec 2024, 18:57 वाजता

बोईसर तारापूर एमआयडीसीत भीषण आग

पालघरमधील बोईसर तारापूर एमआयडीसीत भीषण आग. बोईसरच्या सालवड शिवाजीनगर परिसरातील कारखान्याला भीषण आग. आगीचे आणि धुराचे लांबच लांब लोळ. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.

29 Dec 2024, 18:55 वाजता

EVMच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत मतांचा चोरी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आरोप

विधानसभा निवडणुकीत मतांची झालेली चोरी संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली. या चोरीबाबत सखोल चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने EVM मशीन व VVPAT मशीनच्या माध्यमातून झालेल्या चोरीचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात येणार आहे. 

29 Dec 2024, 17:58 वाजता

प्राजक्ता माळी आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितली. परंतु, अद्याप वेळ निश्चित झालेली नाहीये. 

29 Dec 2024, 15:01 वाजता

कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती 

कल्याण मधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार व हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. नियुक्ती बाबत मुख्यमंत्र्यांनी फोन द्वारे आपल्याला कळवल्याचे उज्वल निकम यांनी स्पष्ट केले. कल्याण पोलिसांनी याबाबत आरोप पत्र दाखल केल्यानंतरच न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होणार अशी माहिति उज्वल निकम यांनी दिली. 

29 Dec 2024, 14:53 वाजता

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी सुरक्षा वाढवली 

दिल्ली पोलिसांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिल्लीतील घरावर सुरक्षा वाढवली आहे. दिल्लीत उपस्थित बिहारचे विद्यार्थी बीपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ नितीश कुमार यांच्या घराला घेराव घालू शकतात. त्यामुळे नितीशकुमार यांच्या दिल्लीतील घराची सुरक्षा वाढवण्यात आली. अनेक विद्यार्थी संघटनांनी नितीश कुमार यांच्या दिल्लीतील घराला घेराव घालण्याची घोषणा केली आहे. 

29 Dec 2024, 14:07 वाजता

मढ-कोळीवाड्यात मच्छिमारांच्या बोटीला चीनच्या मालवाहू जाहजाची धडक

नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार, चीनच्या CALL SING BTSJ FLAG CHA या कार्गो शिपनं शनिवारी रात्री जवळपास 12 ते 12:30 वाजता मच्छिमारांच्या बोटीला धडक दिली आहे.