Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावरुन राजकारण तापलं आहे. राज्यातील ठळक घडामोडींचा वेगवान आढावा, एका क्लिकवर
29 Dec 2024, 08:58 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: संतोष देशमुख हत्याप्रकरणी अंजली दमानिया आक्रमक
संतोष देशमुख यांच्या हत्येला वीस दिवस उलटूनही आरोपी फरार असल्यामुळे आरोपींना अटक करा. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज सकाळी 10पासून ठिय्या आंदोलन करणार आहेत. या आंदोलनामध्ये नागरिकांनीही सहभागी व्हावं असा आव्हान दमानिया यांनी केला आहे
29 Dec 2024, 08:55 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: मेट्रोच्या कामांमुळे घोडबंदर भागात वाहतूक बदल
घोडबंदर येथील कापूरबावडी भागात मेट्रो मार्गिकच्या कामामुळे ठाणे पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. हे वाहतुक बदल ३० डिसेंबरपर्यंत दररोज रात्री ११ ते पहाटे पाच या वेळेत लागू असतील. ठाणे शहरात मेट्रो मार्गिका चार आणि पाचच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या मेट्रो मार्गिकेसाठी कापूरबावडी भागात मेट्रोचे खांब उभारण्यात आले असून खांबावर तुळई उभारली जाणार आहेत. त्यामुळे या भागात ठाणे वाहतूक पोलिसांनी बदल लागू केले आहेत.
29 Dec 2024, 07:41 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात CNG च्या दरात वाढ, मध्यरात्रीपासून दर लागू
पुण्यात सीएनजी गॅसदरात प्रतिकिलो १ रुपया १० पैशांची वाढ करण्यात आली आहे. शनिवार, २८ डिसेंबर रोजी मध्यरात्रीपासून हे दर लागू झाले असून, नव्या दरानुसार शहरात आता सीएनजी ८९ रुपये किलोने मिळणार आहे.
29 Dec 2024, 07:37 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: मुंबईचे हवामान बिघडले, धुरक्याची चादर, हवा खराब
शहरात गेल्या काही दिवसांपासून प्रदूषण प्रचंड वाढले असताना आता दररोज विषारी धुरक्याची चादर आणि हवेची गुणवत्ता 'खराब' नोंदवली जात आहे. मुंबईत आज बोरिवली, मालाड, माझगाव, कुलाबा, वरळी आणि भायखळ्यामध्ये हवेचा 'एक्यूआय' 250 च्यावर नोंदवला गेल्याने हवेची गुणवत्ता 'खराब' असल्याचे समोर आले. परिणामी सर्दी, खोकला आणि श्वसनाचे आजार बळावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
29 Dec 2024, 07:36 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: वाघासाठी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद
वाघासाठी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद, बार्शी अभयारण्यातील ढेंबरेवाडी परिसरात वाघ आणि बिबट्याची दहशत. शनिवारी सायंकाळी 5:30 च्या दरम्यान बिबट्याची हालचाल कॅमेऱ्यात कैद. टिपेश्वरहून आलेला वाघ दोन वेळा याच ढेंबरेवाडी परिसरातील कॅमेरात झाला होता कैद. वाघावर नजर ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात आता बिबट्या दिसून आला
29 Dec 2024, 07:31 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: रायगडचे किनारे पर्यटकांनी गजबजले
थर्टीफर्स्ट आणि नववर्ष स्वागताचे वेध सर्वांनाच लागले आहेत. नववर्ष स्वागताचे सेलीब्रेशन करायला पर्यटकांनी रायगडच्या किनार्यांवर गर्दी केलीय. इथल्या समुद्रात मनसोक्त डुंबण्याबरोबरच वेगवेगळ्या वॉटरस्पोर्टसचा आनंद पर्यटक घेत आहेत. घोडा आणि उंटांची सवारीमुळे बच्चे कंपनी तर पॅरासेलींग, एटीव्ही राईड्स, जायंटबॉल सारख्या साहसी खेळांची रेलचेल यामुळे बडीमंडळीही खुश आहे.
29 Dec 2024, 07:29 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग होणार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग होणार आहे. आज दुपारी 12 वाजता होणार व्यावसायिक विमानाचे लँडिंग होणार आहे