Maharashtra Breaking News LIVE: अभिनेत्री प्राजक्ता माळींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील ठळक घडामोडींचे वेगवान अपडेट्स एका क्लिकवर 

Maharashtra Breaking News LIVE:  अभिनेत्री प्राजक्ता माळींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावरुन राजकारण तापलं आहे. राज्यातील ठळक घडामोडींचा वेगवान आढावा, एका क्लिकवर 

29 Dec 2024, 13:49 वाजता

नवी मुंबई विमानतळावर आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार

नवी मुंबई विमानतळावर आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे. इंडिगो कंपनीचं विमान नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे. धुक्यामुळे हे विमान 2 वाजता लँड होणार आहे. त्यासाठी रन वे, सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्वाची कामे पूर्ण झालीय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होऊन पहिले विमान उड्डाण करेल असे स्पष्ट करत ही डेडलाईन चुकणार नसल्याची माहिती सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आलीय. त्यानुसार महिन्याभरापूर्वीच लष्कराच्या विमानाचे यशस्वी लँडिंग टेस्ट करण्यात आले होते. त्यामुळे आता थेट व्यावसायिक विमानाचे लँडिंग करण्यात येणार असून यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

29 Dec 2024, 13:12 वाजता

विमान अपघातप्रकरणी पुतीन यांनी मागितली अझरबैजानची माफी 

अझरबैजान विमान अपघातप्रकरणी व्लादमीर पुतीन यांनी अझरबैजानची माफी मागितलीय. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर देत असताना निशाणा चुकला त्यामुळे हा अपघात झाला, असं पुतीन यांनी म्हटलंय. अझरबैजान विमान अपघातात 38 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हे विमान कझाकिस्तानकडे जात होतं. ही घटना अतिशय दु:खद आहे, व्लादमीर पुतीन यांनी म्हटलंय.

29 Dec 2024, 12:12 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: बीड- हवेत गोळीबार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

बीडच्या परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात हवेत गोळीबार करून सोशल माध्यमावर व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी आणखी तिघा जणांवर गुन्हा दाखल झालाय. माणिक हरिश्चंद्र फड याच्याकडे परवानाधारक पिस्टल असून त्याने पिस्टलसह फोटो काढून सोशल माध्यमावर वायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परवान्यातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी विष्णू घुगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला

29 Dec 2024, 11:17 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: नवी मुंबई विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिग होणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग संपन्न होणार आहे. आज दुपारी  इंडिगो एअरलाईनचे व्यावसायिक विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवे वर लँडिंग करणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा रनवे, सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्वाची कामे जवळपास पूर्ण झाल्याची माहिती समोर येत असून विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होऊन पहिले विमान उड्डाण करेल असे स्पष्ट करत ही डेडलाईन चुकणार नसल्याची माहिती सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेय. 

29 Dec 2024, 11:09 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: उल्हासनगरात मध्यरात्री २ वाजता तरुणाची गळा चिरून हत्या

शांतीनगर भागात असलेल्या रेमंड शोरूमच्या समोरील रस्त्यावरून हा युवक रात्री दोन वाजेच्या सुमारास  अॅक्टिव्हावरून जात असताना त्याची अॅक्टिव्हा थांबवून त्याचा गळा चिरण्यात आला. या घटनेत सदर युवकाचा जागीच मृत्यू झाला.

29 Dec 2024, 10:33 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मी या अगोदरच एसपींना पुरावे दिले होतेः अंजली दमानिया

मी जे बोलले होते त्याचे सर्व पुरावे हे पाठवले होते. तरीदेखील त्यांनी मला विचारणा केलेली आहे पुन्हा मी हे सर्व पुरावे त्यांना देणार आहे मात्र यावरून पोलिसांमध्ये समन्वय नसल्याचं समोर येत असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटले मी जी एस पी यांना माहिती दिली त्यावरती काय कारवाई झाली याची माहिती द्यायला हवी ती मात्र दिलेली नाही

29 Dec 2024, 10:29 वाजता

बीड पोलिसांची अंजली दमानिया यांना नोटीस

बीड:स्थानिक गुन्हे शाखेने अंजली दमानिया यांना नोटीस पाठवली आहे. फरार आरोपी यांचे मृतदेह सापडल्याचे आणि पुरल्याचा अंजली दमानिया यांनी माध्यमांसमोर केलेल्या वक्तव्यामुळे नोटीस पाठवली आहे. अंजली दमानियांच्या वक्तव्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. माहिती व पुरावे पोलिसांकडे सादर करावे यासाठी पोलिसांकडून दमानियांना पत्र

29 Dec 2024, 09:54 वाजता

प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने महिला आयोगाकडे तक्रार दिली असून मुख्यमंत्र्यांनाही 1-2 दिवसांत भेट घेणार आहे. तसंच, करुणा मुंडेंनादेखील नोटीस दिली आहे, अशी माहिती पसमोर येत आहे. 

29 Dec 2024, 09:42 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: एसटीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बारामती ते इंदापूर मार्गे बार्शीकडे निघालेल्या बस प्रवासामध्ये अनोळखी युवकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग.आरोपीने अल्पवयीन मुलीला आपल्या मोबाईल मध्ये अश्लील व्हिडिओ दाखवत केला विनयभंग

29 Dec 2024, 09:11 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली

लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी आळंदीमध्ये पुन्हा एकदा फेसाळली आहे. आतापर्यंत असंख्य वेळा आश्वासन देऊन ही सरकार, स्थानिक प्रशासन यांच्याकडून आळंदीमध्ये इंद्रायणी प्रदूषण रोखण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय. या प्रदूषणासाठी जबाबदार असलेल्या कंपन्यांवर केवळ कारवाईचा फार्स केला जात असून इंद्रायणी नदीमध्ये केमिकल युक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कसलीही कारवाई होत नसल्याच वारंवार स्पष्ट होत आहे.