Maharashtra Breaking News LIVE: मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बंद. अप डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Maharashtra Breaking News LIVE: राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाच्या अंदाजापासून ते अगदी इतर सर्व घडामोडींपर्यंतच्या सर्व अपडेट एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE: मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बंद. अप डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्पही अधिवेशनात मांडण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. आरक्षणाचा तापलेला मुद्दा असो किंवा विरोधकांच्या मागण्या याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले आहे. राज्यातील व देशातील राजकीय व इतर घडामोडींचा आढावा घेऊया या लाइव्ह अपडेटमधून

29 Jun 2024, 08:37 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: प्रत्यक्षात येणार नाहीत अशा गोष्टी अर्थसंकल्पातः शरद पवार

29 Jun 2024, 08:37 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: बारामती निंबूत गोळीबार प्रकरण; रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू

ठरलेलं पैसे न दिल्याच्या कारणावरून बारामती तालुक्यातील निंबुत गावात गोळीबार झाला होता. रणजित निंबाळकर या शेतकऱ्यावर गोळीबार झाला होता. या घटनेत त्यांचा आज मृत्यू झाला आहे. गौतम काकडे यांच्या भावाने केला होता गोळीबार. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांना पोलिसांनी केली अटक.

29 Jun 2024, 08:31 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पः पवार

29 Jun 2024, 08:05 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मोदींच्या राज्यात 18 सभा, 14 ठिकाणी पराभवः शरद पवार

ज्येष्ठ नेते शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा मोदी सरकार व विरोधकांवर निशाणा साधला आहे. मोदींची गॅरंटी राज्यात चालली नाही, असा घणाघात त्यांनी केला आहे. 

 

29 Jun 2024, 07:45 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात आणखी एक अपघात; अल्पवयीन टँकर चालकाने तिघांना उडवले 

वानवडी येथे भरधाव टँकरने सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना धडक दिली. तसेच, एका दुचाकी चालक महिलेला देखील धडक दिली. हा अपघात सकाळी साडे सहाच्या सुमारास घडला. या अपघातात काही मुले आणि महिला जखमी झाली आहे. विशेष म्हणजे या अपघाताला कारणीभूत ठरलेला टँकर अवघ्या १४ वर्षांचा मुलगा चालवीत होता.

29 Jun 2024, 07:42 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पवईतील जयभीम नगर मधील झोपडपट्टीवासी उच्च न्यायालयात

झोपड्यांवरील कारवाई विरोधात पवईतील जयभीम नगरचे रहिवाश्यांनी  उच्च न्यायालयात  तोडलेल्या झोपड्या पुन्हा बांधून देण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केली.गेल्या महिन्यात पवईतील जयभीम नगर येथील अतिक्रमण केलेल्या जागेवरील झोपड्यांवर महानगरपालिकेने  कारवाई केली होती.

29 Jun 2024, 07:09 वाजता

 Maharashtra Breaking News LIVE: संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आज होणार प्रस्थान

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आज प्रस्थान होत आहे. या प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो भावी आळंदीत दाखल झालेत. मंदिर परिसरातील इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी भरून गेलाय.  लाडक्या माऊलींच्या दरशणापूर्वी भाविक पवित्र इंद्रायणी मध्ये स्नान करत आहेत

29 Jun 2024, 07:09 वाजता

 Maharashtra Breaking News LIVE: संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आज होणार प्रस्थान

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आज प्रस्थान होत आहे. या प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो भावी आळंदीत दाखल झालेत. मंदिर परिसरातील इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी भरून गेलाय.  लाडक्या माऊलींच्या दरशणापूर्वी भाविक पवित्र इंद्रायणी मध्ये स्नान करत आहेत

29 Jun 2024, 06:53 वाजता

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन कारची समोरा समोर धडक, दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला असून यात सात जणांचा जागेवरच दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडलीय.या घटनेत 7 जण जखमी झाले असून 4 जण गंभीर आहेत

29 Jun 2024, 06:32 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पुण्याचे प्रांतधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचे अखेर निलंबन

जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगासह राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रामुळे निवडणूक आणि प्रशासकिय कामात गल्लत करत शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. या प्रकरणी कट्यारे यांची चौकशी होऊन दोषी धरण्यात आले. कट्यारे यांच्या लेटरबॉम्ब मुळे महाराष्ट्र नागरी सेवेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली