Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्पही अधिवेशनात मांडण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. आरक्षणाचा तापलेला मुद्दा असो किंवा विरोधकांच्या मागण्या याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले आहे. राज्यातील व देशातील राजकीय व इतर घडामोडींचा आढावा घेऊया या लाइव्ह अपडेटमधून
29 Jun 2024, 12:18 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: लाडकी बहिणसोबत लाडक्या भावांसाठीही योजनाः शिंदे
29 Jun 2024, 11:55 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये टोलनाक्यावर राडा
छत्रपती संभाजी नगरच्या करोडी टोलनाक्यावर किरकोळ वादातून प्रवाशी आणि टोल कर्मचाऱ्यात प्रचंड हाणामारी झाली, फास्ट टॅग मध्ये पैसे नव्हते त्यावरून हा राडा झाल्याचं सांगण्यात येताय त्यात दोन्ही गटात प्रचंड राडा झाला हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय.
29 Jun 2024, 11:25 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: ड्रग्ज विक्री करणाऱ्यांना सोडणार नाहीः मुख्यमंत्री शिंदे
29 Jun 2024, 11:17 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: लडाखमध्ये मोठी दुर्घटना; नदी ओलांडण्याच्या व्यायामादरम्यान पाच जवानांचा मृत्यू झाल्याची भीती
लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात शुक्रवारी नदी ओलांडण्याच्या टँकच्या व्यायामादरम्यान सेक्टरमधील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे एक दुर्घटना घडली. लष्कराच्या 5 जवानांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
29 Jun 2024, 10:43 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: ओबीसी आरक्षणाबाबत आज होणारी सर्व पक्षीय बैठक रद्द
मुख्यमंत्र्यांनी २९ जून रोजी सर्व पक्षीय बैठकित ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्याचे दिले होते आश्वासन. आरक्षणाबाबत सर्व पक्षीय बैठक पुढे ढकलण्यात आली, बैठकिचं करण अद्याप अस्पष्ट. या आठवड्यात बैठक होण्याची शक्यता.
29 Jun 2024, 10:32 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे आंदोलन
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. सत्ताधाऱ्यांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. किस्सा कुर्सी का अशी पोस्टरबाजी करत आंदोलन करण्यात आले.मुख्यमंत्रीपदावरुन माविआला डिवचण्याचा प्रयत्न.
29 Jun 2024, 10:31 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: देहूः संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला जुंपण्यासाठी मानाच्या बैलजोडी दाखल
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज देहूकरांचा निरोप घेऊन आकुर्डी कडे मार्गस्थ होणार आहे. त्यासाठी पालखी रथाला जुंपण्यासाठी मानाच्या बैलजोडी देहू नगरीत दाखल झाल्या आहेत. लोहगाव येथील सूरज खांदवे आणि पुण्यातील नांदेड गाव येथील निखिल कोरडे यांच्या बैलजोडी देहू नगरीत दाखल झाल्या आहेत. या बैलजोडीला दर्शनासाठी देहूतील मुख्य मंदिराजवळ आणण्यात आले. त्यानंतर या बैलजोडीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
29 Jun 2024, 09:19 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: शरद पवार गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कातः मिटकरी
देवगिरी बंगल्यावर अनेक आमदार येऊन गेलेत ,त्यांना निधी पाहिजे ,एकीकडे तुम्ही निधी मागता आणि दुसरीकडे अजित दादा याना विरोध करायचे हे चालणार नाही, असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तसंच, जयंत पाटील यांनी पाहावे की आमच्या संपर्कात कोण कोण आहे, असंही मिटकरी यांनी म्हटलं आहे.
29 Jun 2024, 09:16 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: अजित पवार गटाचे के.पी.पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट
29 Jun 2024, 09:15 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात झिकाचे रुग्ण आढळल्यानंतर; महानगरपालिका अलर्ट मोडवर
पुण्यात झिका व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या वीस जणांची होणार रक्त तपासणी.रुग्ण आढळलेल्या भागात महापालिकेकडून 3000 घरांचे सर्वेक्षण