Maharashtra Breaking News LIVE: मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बंद. अप डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Maharashtra Breaking News LIVE: राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाच्या अंदाजापासून ते अगदी इतर सर्व घडामोडींपर्यंतच्या सर्व अपडेट एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE: मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बंद. अप डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्पही अधिवेशनात मांडण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. आरक्षणाचा तापलेला मुद्दा असो किंवा विरोधकांच्या मागण्या याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले आहे. राज्यातील व देशातील राजकीय व इतर घडामोडींचा आढावा घेऊया या लाइव्ह अपडेटमधून

29 Jun 2024, 21:41 वाजता

मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बंद. अप डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत..मध्य रेल्वे कल्याण कसारा मार्गावरील वाहतून विस्कळीत..डाऊन मार्गावर मालगाडीचे इंजिन फेल..उंबरमाळी ते कसारा दरम्यान मालगाडीचे इंजिन फेल..एकामागोमाग लोकल उभ्या, एक तासापासून रेल्वे सेवा विस्कळीत

29 Jun 2024, 19:06 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: माजी आमदार भीमराव धोंडे खंडणी प्रकरण, आरोपींना पोलीस कोठडी

माजी आमदार भीमराव धोंडे यांना एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी.

पत्रकार इस्माईल दर्याणी उर्फ भैय्या बॉक्सर सह एका महिला आरोपीलां केल होत न्यायालयात हजर...

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात झाला होता गुन्हा दाखल.

या गुन्ह्यातील एक महिला अद्यापही फरार
कोतवाली पोलिसांकडून या महिलेचा शोध सुरू

29 Jun 2024, 17:26 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: शिवसेना शिंदे गटाचे बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी

शिवसेना शिंदे गटाचे बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आज कुंडलिक खांडे यांना अटक केल्यानंतर पक्षाकडून कारवाई करण्यात आली. 
काही दिवसापूर्वी कुंडलिक खांडे यांचं कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाला आणि त्यानंतर खळबळ उडाली. ऑडिओ क्लिपमध्ये पंकजा मुंडेंच्या पराभवासह धनंजय मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षविरोधी कार्य केल्याबद्दल कुंडलिक खांडे यांची हाकालपट्टी करण्यात आली. 

29 Jun 2024, 16:46 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी 

कोर्टाने अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केजरीवाल यांना 12 जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादर केले जाणार आहे.

 

29 Jun 2024, 15:29 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: हा सभागृहाचा हक्कभंग; विजय वडेट्टीवार यांनी CM एकनाथ शिंदेंवर घेतला आक्षेप

- अंतरिम अर्थसंकल्प मांडला अजून तो मंजूर झालेला नाही

- बजेट मंजूर झाल्यावर तो राज्यपालांकडे जातो, त्यानंतर योजना लागू होतात

- असं असताना आज मुख्यमंत्र्यांनी थेट जीआर पटलावर ठेवला
- हा सभागृहाचा हक्कभंग होतो
- बजेटला मान्यता मिळाली नसताना जीआर काढता येत नाही 

29 Jun 2024, 14:58 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: इंद्रायणी नदीच्या साफसफाईला काय निर्देश दिले आहेत - सचिन अहिर

- भीमा नदीवरून येणारी इंद्रायणी नदीला लौकिक मिळालं आहे

- 60 हुन जास्त कारखाने त्यांच्या बाजूला असून ग्रामस्थांनी पण तक्रार केली आहे

- सेंट्रल ट्रीटमेंट प्लॅन त्यात नाही आहे

- असे उत्सव असतात तेव्हादेखील साफसफाई केली जात नाही

- वारकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली आहे

- पण पाण्याचं स्रोत दूषित निघालं, त्याची दखल घेतली जात नाही

- शासनाला निर्देश द्या की इंद्रायणी नदीच्या साफसफाईला काय निर्देश दिले आहेत त्याची माहिती द्यावी

29 Jun 2024, 13:57 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: महायुती विधानसभा निवडणूक जिंकणार, आशिष शेलारांना विश्वास

- चार साडेचार तास यशस्वी बैठक झाली.
- या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुका महायुती म्हणून जिंकणार 
- रोडमॅप तयार केला
- सर्व मित्र पक्ष सोबत घेऊन महायुतीचे सरकार बनेल असा विश्वास आहे 
- काल एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी जो आर्थसंकल्प मांडला त्यात सर्व नागरिकांना केंद्रबिंदूला ठेवलं आहे 
- शेतकऱ्यांना वीजबिल माफ 
- महिलांना 3 सिलेंडर मोफत देणार
- येणाऱ्या 288 विधानसभा मध्ये भरीव कार्यक्रम घेऊन सहकारी पक्षाला घेऊन जाणार आहोत

आत्मविश्वास घेऊंन निवडणुकीत पुढे जाणार आहे

29 Jun 2024, 12:48 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणणार?

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी चारधाम यात्रेसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही लागू करू. योजना सुरू करताना नियमावली करू. रोटेशन पद्धतीने ठराविक संख्या ठरवूया, असं शिंदे म्हणाले आहेत.

29 Jun 2024, 12:42 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: कृषी पंपाचं बिल माफ करण्याची हिंमत आम्ही दाखवलीः मुख्यमंत्री शिंदे

29 Jun 2024, 12:41 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: 3 मोफत सिलेंडर मोफत दिल्याने विरोधक गॅसवरः मुख्यमंत्री शिंदेंचा टोला