12 Sep 2024, 21:33 वाजता
12 Sep 2024, 20:54 वाजता
कोलकाता डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. लोक हितासाठी राजीनामा देण्यास तयार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. ज्युनियर डॉक्टर संपावर आणि आंदोलनावर ठाम राहिल्याने ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केलंय. आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने कनिष्ठ डॉक्टरांशी सचिवालयात चर्चा घडवून आणली होती, मात्र सचिवालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांच्या 30 सदस्यीय शिष्टमंडळाने बैठक लाईव्ह करण्याची अट घातली. यानंतर चर्चा बिघडली.
12 Sep 2024, 19:28 वाजता
सरन्यायधीश यांनी अशा पद्धतीने राजकीय नेत्यासोबत खासगी भेटी करने सर्वस्वी चुकीचे आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गेल्या तीन वर्षांपासून चंद्रचूड यांच्यासमोर महाराष्ट्रच्या घटनाबाह्य सरकारचा खटला सुरु आहे. जेव्हा धनुष्यबाण आणि पक्ष मिंधे मुख्यमंत्र्यांना मिळाला तेव्हा ते म्हणाले होते की मोदी आणि शाह यांचा आभारी आहे, त्यांनी आम्हाला पक्ष आणि चिन्ह मिळवून दिलं त्यामुळे सरकार टिकलं. याचा अर्थ काय सर्वोच न्यायालय आणि निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थावर दबाव आणून त्यांना हे सरकारने दिलं असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. चंद्रचूड यांना पंतप्रधान भेटतात तेव्हा हा देशाच्या लोकशाहीला धोक्याची घन्टा वाजवणारा प्रसंग आहे. चंद्रचूड निवृत्त होतं आहेत, लवकरच ते एखाद्य मोठ्या पदावर दिसतील असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
12 Sep 2024, 18:51 वाजता
राहुल गांधींविरोधात भाजपने उद्या राज्यभर आंदोलन पुकारलं आहे. आरक्षण संदर्भातील वक्तव्य केल्यानं राहुल गांधींविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओ‘चा नारा देत भाजपकडून राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात तर आशिष शेलार, पंकजा मुंबईत आंदोलन करणार आहेत. मंत्री रवींद्र चव्हाण ठाण्यात तर गिरीश महाजन जळगावात आंदोलन करणार, पुण्यात चंद्रकांतदादा तर चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे.
12 Sep 2024, 17:23 वाजता
पुण्यातील गणपती विसर्जनात ढोल ताशा पथकामध्ये आता 30हून जास्त लोकं सहभागी होऊ शकणार आहेत. याबातच्या याचिकेवर सुनावणी करताना, तसा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. पुण्यात गणेश विसर्जनादरम्यान ढोलताशा पथकामध्ये जास्तीत जास्त 30 लोकांनीच सहभागी होण्याचे निर्बंध राष्ट्रीय हरित लवाद म्हणजेच NGTनं घातले होते. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्यात आली. त्यावर सुनावणी दरम्यान ढोलताशा पथकांवरील निर्बंध सुप्रीम कोर्टानं हटवले. तसंच NGTच्या आदेशालाही कोर्टानं स्थगिती दिली.
12 Sep 2024, 16:09 वाजता
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) नेते सीताराम येच्युरी यांचं निधन झालं. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक काळापासून ते आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्समध्ये उपचार सुरु होते. रुग्णालयात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. 1975 मध्ये ते भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य बनले
12 Sep 2024, 16:04 वाजता
कम्युनिस्ट नेते सीताराम येच्युरी यांचं निधन झालंय. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्समध्ये उपचार सुरु होते.
12 Sep 2024, 15:56 वाजता
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या सर्व आमदारांना आज सागर बंगल्यावर बोलवलं आहे. संध्याकाळी गणपती दर्शनानिमित्त आगामी निवडणुकीच्या दृष्टीने फडणवीस सर्व आमदारांसोबत अनऔपचारिक संवाद साधणार आहेत. आमदारांकडून मतदार संघाची माहिती फडणवीस जाणून घेणार आहेत.
12 Sep 2024, 15:19 वाजता
कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तोडले. पंचगंगा नदीत विसर्जन होऊ नये यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने बॅरिकेट्स लावले होते.
12 Sep 2024, 14:31 वाजता
कोस्टल रोड आणि वांद्रे सी-लिंकला जोडण्याचं काम पूर्ण झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते आज या मार्गाचं उदघाटन करण्यात आलं. त्यामुळे मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्र्यापर्यंत 12 मिनिटांत पोहोचता येणार आहे. या प्रकल्पामुळे 70 टक्के वेळ आणि 34 टक्के इंधनाची बचत होईल. कोस्टल रोडचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून, हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आलाय.