Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील बळीराजासाठी आनंदाची बातमी, पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ

Breaking News LIVE Updates : आजचा दिवस पावसाचा! असंच एकंदर चित्र आणि पावसाचे तालरंग पाहता म्हणावं लागेल. याव्यतिरिक्त आजच्या महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या? पाहा एका क्लिकवर...   

Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील बळीराजासाठी आनंदाची बातमी, पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ

Breaking News LIVE Updates : राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत असून, त्याचा परिणाम रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुकीवर होताना दिसत आहे. मागील 24 तासांपासून कोकण रेल्वेवर पावसाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचं पाहायला मिळत असून पुढील काही तास आता पाऊस नेमकं कोणतं रुप दाखवतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

दरम्यान, पावसाव्यतिरिक्त राज्यात इतरही कैक घडामोडी आणि घटना घडत असून, इथं तुम्हाला पाहता येतील सर्व अपडेट्स एका क्लिकवर... 

15 Jul 2024, 12:14 वाजता

Breaking News LIVE Updates : पूजा खेडकरांच्या कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु 

पूजा खेडकरांच्या कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु आहे. पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या खेडकर कुटुंबातील सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केलीत. पौड पोलिसांच्या मदतीने खेडकर कुटुंबाचा शोध घेतला जातोय. या सर्वांचे मोबाईल फोनही स्वीच ऑफ असल्याचं पोलीसांचं म्हणणंय. पुणे पोलिसांनी रविवारी खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील बाणेर भागातील बंगल्यात जाऊन तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र बंगल्याचं गेट बंद असल्याचं आढळून आल्यानंतर पोलिसांनी या बंगल्याचं चित्रीकरण केलं.

15 Jul 2024, 11:31 वाजता

Breaking News LIVE Updates : छगन भुजबळ वेटिंगवर 

शरद पवार यांची भेट घेण्यासाठी छगन भुजबळ सिल्वर ओक इथं पोहोचले खरे. मात्र शरद पवारांनी तिथं त्यांना वेटिंगवर ठेवल्याचं म्हटलं जात आहे. जवळपास अर्धा ते पाऊण तासापासून छगन भुजबळ वेटिंग वर... आता पुढे काय? 

15 Jul 2024, 11:21 वाजता

Breaking News LIVE Updates : भुजबळ-पवार भेट सामाजिक, विकासाच्या मुद्द्यांवर असू शकते

भुजबळ-पवार भेट सामाजिक, विकासाच्या मुद्द्यांवर असू शकते, असं स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. भुजबळ महायुतीतील महत्त्वाचे नेते आहेत. महायुती डॅमेज होईल असे भुजबळ निर्णय घेणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर भेटीचं कारण छगन भुजबळच सांगू शकतील, अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली. 

15 Jul 2024, 11:07 वाजता

Breaking News LIVE Updates : परदेशातून शेयर मार्केटमध्ये जास्त नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक

परदेशातून भारतातील नागरिकांना शेयर मार्केट ट्रेडिंगमध्ये जास्त नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या सायबर चोरट्यास नवी मुंबई सायबर पोलीसांनी सुरत विमानतळवरून अटक केलेय. कौशिककुमार इटालिया असे या सायबर चोरट्याचे नवं असून तो मूळचा सुरत येथील रहिवाशी आहे. कौशिककुमार हा दुबईवरून भारतातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना जास्त नफ्याचे आमिष दाखवून शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडत होता. नवी मुंबईतील एका व्यक्तीला 1 कोटी 23 लाख रुपयांना गंडा घातल्याच्या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपी विरोधात लुकआऊट नोटीस काढली होती. याच दरम्यान आरोपी सुरत विमानतळावर आल्यावर त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. नवी मुंबई सायबर पोलिसांनी सुरत विमानतळवरून आरोपी कौशिककुमारला अटक केली असून त्याचा देशभरातील 60 सायबर तक्रारीमध्ये सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर. 

15 Jul 2024, 10:29 वाजता

Breaking News LIVE Updates : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला 

राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. छगन भुजबळ शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती असून, भुजबळ -पवार भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे. या भेटीत मराठा आरक्षण, ओबीरी आरक्षण की आणखी कोणत्या मुद्द्यावर होणार चर्चा? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

बारामतीमधील महामेळाव्यात छगन भुजबळांनी नाव न घेता शरद पवारांवर आरोप केले. बारामतीतून फोन आला आणि विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकल्याचं भुजबळ म्हणाले. त्याला शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकार स्वत:च्या ट्रॅपमध्ये अडकलं असून आता त्यांना विरोधकांची आठवण येत असल्याचं म्हटलंय. तर सरकार बहुमतात असून निर्णय घेऊ शकतं असंही वडेट्टीवार म्हणालेत. 

15 Jul 2024, 10:24 वाजता

Breaking News LIVE Updates : विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला गालबोट लावल्या प्रकरणी कोल्हापूर पोलीस ऍक्शन मोडवर

विशाळगड परिसरात जाळपोळ , वाहनांची आणि घराची  तोडफोड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल. पुण्याचे रवींद्र पडवळ, बंडा साळोखे याच्यावर गुन्हा दाखल. संभाजी राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची सूत्रांची माहिती. विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला गालबोट लावल्या प्रकरणी कोल्हापूर पोलीस ऍक्शन मोडवर. शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये 500 हून अधिक लोकाच्यावर गुन्हा दाखल. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आल्याची माहिती. कलम  132,  189 ( 2), 190, 191 (2) , 191 (3),323, 298, 299 (49), 189 (5 ) यासह  पोलीस अधिनियम 37 (1) उल्लघन 135  या नुसार गुन्हा दाखल.

15 Jul 2024, 10:15 वाजता

Breaking News LIVE Updates :  पूजा खेडकर परिवाराकडून पंकजा मुंडेसाठी देवीला मुकुट अर्पण 

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून नगर जिल्ह्यातील मोहटा देवीला दीड किलो चांदीचा मुकुट अर्पण करण्याचा नवस केला होता आणि त्यानुसार हा चांदीचा मुकुट 22 मार्च रोजी अर्पण करण्यात आला होता. पंकजा मुंडे यांच पक्षकडून पुनर्वसन व्हावं आणि त्यांना पद मिळावं अस साकडं खेडकर यांनी देवीला घातलं हाकत भाजप कडून पंकजा यांना राज्यसभे ऐवजी लोकसभेची उमेदवारी मिळाली तरी देखील खेडकर यांनी चांदीचा मुकुट देवीला अर्पण केला. नंतर काही दिवसांनी दिलीप खेडकर यांनी अहमदनगर लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली.

15 Jul 2024, 09:48 वाजता

Breaking News LIVE Updates :  अलिबाग पेण मार्गावर एसटीचा अपघात 

अलिबाग पेण मार्गावर कार्लेखिंड इथं एस टी बसला अपघात झाला. अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी एका बाजूला बॅरीगेटवर कलंडली. बसमधील प्रवाशांना सुखरूप खाली उतरवून पोलीस व अन्य यंत्रणांच्या सहाय्याने गाडी सरळ करण्यात आली. ही बस अलिबाग हून पनवेलकडे निघाली होती. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.

15 Jul 2024, 09:18 वाजता

Breaking News LIVE Updates : पूजा खेडकर यांचं दिव्यंग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाण्याची शक्यता

वादाच्या भोवऱ्याच अडचलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं दिव्यंग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाण्याची शक्यता. पूजा खेडकर यांचं दिव्यंग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाण्याची शक्यता असून, त्यांचं दिव्यंग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची ही होणार चौकशी. थेट पीएमओ कार्यालयाने घेतली दखल. 

15 Jul 2024, 09:09 वाजता

Breaking News LIVE Updates : पुण्यात झिका रुग्णांची संख्या वाढली

पुण्यात झिका रुग्णांची संख्या 23 वर; तर राज्यात 25 रुग्णांची नोंद. कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये झिकाचं सावट आणखी गडद होताना दिसत असून, दोन्ही शहरात प्रत्येकी एक रुग्ण तर एकट्या पुणे जिल्ह्यात 23 रुग्ण आहेत. महिला, पुरुष आणि तरुणांचा रुग्णांमध्ये समावेश मात्र लहान मुलांना धोका नसल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये गर्भवती स्त्रियांना धोका कायम, बाळाचा मेंदू लहान होण्याची शक्यता आणि मुदतपूर्व प्रसूतीचीदेखील भीती असते असं सांगितलं जात आहे.