Breaking News LIVE Updates : राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत असून, त्याचा परिणाम रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुकीवर होताना दिसत आहे. मागील 24 तासांपासून कोकण रेल्वेवर पावसाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचं पाहायला मिळत असून पुढील काही तास आता पाऊस नेमकं कोणतं रुप दाखवतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.
दरम्यान, पावसाव्यतिरिक्त राज्यात इतरही कैक घडामोडी आणि घटना घडत असून, इथं तुम्हाला पाहता येतील सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
15 Jul 2024, 09:07 वाजता
Breaking News LIVE Updates : पुण्यात आता मुंबई प्रमाणे येणार डबल डेकर बस
पीएमपी संचालकांच्या बैठकीत बस खरेदीस मान्यता मिळाल्यानंतर आता पुण्यात मुंबई प्रमाणे डबल डेकर बस येणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून, पीएमपी आणखी 100 नवीन इलेक्ट्रिक बस खरेदी करणार आहे. त्यात 20 डबल डेकर बस असतील असं सांगण्यात येत आहे.
15 Jul 2024, 08:11 वाजता
Breaking News LIVE Updates : सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवाशी सुरू आहे खेळ
राज्याच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत पुणे जिल्ह्यातही सध्या जोरदार पाऊस बरसत असून पुणे नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असं म्हणण्याची वेळ सध्या आली आहे कारण पुणे नाशिक महामार्गावरील खेड बायपास घाट सुरू होऊन चार वर्ष झाली मात्र जो डोंगर फोडून हा बायपास घाट बनवला त्या डोंगराला कुठली संरक्षक भिंत किंवा जाळी मारलेली नाही त्यामुळे या परिसरात जर पावसाचा जोर आजून वाढला तर हा डोंगराचा तुटलेला भाग कधी हि खाली येऊन मोठी दुर्घटना होऊ शकते मात्र याकडे महामार्ग प्राधिकरणाने सर्रास दुर्लक्ष केलं आहे.
15 Jul 2024, 07:59 वाजता
Breaking News LIVE Updates : लोणावळ्यात मागील 24 तासांत 169 मिलीमीटर पावसाची नोंद
लोणावळ्यात मागील 24 तासांत 169 मिलीमीटर पावसाची नोंदझाली आहे. लोणावळ्यात मुसळधार पाऊस दोन दिवसांपासून सुरु आहे, मागील 24 तासांत लोणावळ्यात तब्बल 169 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांना पावसात भिजण्याचा आनंद घेण्याची जणू काही पर्वणी मिळाली आहे. मात्र या पावसामुळे लोणावळ्यातील अनेक धरणातील पाणलोट क्षेत्रात वाढ झाली असून टाटा धरण भरू लागले आहे. मागच्या आठवड्यात येथील पाणीसाठा खालावला होता.
15 Jul 2024, 07:56 वाजता
Breaking News LIVE Updates : मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत
गोरखपूर एक्सप्रेसला ब्रेक लायनरला आग लागल्यामुळं कल्याण -मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. ठाकुर्ली रेल्वे स्टेशन जवळील घटनेमुळं मध्य रेल्वेसेवा विस्कळीत.
15 Jul 2024, 07:48 वाजता
Breaking News LIVE Updates : राज्यात पावसाचे अलर्ट खालीलप्रमाणं लागू...
रत्नागिरी - रेड अलर्ट
रायगड - ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्ग - ऑरेंज अलर्ट
पुणे - ऑरेंज अलर्ट
कोल्हापूर - ऑरेंज अलर्ट
सातारा - ऑरेंज अलर्ट
परभणी - ऑरेंज अलर्ट
हिंगोली - ऑरेंज अलर्ट
अमरावती - ऑरेंज अलर्ट
वर्धा - ऑरेंज अलर्ट
यवतमाळ - ऑरेंज अलर्ट
मुंबई - यलो अलर्ट
ठाणे - यलो अलर्ट
15 Jul 2024, 07:43 वाजता
Breaking News LIVE Updates : कोकण रेल्वे अजूनही ठप्पच
अनेक तास उलटूनही कोकण रेल्वे अजूनही ठप्पच. रविवारी रात्रीपासून कोकण रेल्वे ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. दिवाणखवटीत रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने कोकण रेल्वेच्या मुंबईकडे जाणा-या आणि मुंबईहून येणा-या सर्व गाड्या रखडल्या आहेत. त्यामुळे तेजस, तुतारी, कोकणकन्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. ट्रेन रखडल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरच झोपून रात्र काढण्याची वेळ आलीय.