Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील बळीराजासाठी आनंदाची बातमी, पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ

Breaking News LIVE Updates : आजचा दिवस पावसाचा! असंच एकंदर चित्र आणि पावसाचे तालरंग पाहता म्हणावं लागेल. याव्यतिरिक्त आजच्या महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या? पाहा एका क्लिकवर...   

Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील बळीराजासाठी आनंदाची बातमी, पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ

Breaking News LIVE Updates : राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत असून, त्याचा परिणाम रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुकीवर होताना दिसत आहे. मागील 24 तासांपासून कोकण रेल्वेवर पावसाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचं पाहायला मिळत असून पुढील काही तास आता पाऊस नेमकं कोणतं रुप दाखवतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

दरम्यान, पावसाव्यतिरिक्त राज्यात इतरही कैक घडामोडी आणि घटना घडत असून, इथं तुम्हाला पाहता येतील सर्व अपडेट्स एका क्लिकवर... 

15 Jul 2024, 19:58 वाजता

Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील बळीराजासाठी आनंदाची बातमी

केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत येत असलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा भरण्याची मुदत वाढवली

31 जुलै पर्यंत पीकविमा भरण्याची दिली मुदतवाढ

राज्य सरकारने केंद्राकडे मुदत वाढवण्याची केली होती मागणी

15 Jul 2024, 19:01 वाजता

कोकण रेल्वे मार्गावरील दरड हटवली, 25 तासानंतर मांडवी एक्स्पेस रवाना

 

15 Jul 2024, 17:52 वाजता

Breaking News LIVE Updates: निवडणुकीनंतर शरद पवार ॲक्शन मोडमध्ये, 6 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

शरद पवार महाराष्ट्राच्या सहा दिवस दौऱ्यावर.‌

आजच शरद पवार पुण्याला रवाना. दुपारी तीन वाजता पुणेसाठी रवाना झाले. 

परवा शरद पवार यांचा पुणे येथे बालगंधर्व येथे कार्यक्रम. 

शरद पवारांची प्रकृती बरी असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.

15 Jul 2024, 17:34 वाजता

Breaking News LIVE Updates: येणारी विधानसभा आम्ही महायुती म्हणूनच लढणार - अजित पवार
 

येणारी विधानसभा आम्ही महायुती म्हणूनच लढणार. 
 महायुतीचा चेहरा एकनाथ शिंदेच राहणार. 
बारामतीत अजित पवार लढणार की पार्थ पवार? 
अजित पवार म्हणाले पक्षांतर्गत बैठकीत हा निर्णय ठरवला जाणार.
या लोकसभेला  भारतीय जनता पक्षाने सर्व केले होते. 
यंदा आम्ही देखील सर्वे करणार आहोत. 
भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) बैठकीत प्रत्येक पक्ष आपला सर्वे समोर ठेवेल. त्यानंतर निर्णय घेतले जातील

15 Jul 2024, 16:54 वाजता

Breaking News LIVE Updates: विशाळगड प्रकरणी खासदार शाहू छत्रपती यांची भूमिका 

विशाळगड प्रकरणी खासदार शाहू छत्रपती यांची भूमिका 

विशाळगडावरील अतिक्रमणे सरसकट हटवण्यात यावी , कोणताही दुजाभाव करू नये 

उद्या घटनस्थळी पाहणी करणार

-----------

विशाळगड येथील अतिक्रमणे हटवण्याच्या निमित्ताने झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा असून घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना घडली, हे अत्यंत क्लेशदायक आहे.
यासंदर्भात प्रशासनाने विशाळगड प्रश्न गांभीर्याने घेऊन माजी खासदार संभाजीराजे व मुख्यमंत्री यांची भेट तसेच चर्चा घडवून आणावी अशा सूचना आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना या घटनेपूर्वी दिल्या होत्या. परंतु, राज्यशासन, प्रशासन आणि पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती खबरदारी गांभीर्याने घेतली नाही, त्यामुळे ही घटना घडली. हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे. राज्यसरकारने रविवारी अतिक्रमण काढण्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला जे आदेश दिले तेच आदेश या पूर्वी दिले असते तर ही घटना टळली असती. या हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी.
माजी खासदार संभाजीराजे यांनी याप्रश्नी आंदोलनाचे नेतृत्व केले आणि सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली. परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला, त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात तीव्र निषेध करतो.
हिंसाचारामध्ये ज्या निष्पाप लोकांचे नुकसान झाले, त्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी. सरकारने काही केले नाही, तर कोल्हापूरची जनता त्यासाठी पुढाकार घेईल.
उद्या (मंगळवारी) आम्ही घटनास्थळी भेट देवून पाहणी करणार आहोत. कोणत्याही समाजघटकांवर अन्याय होत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे.
विशाळगडावरील अतिक्रमणे सरसकट काढण्याची कारवाई प्रशासनाने तातडीने करावी. त्या संदर्भात कोणताही दुजाभाव केला जाऊ नये.

15 Jul 2024, 15:57 वाजता

Breaking News LIVE Updates : हवामान विभागाकडून अलर्ट जारी

ठाणे, मुंबई जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट.  
रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्याने दिला रेड अलर्ट.
पुणे सातारा जिल्ह्यालाही हवामान खात्याचा रेड अलर्ट. 
कोल्हापूर, संभाजीनगर, जालना परभणी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी.

 

15 Jul 2024, 15:30 वाजता

Breaking News LIVE Updates : कोकण रेल्वे तब्बल 21 तासांहून अधिक काळ ठप्प

रत्नागिरी - कोकण रेल्वे तब्बल 21 तासांहून अधिक काळ ठप्प

रुळावर आलेली माती काढण्याचे काम सुरुच

एक ते दिड तासांनी रेल्वे मार्ग सुरु होईल

15 Jul 2024, 14:55 वाजता

Breaking News LIVE Updates : महायुतीत विधानसभा जागा वाटपासंदर्भात लवकरच चर्चा 

सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा जागा वाटपासंदर्भात लवकरच महायुतीत चर्चा होणार आहे. जागा वाटपाबाबत तिन्ही नेत्यांमध्ये एकमत आहे. जागावाटप झाल्यानंतर आपापले उमेदवार लवकरात लवकर जाहीर करण्यात येणार आहेत. लोकसभेत उमेदवार उशिराने जाहीर केल्यामुळे  महायुतीला फटका बसला होता. 

 

15 Jul 2024, 13:26 वाजता

Breaking News LIVE Updates :  कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी कणकवलीतून एसटीच्या 17  गाड्या

कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एसटीच्या 17 गाड्या कणकवली स्टेशनवरून सोडण्यात आल्या आहेत.कणकवली रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी पुढील प्रवासासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून एसटीच्या 17 गाड्या सोडण्यात आल्या. वृद्ध,अपंग आणि आजारी प्रवाशांसाठी एका स्लीपर बसचीही सोय करण्यात आली आहे. मंगलोर एक्स्प्रेस पहाटे पासून कणकवली स्थानकात थांबून आहे.अखेर ही ट्रेन रद्द करण्यात आली.सहा सात तासांनंतर अडकलेले प्रवासी बसने मुंबईच्या दिशेने रवाना. प्रवाशांना दिलासा मिळाला असून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

15 Jul 2024, 13:01 वाजता

Breaking News LIVE Updates :  शरद पवारांसोबतची भेट नेमकी कशासाठी? छगन भुजबळ म्हणाले... 

राज्यात आरक्षणांच्या मुद्द्यांवर बिघडलेल्या परिस्थितीवर भाष्य केलं. ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणप्रश्नीसुद्धा चर्चा केली, असं म्हणज छगन भुजबळ यांनी अखेर शरद पवार यांची भेट ता घेतली, यासंदर्भातील हेतू समोर आणला. राज्यात शांतता पाहिजे आणि ही तुमची जबाबदारी असल्यामुळं तुम्ही पुढाकार घेतला पाहीजे, असं भुजबळांनी या भेटीदरम्यान पवारांना सांगितलं.