Breaking News LIVE: राज्यात तुफान पाऊस; उद्या सकाळी 8.30 वाजेपर्यंत मुंबईला रेड अलर्ट

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभातील सर्व घडामोडी एका क्लिकवर 

Breaking News LIVE:  राज्यात तुफान पाऊस; उद्या सकाळी 8.30 वाजेपर्यंत मुंबईला रेड अलर्ट

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

25 Sep 2024, 18:56 वाजता

मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या लोकल 10 ते 15 मिनीटे उशीराने धावत आहेत. 

25 Sep 2024, 16:31 वाजता

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील त्यांचं उपोषण स्थगित केले आहे. उपोषणाच्या नवव्या दिवशी त्यांनी स्थिगीतीची घोषणा केली आहे. पाणी पिऊन जरांगे यांनी उपोषण सोडले आहे. 

25 Sep 2024, 16:21 वाजता

बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी नेमण्यात आलेल्या CID पथकाने घेतली पुन्हा मुंब्रा पोलिसांची भेट घेतली आहे.  ठाण्यातील मुंब्रा बायपास मार्गावर घडलेली घटना मुंब्रा पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली आहे .

25 Sep 2024, 14:01 वाजता

मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित 

नवव्या दिवशी उपोषण स्थगित 
कोर्टाने उपचार घ्यायला सांगितलं - जरांगे 
संध्याकाळी 5 वाजता अधिकृत घोषणा करणार 

 

25 Sep 2024, 13:55 वाजता

मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित 

मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित 
नवव्या दिवशी उपोषण स्थगित 
सलाईन लावून उपोषण करणं आवडत नाही 

 

25 Sep 2024, 12:08 वाजता

जरांगेंची प्रकृती खालावली, उपोषणाचा 9 वा दिवस

 पृथ्वीराज चव्हाणांनी जरांगेंच्या प्रकृतीची चिंता 
मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून गंभीर पावलं उचलावीत 
जरागेंनी दिलेला शब्द मोडला 

25 Sep 2024, 11:34 वाजता

स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 91 वी जयंती निमित्त  माथाडी कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाज आणि माथाडी कामगार वर्गावर भाष्य केलं. 

*  आमच्या माथाडी कामगार करीता अण्णासाहेब यांनी संघर्ष केला 
* या कामगारांच काय होईल, असा प्रश्न त्यांच्या मनात होता. त्यामुळे अण्णासाहेब यांनी लढा उभारला यामुळे कामगारांना कायदा मिळाला. 
 माथाडी कामगारांचे प्रश्न आम्ही  सोडवू , अण्णासाहेब पाटील यांनी मराठासाठी बलिदान दिले.  या समाजाला प्रतिनिधीत्व मिळालं पाहिजे , आर्थीक निकषावर मागास समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे.  यासाठी चळवळ अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केली, अजून अनेक अडचणी आहेत , मी मुख्यमंत्री असे पर्यंत ते सर्वच्च  न्यायालयात पर्यंत टिकलं ,मात्र नंतर ते टिकलं नाही ,पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 10 टक्के आरक्षण दिले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मराठा समाजाला आरक्षण  मिळायला हवे 

आपण  मागच्या  काळात ,इतका मोठा समाज आहे. सगळ्याच कल्याण व्हावे यासाठी सारथीची निर्मिती केली, यातून मराठा समाजाचे तरुण अधिकारी बनले. 

25 Sep 2024, 10:10 वाजता

संजय राऊतांची सरकारवर टीका 

गृहमंत्री काश्मीर; लडाखला गेले नाहीत - राऊत 
महाराष्ट्रात आढावा घेण्यासाठी आले - राऊत 
राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न 
अमित शाह यांचा मुलगा आला तरी स्वागताला जातील - राऊत 
धोका कोणी कुणाल दिला हे महाराष्ट्राला माहित आहे - राऊत 

25 Sep 2024, 10:06 वाजता

संजय राऊतांची सरकारवर टीका 

गृहमंत्री काश्मीर; लडाखला गेले नाहीत - राऊत 
महाराष्ट्रात आढावा घेण्यासाठी आले - राऊत 
राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न 

25 Sep 2024, 09:55 वाजता

कायद्यात बदल करा आणि भर चौकात एन्काऊंटर करा - वड्डेटीवार 

- शिंदेचा खासदार श्रेय घेत आहे, बेकायदा एन्काऊंटर केला,कायदाने शिक्षा झाली पाहिजे...भाजप आणि संघ कार्यकर्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे, संस्था चालक घरी बसून आराम करत आहे, पोलीस सांगतात फरार आहे.

- संस्था चालक RSS चे प्रमुख व्यक्ती असल्याने त्यांना अटक झाली नाही कारवाई केली नाही, माझा दावा आहे ते घरी आहे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असून रडीचा डाव आहे.