Maharashtra Breaking News Today: मुंबईसह राज्यात पावसाने धुमशान घातलं आहे. अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, रायगड जिल्ह्यातील काही भागात शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दाही गाजतोय. राज्यातील सर्व घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या.
22 Jul 2024, 11:55 वाजता
Maharashtra Breaking News Today : चंद्रपुरात पावसामुळे नुकसान
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे उमा नदीच्या पुराने काठावरील शेतीचे मोठे नुकसान केले आहे. पात्र सोडून पुराचे पाणी शेतात शिरले. मूल शहराच्या वेशीपर्यंत हे पाणी पसरले.
22 Jul 2024, 11:55 वाजता
Maharashtra Breaking News Today : भंडारा जिल्ह्यात पुरानं हाहाकार
भंडारा जिल्ह्यात पुरानं हाहाकार माजवलाय. ओपारा गावाला पुराचा सर्वाधिक फटका बसलाय. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं संपूर्ण गावात पाणी शिरलंय. जवळपास 300हून जास्त घरांमध्ये पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत. नागरिकांवर रात्र जागून काढण्याची वेळ आली. पुरात वाहून जाणा-या एकाला वाचवण्यात बचाव पथकाला यश आलंय. दरम्यान सध्या पूरग्रस्त नागरिकांना शासकीय गोदामात स्थलांतरित करण्याच्या सूचना तालुका प्रशासनानं दिल्यात.
22 Jul 2024, 11:19 वाजता
Maharashtra Breaking News Today : मुंबईतील मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना, ऑडी कारची 2 रिक्षांना धडक
मुंबईतील मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना समोर आलीय. ऑडी कारने दोन रिक्षांना धडक दिलीय. या घटनेनंतर ऑडी कार चालक फरार झालाय. या घटनेत रिक्षा चालक आणि दोन प्रवासी जखमी झालेयत. रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर सांगण्यात आली आहे. अपघातात रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर मुलुंड पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय.
22 Jul 2024, 10:23 वाजता
Maharashtra Breaking News Today : नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर
नवी मुंबईत पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागांत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. दुपारी बारापासून भरती असल्यामुळे पाणी भरण्याची शक्यता असलेल्या परिसरातील शाळांमधील सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना अकरा वाजता शाळेतून सोडण्यात येणार.तर दुपार सत्रातील शाळांना सुट्टी देण्यात येणारेय.
22 Jul 2024, 10:20 वाजता
Maharashtra Breaking News Today : सांगली - कृष्णा, वारणेच्या पाणीपातळीत वाढ
सांगलीमध्ये पडणा-या संततधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ झालीय.वारणा नदीकाठी पूर सदृश परिस्थिती निर्माण झालीय. तर शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये ढगफुटी झाली. त्यामुळे चांदोली धरण 78 टक्के भरलंय. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत एका दिवसात तब्बल 6 फुटानं वाढ होऊन याची सांगलीतली पाण्याची पातळी 24 फुटांवर पोहोचलीय.
22 Jul 2024, 10:16 वाजता
Maharashtra Breaking News Today : मुंबईत पुढील 24 तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता, तिन्ही मार्गावरील लोकल ट्रेन उशीरानं, रस्ते वाहतूकही मंदावली
कल्याण-डोंबिवलीत पहाटेपासून जोरदार पाऊस सुरुय. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालीय. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी साचलंय. कल्याण स्टेशन रोडही पाण्याखाली गेलाय. कपोते वाहन तळ ते कल्याण स्पेशन रोडवर गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीय. पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची तारांबळ उडतेय. पावसाचा जोर अजूनही कल्याण डोंबिवली भागात कायम आहे.
22 Jul 2024, 10:15 वाजता
Maharashtra Breaking News Today : अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीतील शाळा कॉलेज आज बंद
अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीतील शाळा कॉलेज आज बंद असणार आहे. तर रायगडमधील महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत या तालुक्यातील शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
22 Jul 2024, 10:14 वाजता
Maharashtra Breaking News Today : फडणवीसांच्या ठोकून काढा या विधानावर राऊतांनी हल्लाबोल
फडणवीसांच्या ठोकून काढा या विधानावर राऊतांनी हल्लाबोल चढवलाय...ठोकून काढा म्हणजे काय...? गृहमंत्री गुंडांची भाषा वापरतायत....गृहमंत्रिपदाचा राजीनामा देऊन ठोकशाहीची भाषा करून दाखवा...आणि दम असेल तर ईडी, सीबीआय बाजूला ठेवून मैदानात या असं आव्हान राऊतांनी दिलंय...कालच फडणवीसांना कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना विरोधकांना उत्तर देताना आदेशाची वाट पाहू नका...मैदानात उतरून ठोकून काढा असा आदेश दिला...त्यावरून राऊतांनी समाचार घेतलाय...
22 Jul 2024, 10:01 वाजता
Maharashtra Breaking News Today: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये वाढ
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये आतापर्यंत 47.39 टक्केपाणीसाठा. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी आहे. सगळ्यात कमी पाणीसाठा अप्पर वैतरणा धरणात आहे.तर तुळसी धारण ओसंडून वाहत आहे
22 Jul 2024, 09:32 वाजता
Maharashtra Breaking News Today: फडणवीसांचा नागपुरात पराभव करणारच: संजय राऊत
विधानसभेत आम्ही 185 जागा जिंकू, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर, देवेंद्र फडणवीसांचा नागपुरात पराभव झाल्याशिवाय राहणार नाही, असंही राऊत म्हणाले आहेत.