Maharashtra Breaking News Today: मुंबईसह राज्यात पावसाने धुमशान घातलं आहे. अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, रायगड जिल्ह्यातील काही भागात शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दाही गाजतोय. राज्यातील सर्व घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या.
22 Jul 2024, 21:49 वाजता
Maharashtra Breaking News Today : ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचं प्रकाश आंबेडकरांकडून छगन भुजबळांना निमंत्रण
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते छगन भुजबळ यांना ई-मेलद्वारे निमंत्रण पाठवले आहे. ॲड. आंबेडकर यांनी याची माहिती त्यांच्या एक्स हॅंडलवर पोस्ट करुन दिली आहे. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा २५ जुलैला चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे.
22 Jul 2024, 20:02 वाजता
Maharashtra Breaking News Today : काँग्रेसची उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक, दुपारी 3 वाजता बैठक होणार
महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यासह महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बैठकीला महत्व आहे. संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांच्यासोबत होणार बैठक
22 Jul 2024, 18:19 वाजता
Maharashtra Breaking News Today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट महत्वाची मानली जातेय. सह्याद्री अतिथी गृहावरील बैठक संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सागर बंगल्यावर जावून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. राजकीय दृष्ट्या ही भेट फार महत्वाची मानली जातेय.
22 Jul 2024, 17:06 वाजता
Maharashtra Breaking News Today : मनोज जरांगेंची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा लाखो मराठा विद्यार्थ्यांना लाभ
Maharashtra Breaking News Today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंची मागणी मान्य केलीय.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयाने लाखो मराठा विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.. 2024-2025 या वर्षासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सरकारने वाढवली आहे.. अर्ज केल्यापासून सहा महिन्यांपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आलीय.. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना 6 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय.
22 Jul 2024, 15:33 वाजता
Maharashtra Breaking News Today : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डोंबिवली-ठाकुर्ली स्थानकादरम्यान एक्सप्रेसचे इंजिन पडलं बंद
लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या देखील यामुळे रखडल्या आहेत. विशेषतः कल्याण, अंबरनाथ बदलापूर ,कर्जत, कसारा या मार्गाकडे जाणाऱ्या लोकलवर याचा परिणाम झालाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलहुन मऊ एक्सप्रेस निघाली होती. मात्र ती डोंबिवली आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान येतात तिचे इंजिन बंद पडले. त्यामुळे तिच्या मागोमाग अनेक लोकल उभ्या आहेत. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या देखील पुढे जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी लोकलमधून खाली उतरून ट्रक मधून चालणं पसंत केलं.
22 Jul 2024, 13:55 वाजता
Maharashtra Breaking News Today : जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी निराशाजनक बातमी
जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी निराशाजनक बातमी आली आहे. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नाही, असं लेखी उत्तर केंद्र सरकारने दिलंय. जुन्या पेन्शन योजनेबाबत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला होता. जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का? या प्रश्नांवर जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नाही, असं उत्तर दिलंय. गेल्या अनेक वर्षापासून सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक आहेत.
22 Jul 2024, 12:04 वाजता
Maharashtra Breaking News Today : पुराचे पाणी थेट शेतात शिरलंय
यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील मोझर इजारा गावालगतचा नाला फुटलाय.... त्यामुळे पुराचे पाणी थेट शेतात शिरलंय... यावेळी पाण्याच्या वेगाने शेतातील पिकं आणि जमीन खरडून निघालीये..... अनेक शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय...प्रशासनाने ताबडतोब भरपाई द्यावी अशी मागणी शेतक-यांनी केलीये...
22 Jul 2024, 12:00 वाजता
Maharashtra Breaking News Today : साता-यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस
साता-यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात मुसळधार पाउस पडतोय. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झालीय. गेल्या 24 तासांत धरणात 6 टीएमसी पाणीसाठा वाढलाय. धरणात 69 हजार 519 क्युसेक येवढ्या वेगाने पाण्याची आवक सुरूये.
22 Jul 2024, 11:59 वाजता
Maharashtra Breaking News Today : सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये धुंवाधर पाऊस
सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये धुंवाधर पाऊस पडतोय. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तर अतिवृष्टी कायम आहे. गेल्या 24 तासात या ठिकाणी तब्बल 148 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
22 Jul 2024, 11:58 वाजता
Maharashtra Breaking News Today : कोल्हापुरात पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली
पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडलीय. 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालीय. पंचगंगेची आता धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरुय. त्यामुळे कोल्हापूर प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. संध्याकाळपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी आणखी एक ते दीड फुटाने वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.