Maharashtra Breaking News LIVE: जालन्यात काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळली, 5 जणांचा मृत्यू

Maharashtra Breaking News Today LIVE Updates July 18: राज्यासह देशविदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या

Maharashtra Breaking News LIVE: जालन्यात काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळली, 5 जणांचा मृत्यू

Maharashtra Breaking News LIVE: मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण तापले आहे. त्यामुळं राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. त्याचबरोबर, मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस होत आहेत. राज्यासह देशविदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया या ब्लॉगच्या माध्यमातून

18 Jul 2024, 09:52 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याची दहशत, मॉलमध्ये आढळला बिबट्या

संभाजीनगर मध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे त्याला पकडण्यासाठी वनविभागाने उल्कानगरीत पिंजरे लावले आहेत  मात्र बिबट्या तिथून तब्बल सहा ते सात किलोमीटर दूर एका मॉल बाहेर आढळून आला

18 Jul 2024, 09:36 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर पोलिसांच्या ताब्यात

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेतकऱ्यांना पिस्तुल दाखवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

18 Jul 2024, 09:32 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: बीड: माजी मंत्री सुरेश नवले यांच्या पीए वर कोयत्याने वार

नऊच्या सुमारास सुरेश नवले यांच्या पीए वर हल्ला करण्यात आला. दोघाजणांनी गाडीवरून दुकानात घुसून केला कोयत्याने वार. हल्ल्यामध्ये नवले यांचे पीए जखमी

18 Jul 2024, 09:31 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पिंपरी- चिंचवडच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसोबत अजित पवारांची बैठक सुरू 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यात बैठका सुरू आहे. काल पिंपरी चिंचवड मधील आजी-माजी 20 नगरसेवकांनी अजित पवार पक्षाला सोडचिट्टी देत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला त्या अनुंगाने पिंपरी चिंचवड मधील आजी माजी नगरसेक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली

18 Jul 2024, 09:29 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पुणे शहरात झिका आजाराच्या आणखी ३ रुग्णांची नोंद

पुणे शहरात झिका आजाराच्या आणखी ३ रुग्णांची नोंद; शहरातील झिकाच्या रुग्णसंख्या २४ वर. लोहगावमधील ४९ वर्षीय पुरुष, सहकारनगरमधील १४ वर्षीय मुलगी आणि कोथरूडमधील २७ वर्षीय महिलेचा समावेश

18 Jul 2024, 09:04 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मुंबईत पावसामुळे डेंगी, लेप्टो, एच-१ एन-१ फोफावतोय

मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून आता डेंगी, लेप्टो आणि एच१एन१ म्हणजेच स्वाईन फ्लू या पावसाळी आजारांनी डोके वर काढले आहे. चिकनगुनियाचे रुग्णही सापडू लागले असून पालिकेच्या केईएम रुग्णालयात ओपीडीला तापाचे रुग्ण येत आहेत. 

18 Jul 2024, 09:03 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

सकाळपासून होणाऱ्या पावसामुळं गोरेगाव ते अंधेरी दरम्यान मोठी वाहतूक कोंडी 

18 Jul 2024, 08:19 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मुंबईत पावसाचा जोर; पुढील 3-4 तास महत्त्वाचे 

मध्यरात्रीपासून मुंबईत ठिकठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. मुंबईत पुढील ३-४ तास पावसाची संततधार कायम राहणार, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. सकाळी ५.३० वाजे पर्यंत दक्षिण मुंबईत ५१.८ मिमी पावसाची नोंद तर पश्चिम उपनगरात २७ मिमी पाऊस. रेल्वे वाहतूक दहा ते पंधरा मिनिटे उशिराने तर रस्ते वाहतूक सुरळीत आहे.