Maharashtra Breaking News Today LIVE Updates : साताऱ्यात हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीनंतर धिंगाणा

Maharashtra Breaking News Today LIVE Updates :  महाराष्ट्रात आजच्या दिवसभरात नेमकं काय घडतंय हे थोडक्यात एका क्लिकवर जाणून घ्या.

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : साताऱ्यात हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीनंतर धिंगाणा

Maharashtra Breaking News Today LIVE Updates :  राज्य-देशभरातील बातम्या आणि घडामोडींचा आढावा ब्लॉगच्या माध्यामातून जाणून घेऊया. 

12 Dec 2024, 15:57 वाजता

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधानावर होणार चर्चा

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या आठवड्यात संविधानावर चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त लोकसभेत झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत. काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या अध्यक्षांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, ज्यामध्ये सर्व पक्षांनी संविधानावर चर्चा करण्याचे मान्य केले होते.

12 Dec 2024, 15:56 वाजता

सतीश वाघ खून प्रकरणी आरोपींना 20 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

सतीश वाघ अपहरण आणि खून प्रकरणी आरोपींना 20 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सतीश वाघ हे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत. पाच लाखांची सुपारी देऊन त्यांचा खून करण्यात आला होता. भाडेकरूनेच हा कट रचला आणि गुन्हा घडवून आणल्याची माहिती समोर येत आहे.

12 Dec 2024, 15:54 वाजता

साताऱ्यात हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीनंतर धिंगाणा

साता-याच्या कास भागातील हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी. पार्टीत बारबाला नाचवल्याचा आरोप.. दारून पिऊन धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ व्हायरल...

12 Dec 2024, 14:15 वाजता

मुख्यमंत्र्यांची घोषणा लाडक्या बहिणींना आता मिळणार 2100

निवडणूकीनंतर महिलांना 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा. महाराष्ट्रानंतर आता दिल्लीत लाडकी बहीण योजना. महिलांना नोंदणी करण्याचं अरविंद केजरीवाल यांचं आवाहन. 

12 Dec 2024, 13:53 वाजता

मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांचा फोन 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले होते. 

शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी फोनवरून केले होते फडणवीसांटेअभिनंदन, सूत्रांची माहिती. 

शपथविधी पूर्वी फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांना दिलं निमंत्रण होतं. 

शपथविधी सोहळ्याला गैरहजर असले तरी ठाकरेंनी फडणवीस यांना फोन करून दिल्या शुभेच्छा.

12 Dec 2024, 13:40 वाजता

स्मार्ट मीटर बसवणं म्हणजे लोकांना लुटण्याचं काम - अनिल परब

आज अदानी इलेक्ट्रिसिटी संदर्भात अनेक तक्रारी ग्राहकांकडून मिळाल्याचं सांगत अनिल परब म्हणाले, 'त्या सगळ्या संदर्भात आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आलो आहोत.  स्मार्ट मीटर लावण्याचं काम अदानी इलेक्ट्रिसिटीकडून केले जात आहे आणि हे स्मार्ट मीटर म्हणजे लोकांना लुटण्याचं काम आहे. याबाबत आम्ही व्यवस्थापनाला बोलायला आलो आहोत.  वाढीव वीज बिल हा सुद्धा मुद्दा आहे. या सगळ्या मुद्दयांवर आम्ही एकत्रित चर्चा करणार आहोत.' 

12 Dec 2024, 12:28 वाजता

खातेवाटपात भाजपची सरशी; शिंदेंना गृह खाते देण्यास भाजपचा स्पष्ट नकार

खातेवाटपात भाजपची सरशी

गृह आणि अर्थ खाते भाजपकडेच राहणार?

शिंदेंना गृह खाते देण्यास भाजपचा स्पष्ट नकार

राष्ट्रवादीचे अर्थ खातेही भाजप स्वतःकडेच ठेवणार?

विश्वसनीय सूत्रांची माहिती

12 Dec 2024, 11:47 वाजता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजधानी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस काल दिल्लीला रवाना झाले असून त्यांनी या दौऱ्यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली आहे.

devendra fadnavis modi in delhi

12 Dec 2024, 11:21 वाजता

देशातील 19 ठिकाणी NIA ची छापेमारी

राष्ट्रीय तपास संस्था (NIA) जैश-ए-मोहम्मदशी संबंधित व्यक्तींचे कट्टरपंथीकरण आणि दहशतवादी प्रचार प्रसाराशी संबंधित असलेल्या प्रकरणात जम्मू आणि काश्मीर, आसाम, महाराष्ट्र, यूपी आणि गुजरातमधील एकूण 19 ठिकाणी शोध घेत आहे. 

12 Dec 2024, 10:24 वाजता

सर्वभाविकांसाठी आनंदाची बातमी आहे... 

आजपासून साईंच्या शिर्डीत भाविकांना हार, फुल आणि प्रसाद नेता येणार आहे. तर आंगणेवाडी यात्रेची 22 फ्रेब्रुवारीला कोकणात भराडीदेवीची यात्रा भरणार आहे. त्याशिवाय तुळजाभवानी मंदिराचा होणार कायापालट, तुळजाभवानी मंदिराला पुरातन झळाळी येणार आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू  झालंय.