Maharashtra Breaking News Today LIVE Updates : संभाजीनगरमध्ये एका तरुणाची NIA कडून चौकशी

Maharashtra Breaking News Today LIVE Updates :  महाराष्ट्रात आजच्या दिवसभरात नेमकं काय घडतंय हे थोडक्यात एका क्लिकवर जाणून घ्या.

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : संभाजीनगरमध्ये एका तरुणाची NIA कडून चौकशी

Maharashtra Breaking News Today LIVE Updates :  राज्य-देशभरातील बातम्या आणि घडामोडींचा आढावा ब्लॉगच्या माध्यामातून जाणून घेऊया. 

12 Dec 2024, 12:28 वाजता

खातेवाटपात भाजपची सरशी; शिंदेंना गृह खाते देण्यास भाजपचा स्पष्ट नकार

खातेवाटपात भाजपची सरशी

गृह आणि अर्थ खाते भाजपकडेच राहणार?

शिंदेंना गृह खाते देण्यास भाजपचा स्पष्ट नकार

राष्ट्रवादीचे अर्थ खातेही भाजप स्वतःकडेच ठेवणार?

विश्वसनीय सूत्रांची माहिती

12 Dec 2024, 11:47 वाजता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजधानी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस काल दिल्लीला रवाना झाले असून त्यांनी या दौऱ्यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली आहे.

devendra fadnavis modi in delhi

12 Dec 2024, 11:21 वाजता

देशातील 19 ठिकाणी NIA ची छापेमारी

राष्ट्रीय तपास संस्था (NIA) जैश-ए-मोहम्मदशी संबंधित व्यक्तींचे कट्टरपंथीकरण आणि दहशतवादी प्रचार प्रसाराशी संबंधित असलेल्या प्रकरणात जम्मू आणि काश्मीर, आसाम, महाराष्ट्र, यूपी आणि गुजरातमधील एकूण 19 ठिकाणी शोध घेत आहे. 

12 Dec 2024, 10:24 वाजता

सर्वभाविकांसाठी आनंदाची बातमी आहे... 

आजपासून साईंच्या शिर्डीत भाविकांना हार, फुल आणि प्रसाद नेता येणार आहे. तर आंगणेवाडी यात्रेची 22 फ्रेब्रुवारीला कोकणात भराडीदेवीची यात्रा भरणार आहे. त्याशिवाय तुळजाभवानी मंदिराचा होणार कायापालट, तुळजाभवानी मंदिराला पुरातन झळाळी येणार आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू  झालंय.

 

12 Dec 2024, 10:12 वाजता

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं अजित पवार भेटीला

शरद पवारांचा आज 85 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं अजित पवार शरद पवारांच्या भेटीला दिल्लीतील घरी गेले. सुनेत्रा पवार, सुनील तटकरेही पवारांच्या भेटीला. दिल्लीत काका-पुतण्याच्या मनोमिलनाचा नवा अध्याय. 

12 Dec 2024, 10:11 वाजता

पवनचक्कीच्या कंपनीकडे मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

पवनचक्कीच्या कंपनीकडे खंडणी मागितल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय. केज तालुक्यातील मस्साजोग परिसरात आवादा कंपनीचा पवनचक्कीचा प्रोजेक्ट आहे. या कंपनीतील शिंदे नामक अधिकाऱ्याने केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कंपनीकडे तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांनी मागितल्याचा उल्लेख आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

12 Dec 2024, 10:10 वाजता

विदर्भात थंडीचा जोर  कायम 

विदर्भात सर्वात कमी तापमान नागपूर, गोंदिया येथे 9.8 अंश सेल्सिअस 

गोंदिया 9.8
नागपूर -9.8
वर्धा -10.5
गडचिरोली- 10.8
अकोला 12.5
अमरावती 11.4
भंडारा 13.0
बुलडाणा 13.0
चंद्रपूर 11.8

12 Dec 2024, 10:09 वाजता

कुर्ला बस अपघात प्रकरणाचा अहवाल अद्यापही प्रतिक्षेत

कुर्ला बस अपघात प्रकरणावर 5 सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती घटनेची माहिती आणि तपास करुन अहवाल सादर करेल. सध्या बेस्ट बस चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, घटनेला 3 दिवस उलटल्यानंतरही अहवालाची प्रतीक्षा आहे. पुढील 10 दिवसांत अहवाल सादर केला जाण्याची शक्यता