Maharashtra Breaking News LIVE Updates: ठाकरे गटाच्या स्थगित बैठका 7 जानेवारीपासून सुरु होणार

Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर 

Maharashtra Breaking News LIVE Updates: ठाकरे गटाच्या स्थगित बैठका 7 जानेवारीपासून सुरु होणार

Maharashtra Breaking News LIVE Updates: आज नवीन वर्षातील पहिला दिवस आहे. देशात अनेक नवीन बदल घडणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणातील आढावा, घेऊयात या ब्लॉगच्या माध्यमातून

1 Jan 2025, 19:38 वाजता

ठाकरे गटाच्या स्थगित बैठका 7 जानेवारीपासून सुरु होणार 

ठाकरे गटाच्या स्थगित झालेल्या उर्वरित बैठका या 7 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. या बैठका 7, 8 आणि 9 जानेवारी रोजी पार पडणार आहेत. 

1 Jan 2025, 18:18 वाजता

वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात गोंधळ, ओव्हर हेड पोर्टलवर चढला व्यक्ती

वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात एका व्यक्तिचा गोंधळ. रेल्वेच्या ओव्हर हेड पोर्टलवर व्यक्ती चढला. यामुळे लोकल ट्रेन काही काळ थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे रेल्वेची वाहतूक देखील खोळंबली होती. पोलिसांनी व्यक्तिला ताब्यात घेतलं जीआरपी पोलिसांकडून त्याच्यावर कारवाई केली आहे. 

1 Jan 2025, 17:40 वाजता

संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी गठीत

संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी गठीत करण्यात आलीय. आयजी बसवराज तेली एसआयटी प्रमुख असणार आहेत. तर यामध्ये दहा पोलीस अधिकाऱ्यांचा  देखील समावेश असणार आहे. पंकजा मुंडेंसह इतर नेत्यांनी केली होती एसआयटी चौकशीची मागणी. 

1 Jan 2025, 17:15 वाजता

महाराष्ट्रात नक्षलींची भरती पूर्णपणे संपुष्टात आलीय : देवेंद्र फडणवीस 

आजचा दिवस जवानांसोबत घालवता आला याचा मला आनंद. गडचिरोलीत 75 वर्षानंतर पहिल्यांदा अहेरी ते गर्देवाडा बससेवा सुरु झाली.  सी-60 जवानांचा सत्कार करण्याचं भाग्य मिळालं. महाराष्ट्रात नक्षलींची भरती पूर्णपणे संपुष्टात आली असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

1 Jan 2025, 16:37 वाजता

संभाजीनगरमधील 21 कोटी क्रीडा विभागातील घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपीला अटक

संभाजीनगरमधील क्रीडा विभाग 21 कोटी घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी हर्ष कुमार क्षीरसागरला अखेर अटक. आर्थिक गुन्हे शाखेकडून हर्षला दिल्लीतून अटक करण्यात आलीये. निजामुद्दीन रेल्वे स्टेशन दिल्ली येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

1 Jan 2025, 16:28 वाजता

बीडमध्ये भागीदारीच्या पैशांतून दोन व्यावसायिकांमध्ये वाद

बीडमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीये. भागीदारीच्या पैशांतून दोन व्यावसायिकांमध्ये वाद झाला आहे. पायाला कुलूप लावून भागीदाराला डांबलं. बीडमध्ये भागीदाराचा अमानुषपणा समोर. पायाच्या कुलूपासोबत भागीदाराची पोलिसांत तक्रार. भागीदारीतील व्यवसाय वाढीसाठी मुंबईला पैसे आणण्यासाठी गेलेल्या साथीदारालाच लुटण्यात आल्याचा प्रकार समोर. 

1 Jan 2025, 16:06 वाजता

एसटी महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती  

एसटी महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. कंत्राटदाराच्या फायद्यासाठी वाढीव दराने बसेस भाड्याने घेण्याचे काढले होते कंत्राट. यामुळं एसटी महामंडळाला सुमारे २ हजार कोटींचा तोटा होणार होता. भरत गोगावले एसटी महामंडळाचे अध्यक्ष झाल्यानंतर या निविदा प्रक्रियेला वेग आल्याची माहिती समोर आलीये. 

1 Jan 2025, 14:45 वाजता

CID कडून वाल्मिक कराड यांची चौकशी

CID पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडून वाल्मिक कराड यांची चौकशी. सकाळी देखील 4 जणांकडून झाली होती वाल्मिक करड यांची चौकशी. 

1 Jan 2025, 14:00 वाजता

 उद्या दुपारी 12 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक

खातेवाटपानंतरची पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक उद्या मंत्रालयात पार पडणार आहे. या बैठकीत बीड आणि परभणी घटनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

1 Jan 2025, 12:34 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: ठाकरे गटाला कोकणात धक्का, माजी आमदार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार. माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत. निवडणुकीत आणि निवडणूकनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची मनात भावना शिवाय, कुटुंबियांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची राजन साळवी यांना चिंता महिनाभरात राजन साळवी घेणार निर्णय. राजन साळवी भाजप की शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार याबाबतीत वेगवेगळ्या चर्चा कोकणात सुरू आहेत.