Maharashtra Breaking News LIVE Updates: आज नवीन वर्षातील पहिला दिवस आहे. देशात अनेक नवीन बदल घडणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणातील आढावा, घेऊयात या ब्लॉगच्या माध्यमातून
1 Jan 2025, 12:19 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: बीडमधील जलसमाधी आंदोलन मागे
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि आंदोलक यांच्यात चर्चा सुरू असून गावकऱ्यांनी मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिलं आहे. आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे मागणी केली आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी मागितली आंदोलकांकडे दहा दिवसाची वेळ. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे
1 Jan 2025, 12:00 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: वाल्मिक कराडच्या सीआयडीकडून चौकशीला सुरवात
वाल्मिक कराडची सीआयडीकडून चौकशीला सुरवात. बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची सीआयडी पथकाकडून चौकशी. सीआयडी कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडच्या चौकशीचा पहिला दिवस. एक बंद खोलीत कराडची चौकशी सुरुय.
1 Jan 2025, 11:36 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना अटक न झाल्यास आंदोलन करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसंच, 25 जानेवारीला आमरण उपोषण करणार, असंही त्यांनी म्हटलं आहे.
1 Jan 2025, 11:08 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: अक्कलकोटमध्ये भाविकांवर काळाचा घाला; अपघातात 4 जणांचा मृत्यू
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन घेऊन गणगापूरला जातं असताना मैंदर्गी जवळ भीषण अपघात घडला आहे. समोरासमोर झालेल्या अपघातात 2 महिला आणि 2 पुरुष जागीच ठार झाले आहेत. तर 7 ते 8 जण गंभीर जखमी आहेत. सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती. अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल झाले असून जखमीना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात करण्यात आले दाखल.
1 Jan 2025, 11:07 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: सुदर्शन घुलेच्या घरच्यांची कसून चौकशी
बीड हत्याकांड प्रकरणात सुदर्शन घुले याच्या घरच्यांची आणि नातेवाईकांशी कसून चौकशी करण्यात येत आहे. फरार तिन्ही आरोपीच्या नातेवकांची सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकश झाल्याची सूत्रांची माहिती. नातेवाईकांच्या संपर्कात हे तिन्ही आरोपी आहेत का याचा ही तपास सीआयडी कडून होत असल्याची माहिती. सीआयडीकडून तिन्ही आरोपींच्या शोधासाठी सर्व प्रयत्न सुरू
1 Jan 2025, 10:21 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: बीड हत्याकांडः CIDचा फोकस आता सुदर्शन घुलेवर
बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर आता सीआयडीचा फोकस असणार आहे. खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपीच्या CID मुसक्या आवळणार. सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे जण फरार आहेत. वाल्मिक कराडच्यानंतर तपास यंत्रणांचा फोकस तीन फरार आरोपीवर
1 Jan 2025, 10:21 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: बीड हत्याकांडः आज मस्साजोग ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन
सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज मसाजोगचे ग्रामस्थ जलसमाधी आंदोलन करणार आहेत. थोड्याच वेळात या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. मस्साजोग गावाजवळील तलावात हे आंदोलन करण्यात येणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 23 दिवस उलटले तरी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनासाठी गावकरी जमायला सुरुवात झाली असून काही वेळातच आंदोलन आंदोलनास्थळी पोहोचणार आहेत. ज्या आंदोलनात गावातील महिला, वृद्ध व तरुण मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
1 Jan 2025, 09:19 वाजता
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सकाळी 10.30 वाजता लोककल्याण मार्गावर ही सभा होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी मोदी मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक आहे. असे मानले जात आहे की आम आदमी पार्टी सरकारच्या सततच्या घोषणांमुळे केंद्र सरकार दिल्लीसाठी काही योजना जाहीर करू शकते.
1 Jan 2025, 09:19 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना; राष्ट्रीय महामार्गांवर आजपासून हेल्मेटसक्ती
नागरिकांची सुरक्षितता तसेच दुचाकी अपघातातील मृत्यूचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आज, १ जानेवारी २०२५ पासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. दुचाकीचालक आणि मागे बसलेला त्याचा सहप्रवासी अशा दोघांनीही हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. तसेच दुचाकीवर मागे बसलेल्या चार वर्षांवरील प्रत्येकाने महामार्गावर हेल्मेट परिधान करणे अनिवार्य आहे. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी वाहन चालविणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
1 Jan 2025, 09:18 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: राष्ट्रवादी शरद पवार गटाची मुंबईत पार पडणार आढावा बैठक
राष्ट्रवादी शरद पवार गटाची मुंबईत पार पडणार आढावा बैठक. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत घेतला जाणार आढावा. 8 आणि 9 जानेवारी रोजी मुंबईतील YB सेंटर येथे पक्षाची बैठक पार पडणार. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाची पुढील दिशा यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणाऱ्या या बैठकीत ठरवली जाणार. या बैठकीला पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि आजी-माजी आमदार, खासदार, विधानसभेचे पराभूत उमेदवार तसेच जिल्हाध्यक्ष ,तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी राहणार उपस्थित