Maharashtra Breaking News LIVE Updates: आज नवीन वर्षातील पहिला दिवस आहे. देशात अनेक नवीन बदल घडणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणातील आढावा, घेऊयात या ब्लॉगच्या माध्यमातून
1 Jan 2025, 07:57 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन. हैद्राबाद येथील घरी पहाटे निधन. तीन वेळा किनवट मतदार संघाचे होते आमदार. विधानसभा निवडणुकीत झाला होता निसटता पराभव. वयाच्या 69 व्या वर्षी निधन
1 Jan 2025, 07:55 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला प्रारंभ
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सव पुर्वीच्या मंचकी निद्रेला राञी अभिषेक पुजेनंतर प्रारंभ झाला आहे. तुळजाभवानी माता शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावली दरम्यान त्यानंतर प्रक्षाळ पुजेचा विधी पलंगावर पार पडला तर पुढील आठ दिवस देवीची मंचकी निद्रा असणार आहे. तर 7 जानेवारी रोजी पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होणार आहे.
1 Jan 2025, 07:54 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: 'वडिलांचं स्वप्न, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करून पूर्ण करणार'
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्नीक रात्री बारा वाजता साईबाबांचे दर्शन घेतलं. आपल्या वडिलांचं महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी साई बाबांकडे प्रार्थना केली असल्याचं वक्तव्य यावेळी दर्शनानंतर विखे पाटील यांनी व्यक्त केले.
1 Jan 2025, 07:52 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: ... तर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; खासदार तटकरेंचे आदेश
रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून खासदार सुनील तटकरे चांगलेच संतापले आहेत. माणगाव इथं घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. काळ आणि गोद नदीवरील पुलांची कामे संथगतीने सुरू आहेत. रखडलेल्या कामाबाबत अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे तटकरेंचा संताप अनावर झाला. वेळेत काम न झाल्यास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले.
1 Jan 2025, 07:47 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: साईनगरीत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत
नवीन वर्षाच्या निमित्ताने साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुलं. साई मंदिर परिसरात साईनामाचा जयघोष. नवीन वर्षाचे स्वागत साईबाबांच्या दर्शनाने करण्यासाठी लाखोंच्या संख्येने साईभक्त शिर्डीत दाखल.
1 Jan 2025, 07:46 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा येथे अनुयायी दाखल
227 शौर्य दिनाच्या निमित्ताने कोरेगाव भीमा इथं देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल झालेत. आतिश बाजी करत सामूहिक बुद्ध वंदनेने शौर्य दिनाला सुरुवात झाली असून मध्यरात्रीपासूनच अनुयायी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत आहेत. 2007 व्या शौर्य दिनाच्या निमित्ताने विजय स्तंभाला आकर्षक सजावट करण्यात आली असून यावेळेस विजय स्तंभावर संविधानाची प्रतिकृती सादर करण्यात आली आहे.