8 Dec 2024, 16:25 वाजता
तानाजी सावंतांना आरोग्यमंत्री पद मिळावे यासाठी साकडे
शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात घेऊन पुन्हा आरोग्य खात्याचा पदभार त्यांच्याकडे द्यावा या मागणीसाठी आज पंढरपुरात संत नामदेव पायरी येथे महिलांनी विठुरायाच्या प्रतिमात्मक मूर्तीला अभिषेक घातला. विठुरायाची आरती केली आरोग्य मंत्री असताना सावंत यांनी महिलांसाठी विविध कुटुंब कल्याण योजना आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबवल्या आहेत. त्यामुळे पुन्हा त्यांनाच आरोग्य मंत्री करावं असं साकडे विठ्ठलाला घातले आहे. यावेळी महाराज मंडळींनी भजन कीर्तन करत हरिनामाचा गजर केला.
8 Dec 2024, 15:59 वाजता
संजय राठोड यांचा मंत्रिमंडळ प्रवेशावरुन बंजारा महंतांचा इशारा
यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विधानभवनाची पायरी चढणारे आमदार संजय राठोड यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू नये यासाठी षडयंत्र रचल्या गेले आहे आणि ते बंजारा समाज हाणून पाडेल असा निर्वाणीचा ईशारा बंजारा महंतांनी दिला आहे. दिग्रस दारव्हा नेर येथून मोठ्या संख्येने बंजारा समुदाय पदयात्रेद्वारे पोहरागडावर पोहोचले, याठिकाणी भोग अरदास करून संजय राठोड याना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठी साकडे घालण्यात आले. संजय राठोड बंजारा व बहुजन समाजाचे नेतृत्व आहे, पोहरागडाचा त्यांनी प्रचंड विकास केला, त्यामुळे बंजारा समाज महायुतीच्या बाजूने राहिला मात्र तरीही त्यांच्या मंत्रीमंडळातील समावेशाबाबत कारस्थान रचल्या जात असेल तर बंजारा समाज देशात पश्चाताप रैली काढून उत्तर देईल असा इशारा यावेळी महंत कबीरदास महाराज यांनी दिला.
8 Dec 2024, 15:38 वाजता
लातूर-तळेगावच्या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस
लातूरच्या अहमदपूरमधील तळेगावच्या 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण संभाजीनगरच्या न्यायालयाकडून याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र या शेतकऱ्यांकडून या दाव्याचा विरोध केला जात आहे. वडिलोपार्जित जमिनी पिढ्यान पिढ्या आपल्याच वहिवाटीखाली आहेत. त्या वक्फ बोर्डाच्या नाहीत असं शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्याला या प्रकरणी शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय मिळवून द्यावा अन्यथा आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलं.
8 Dec 2024, 15:17 वाजता
शिवसेना ठाकरे गटाचे दोन आमदार शपथविधीला अनुपस्थित
शिवसेना ठाकरे गटाचे दोन आमदार शपथविधीला अनुपस्थित होते. वरूण सरदेसाई हे पूर्वनियोजित दौऱ्यामुळे मुंबई बाहेर असल्याकारणाने शपथ घेऊ शकले नाहीत. मनोज जामसुतकर हे तब्येत ठीक नसल्याने आणि रुग्णालयात उपचार घेत असल्याने शपथ घेऊ शकले नाहीत.
8 Dec 2024, 14:04 वाजता
विरोधी पक्षनेता कोण? राहुल नार्वेकरांनी दिले स्पष्टीकरण
विधानसभेत कोण विरोधी पक्षनेता असेल हा सर्वाधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. मी अजून विधानसभेचे अध्यक्ष बनलो नाही. पण अध्यक्ष झाल्यानंतर जर माझ्याकडे अशा प्रकारचा कोणता प्रस्ताव आला तर मी योग्य विचार करून निर्णय घेईन असे राहुल नार्वेकर म्हणाले.
8 Dec 2024, 13:28 वाजता
घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत : एकनाथ शिंदे
विरोधकांकडून दुटप्पीपणा सुरु, घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत. विरोधात निकाल लागल्यानं विरोधकांचा सुप्रीम कोर्टावरही आक्षेप. विरोधकांकडे आता मुद्दा राहिलेला नाहीये. लोकसभेच्या निकालानंतर ईव्हीएमवर विरोधकांनी आक्षेप घेतला नाही. असं एकनाथ शिंदे म्हणाले.
8 Dec 2024, 12:57 वाजता
बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या : आदित्य ठाकरे
अबू आझमी भाजपची बी टीम म्हणून काम करतेय. EVM विरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन सुरु आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या अशी जनतेची मागणी असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
8 Dec 2024, 12:29 वाजता
5 आमदार प्रगती पुस्तकात पास
मंत्रिमंडळात समावेशासाठी आमदारांचं प्रगती पुस्तकं
संजय राठोड, अब्दुस सत्तार नापास
शिवसेना आमदार, मंत्र्यांचं प्रगती पुस्तर तयार
8 Dec 2024, 12:05 वाजता
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरच
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांचं नाव निश्चित झालं आहे. राहुल नार्वेकरांची निवड बिनविरोध झाली आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. नार्वेकरांचा एकमेव अर्ज या वेळेत आल्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
8 Dec 2024, 11:20 वाजता
विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकरांचा अर्ज दाखल
विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकरांनी अर्ज दाखल केला आहे. चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत राहुल नार्वेकरांनी अर्ज भरला आहे. आता भाजपचे कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष आहेत. कोळंबकर हे दुसऱ्यांदा हंगामी अध्यक्ष आहेत.