8 Dec 2024, 07:47 वाजता
प्रतापगडावरील शिवरायांच्या पुतळ्यावर आज हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी
साताऱ्यातील प्रतापगडावर आज शासनाकडून शिवप्रताप दिन साजरा केला जाणार आहे. यात हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली जाते.
8 Dec 2024, 07:47 वाजता
शरद पवार आज मारकडवाडी
मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माळशिरस तालुक्यातील मारकरवाडी गावाला आज शरद पवार भेट देणार आहेत. गावात नुकतेच मतपत्रिकेवर मतदान करण्याचे काहींनी आवाहन करत तशी चाचणी घेण्याचा प्रयत्न केला होता. प्रशासनाने ही प्रक्रिया थांबवल्याच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार गावास भेट देऊन गावातील नागरिकांशी संवाद साधणार आहे.. अंदाजे दहा वाजेपर्यंत शरद पवार हेलिकॉप्टरने मारकरवाडी पोचतील. दरम्यान, पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील भाजप कार्यकर्त्यांनी मारकरवाडी गावात भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अभिनंदनाचे फलक लावल्याने गावात काहीसे वातावरण तापू लागले आहे.
8 Dec 2024, 07:46 वाजता
शेतकरी आज दिल्लीकडे कूच करणार
शेतकरी आज पुन्हा दिल्लीकडे कूच करणार आहेत. एसकेएम नेते पंढेर यांनी शनिवारी ही घोषणा केली. शंभू सीमेवर शेतकरी उभे आहेत. पंढेर शनिवारी बोलताना, उद्या शेतकरी दिल्लीकडे कूच करणार आहेत, सांगितलं. शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. शंभू सीमेवरील शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी सांगितले की, आपण सरकारच्या निमंत्रणाची वाट पाहत आहोत. सरकारकडून चर्चेचा प्रस्ताव न आल्यास 101 शेतकरी रविवारी दुपारी 12 वाजता शांततेत आंदोलन करतील.
8 Dec 2024, 07:46 वाजता
मारकडवाडी होणार ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा केंद्रबिंदू
ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा केंद्रबिंदू मारकडवाडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि जयंत पाटील आज मारकडवाडी दौऱ्यावर आहेत. शरद पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार उत्तमराव जानकर यांनी ईव्हीएमविरोधात घेतलेल्या भूमिकेबाबत चर्चा करणार आहेत. तसेच मारकडवाडीत राहणाऱ्या गावकऱ्यांशी देखील शरद पवार संवाद साधणार आहेत. आज सकाळी साडेदहा वाजता शरद पवार, जयंत पाटील जाणार माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गावाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
8 Dec 2024, 07:46 वाजता
उद्या अध्यक्षपदाची निवडणूक; अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख
विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 9 डिसेंबरला होणार आहे. आज दुपारपर्यंत अर्ज भरता येणार आहे. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी यासंदर्भात विधानसभेत घोषणा केली.
8 Dec 2024, 07:44 वाजता
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. 4 महिलांसहीत 11 जणांच्या सोन्याच्या चैनींवर चोरांनी डल्ला मारला. तर कार्यकर्त्यांची हजारोंची रोकड घेऊन चोर पसार झाले आहेत. चोरांनी तब्बल 12 लाख रुपयांचे ऐवज लंपास केला.
8 Dec 2024, 07:43 वाजता
आज महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक
आज सकाळी मविआच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. आमदारांची बैठक सकाळी 10 वाजता होणार आहे. मविआच्या आंदोलनाआधी ही बैठक होणार आहे.
8 Dec 2024, 07:43 वाजता
काँग्रेसची बैठक पार पडली
आज सकाळी 10.30 वाजता महाविकास आघाडी एकत्र येऊन पाय-यांवर आंदोलन करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मविआचे नेते पुढील निर्णय घेणार आहेत.
8 Dec 2024, 07:29 वाजता
विरोधक पाय-यांवर आंदोलन करणार
आज सकाळी 10.30 वाजता महाविकास आघाडी एकत्र येऊन पाय-यांवर आंदोलन करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मविआचे नेते पुढील निर्णय घेणार आहेत.
8 Dec 2024, 07:26 वाजता
महाराष्ट्रातील सहा ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार
पंचायत राज पुरस्कारात महाराष्ट्र शासनाला 6 पुरस्कार मिळाले आहेत. तत्कालीन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पुरस्कार प्राप्तीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समित्यांचे अभिनंदन करण्यात आलं आहे. 2022 ते 2024 काळातील कामासाठी केंद्राकडून महाराष्ट्राचा सन्मान करण्यात आला आहे. दीनदयाळ उपाध्याय पंचायत पुरस्कार, नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत पुरस्कार, ग्राम ऊर्जा विशेष पुरस्कार, कार्बन न्यूट्रल कंट्रोलसह इतर पुरस्कारांनी महाराष्ट्राला सन्मानित करण्यात आलं आहे.