8 Dec 2024, 10:51 वाजता
आता शरद पवार यांनी सुद्धा पराभव स्वीकारला पाहिजे - चंद्रशेखर बावनकुळे
मारकरवाडी येथे EVM विरोधात गावकरी एकत्र आले आहेत. आज राष्ट्रवादीचे संस्मथापक शरद पवार मारकडवाडीतील गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बानवकुळे म्हणाले की, मारकडवाडीतील सर्व गावकरी ही सामान्य जनता नाही. तर ते सर्व शरद पवार यांचे कार्यकर्ते आहेत. तसेच महाराष्ट्राला महाविकास आघाडीकडून अपेक्षा नाही तर महाराष्ट्राला महायुतीकडून अपेक्षा आहे, त्यामुळे हा निकाल लागला. आता सर्व नवटंकी सुरू असल्याचं देखील बावनकुळे म्हणाले.
तसेच पुन्हा महाराष्ट्राचे नाव बदनाम करत आहेत असा आरोपही बावनकुळे यांनी लावला आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे जे जे ईव्हीएम वर निवडून आले आहेत त्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजेत, असंही यावेळी बावनकुळे म्हणाले. महाविकास आघाडीच्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजेत. तसेच आमचा सुद्धा कधीतरी पराभव झाला होता पण मोदींच्या नेतृत्वात आम्ही जिंकत आहोत, असं म्हणतं पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. तसेच आता शरद पवार यांनी सुद्धा पराभव स्वीकारला पाहिजे, असा खोचक टोळा देखील लगावला.
8 Dec 2024, 10:35 वाजता
सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचे विमान कोसळले - सूत्र
सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचे विमान कोसळले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रडारवरून गायब झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष असद यांचे विमान क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचे विमान होम्स शहराजवळ क्रॅश झाले आहे. बंडखोरांनी सीरियाची राजधानी दमास्कस ताब्यात घेतली असून सीरियात कब्जा केल्यानंतर सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
8 Dec 2024, 10:14 वाजता
शरद पवार मारकडवाडीत दाखल
मारकडवाडीत शरद पवार दाखल झाले आहेत. शरद पवारांसोबत जयंत पाटीलही दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात मारकडवाडी ग्रामस्थांशी शरद पवार संवाद साधणार आहेत. ईव्हीएम विरोधात जानकरांनी घेतलेल्या भूमिकेवर आज शरद पवार, जयंत पाटील चर्चा करणार आहेत. ग्रामस्थांकडून EVM विरोधात गावात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
8 Dec 2024, 09:54 वाजता
...म्हणून शपथ घेतली; पण मी महाविकास आघाडीबरोबरच! आमदाराचा खुलासा
काल माझ्यापर्यंत मविआचा मॅसेज पोहचला नसल्याने मी शपथ घेतली. परंतु मी महाविकास आघाडीसोबतच आहे आणि पुढेही राहणार आहे. कुठलाही संभ्रम मनात नाही, असा खुलासा माकपचे आमदार विनोद निकोल यांनी केला आहे. ईव्हीएमबाबत माझ्या पक्षाने अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळं मी वरिष्ठांशी बोलून भूमिका जाहीर करेन, असं म्हटलं आहे.
8 Dec 2024, 08:59 वाजता
...म्हणून 11 व 12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार अशक्यच
11 व 12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमीच. मंत्र्यांच्या नावांची निवड, तीनही नेत्यांची नावांवर चर्चा आणि मग केंद्रातुन मंजुरी याला प्रकियेला वेळ लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्या 9 डिसेंबरपर्यंत चालणार विशेष अधिवेशन त्यामुळे एका दिवसात ही सर्व प्रकिया होणे कठीण आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे 11-12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हं धुसर असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
8 Dec 2024, 08:41 वाजता
शरद पवार मारकडवाडीला रवाना! EVM विरोधी आंदोलनाचं केंद्रबिंदू ठरणार छोटसं गाव
राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार हे माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडीच्या दिशेने रवाना झाले आहेत. हे छोटसं गाव ईव्हीएमविरोधी भूमिकेमुळे संपूर्ण देशात चर्चेत आलं आहे.
8 Dec 2024, 07:56 वाजता
योगी आदित्यनाथ यांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या एकाचा जामीन फेटाळला, महिला पोलिसाला शिवीगाळ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भोसरी येथील सभेत गोंधळ घालून महिला शिपायास शिवीगाळ करणऱ्या एकाचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश एस. आर. पहाडे यांनी फेटाळून लावला. ऋतिक लांडगे असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिला पोलिस शिपायाने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी लांडगे याने वकिलांमार्फत शिवाजीनगर न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. पहाडे यांच्या न्यायालयात अर्ज केला. जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी अटकपूर्व जामीन अर्जास विरोध केला. आरोपीने सार्वजनिक ठिकाणी मोठ्या जनसमुदायासमोर अश्लील आणि असभ्य वर्तन केले आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या सभेच्या ठिकाणी सुरक्षेसाठी लावण्यात आलेले लोखंडी कठडे (बॅरीकेट) ओलांडुन व्यासपीठाच्या दिशेने लांडगे निघाला होता. त्यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्यााला रोखण्याचा प्रयत्न केला. अतिमहत्वाच्या व्यक्तीजवळ पोहोचुन त्याच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करण्याचा आरोपीचा उद्देश होता किंवाकसे याबाबत तपास करायचा असल्याने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याची विनंती अॅड. बोंबटकर यांनी युक्तिवादात केली. सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालायने लांडगे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
8 Dec 2024, 07:51 वाजता
मुंबई महानगरात पाहुणे पक्षी मुक्कामी
मुंबई महानगर प्रदेशात आता बऱ्यापैकी हिवाळा सुरू झाला आहे. किमान तापमानात चढ-उतार नोंदविण्यात येत आहेत. सध्याच्या दिवसांमध्ये मुंबईसह लगतच्या परिसरात परदेशी पाहुणे पक्षी दाखल होऊ लागले आहेत. त्यात फ्लेमिंगोसह इतर पक्ष्यांचा समावेश आहे. पाणथळ जागा, समुद्रकिनारे, तलाव आणि खारफुटीसारख्या जागा त्यांच्या जगण्याचे सध्याचे ठिकाण आहे. हिवाळा संपल्यानंतर हे पक्षी पुन्हा आपल्या देशाकडे रवाना होतात. ऑक्टोबरनंतर परदेशी पक्षी येथे दाखल होऊ लागतात. यात पाणपक्षी मोठ्या प्रमाणावर असतात. ग्रेटर फ्लेमिंगो आणि लेसर फ्लेमिंगोंची संख्या मोठी असते. गेल्या काही वर्षांपासून फ्लेमिंगो वर्षभर मुंबईत आढळून येतात.
8 Dec 2024, 07:51 वाजता
सुभाष घई लिलावती रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये उपचार सुरु
प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
8 Dec 2024, 07:50 वाजता
मुंबईतील 1200 बेकरींना नोटीस
मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या बेकऱ्या आता मुंबई महापालिकेच्या रडारवर आल्या आहेत. पालिकेने जवळपास 1200 बेकरींना नोटीस पाठविली असून, बेकरी मालकांनी भट्टया पेटविण्यासाठी इंधन म्हणून लाकडाचा वापर न करतात विजेचा किंवा गॅसचा वापर करावा, असे निर्देश दिले आहेत. बेकरी मालक भट्टी पेटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडाचा वापर करतात. त्यामुळे त्याचा काळा धूर हवेत मिसळत असल्याने प्रदूषणात भर पडते. उच्च दर्जाच्या लाकडासाठी जास्त खर्च येत असल्याने बेकरी मालक-चालक प्रामुख्याने जुन्या, पाडण्यात आलेल्या इमारतींच्या लाकडाचा जाळण्यासाठी वापर करतात. जवळपास 47 टक्के बेकऱ्यांच्या भट्टया या लाकडावर पेटवल्या जातात. त्यासाठी सुमारे 130 किलो लाकूड लागते.