LIVE Updates : संतोष देशमुखांची हत्या व्यवहारातून : धनंजय मुंडे

Maharashtra Breaking News Today LIVE Updates :  राज्य-देशभरातील आजच्या दिवसभरात नेमकं काय घडतंय हे थोडक्यात एका क्लिकवर जाणून घ्या.

LIVE Updates : संतोष देशमुखांची हत्या व्यवहारातून : धनंजय मुंडे

Maharashtra Breaking News Today LIVE Updates :  राज्यात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. सोमवारपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून त्याचा आज पाचवा दिवस आहे. तिथे आणि महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय त्याचा आढावा एका क्लिकवर घ्या...

20 Dec 2024, 15:04 वाजता

खासदार संजय राऊतांच्या घराची रेकी?

संजय राऊतांच्या भांडुपमधील घराची दुचाकीस्वारांनी रेकी केल्याचा आरोप. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी चौकशी सुरू केली आहे. रेकी करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर मास्क लावले होते. 

20 Dec 2024, 14:59 वाजता

एकनाथ शिंदे यांची नाराज आमदारांशी चर्चा

जास्त लोक निवडून आल्याने काहींनी संयम ठेवावा. मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही त्यांना पक्षसंघटनेत संधी मिळेल. बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांची शिकवण महत्वाची. आम्ही सर्वजण कुटुंब आहोत, नाराजी नाही. आमच्या कामाची पोचपावती आम्हाला जनतेनं दिली. असं एकनाथ शिंदे म्हणाले.

20 Dec 2024, 14:31 वाजता

मुंबईत मंत्रालयाबाहेर भाजपविरोधात काँग्रेस आक्रमक

मुंबईत मंत्रालयाबाहेर भाजपविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हातात घेत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून 'जय भीम'च्या घोषणा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राजीनामा देण्याची मागणी. 

20 Dec 2024, 14:06 वाजता

मुख्यमंत्री कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत : सुनील प्रभू

बीड, परभणीसंदर्भातील फडणवीसांची उत्तरं असमाधानकारक. ते गोलगोल फिरवत आहेत. मुख्यमंत्री कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही उद्या महाविकास आघाडीची भूमिका ठरवणार. सुनील प्रभू यांची माहिती.

20 Dec 2024, 13:44 वाजता

कांद्यावरील निर्यात शुल्क काढावे मागणीसाठी खासदार निलेश लंकेंचे संसदेत आंदोलन 

कांद्यावरील निर्यात शुल्क पूर्णपणे काढावे या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांनी संसदेत आंदोलन केले. तसेच वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन निवेदनही सादर केले आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क केंद्र सरकारने 20 टक्क्यांनी वाढवल्यामुळे कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे कांद्याच्या किंमती घसरल्या आणि परिणामी शेतकऱ्याचे नुकसान झाले. कांद्यावरील निर्यात शुल्क सरकारने पूर्णपणे काढले पाहिजे यासाठी खासदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या इतर खासदारांसोबत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. गोयल यांना निवेदनाचे पत्र दिले. त्याचप्रमाणे लोकसभेच्या मकरद्वारावर उपोषण करण्यात आले.

20 Dec 2024, 13:27 वाजता

माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही : देवेंद्र फडणवीस 

मराठी माणसाला मारहाण, पोलीस कारवाई करतील. मुंबई मराठी माणसाचीच आहे आणि राहील. माजुरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

20 Dec 2024, 13:11 वाजता

धनंजय मुंडेंना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न, विरोधकांचा आरोप

विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गंभीर असल्याचं
म्हटलं आहे. मात्र, या प्रकरणामध्ये बीडचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय बीडचे माजी नगराध्यक्ष वाल्मिक कराड यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

20 Dec 2024, 12:48 वाजता

 Live Updates  : कोम्बिंग ऑपरेशनचे आमच्याकडे फुटेज : नितीन राऊत

परभणीत पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलंय. कोम्बिंग ऑपरेशनचे आमच्याकडे फुटेज आहेत. संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न. सोमनाथच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मल्टिपल इन्ज्युरीचा उल्लेख. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली. 

20 Dec 2024, 12:01 वाजता

परभणी घटनेतील मुख्य आरोपी मनोरुग्ण, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती 

परभणीत 10 डिसेंबरला दत्तराव पोवार या व्यक्तीने प्रतिकात्मक संविधानाची विटंबना केली. त्यानंतर जमावाने आंदोलन करत तोडफोड सुरू केली. यावेळी पोलिसांनी जमावाला हटकण्याचा प्रयत्न केला मात्र  त्यातले 60 ते 70 लोक रेल्वे स्टेशनवर गेले आणि त्यांनी रेल रोको केला . दुसऱ्या दिवशी परभणी बंदची हाक दिली तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातही तोडफोड करण्यात आली. याघटनेविषयी माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वैद्यकीय अहवाल वाचून दाखवला. संविधानाची विटंबना करणारा आरोपी हा मनोरूग्ण होता त्याच्यावर 2012 पासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती दिली. 

20 Dec 2024, 11:36 वाजता

मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर तंगड्या तोडू - वरूण सरदेसाई 

कल्याणमध्ये धूप लावण्याच्या कारणामुळे शेजारी राहणाऱ्या अमराठी आणि मराठी व्यक्तींमध्ये वाद झाला. यावादातून अमराठी व्यक्तीने मराठी कुटुंबाला मारहाण केली यात ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरून विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले आहेत. यावर ठाकरे शिवसेना आमदार वरूण सरदेसाई यांनी 'मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर त्यांच्या तंगड्या तोडू' अशी तीव्र प्रतिक्रिया दिली.