Maharashtra Breaking News Today LIVE Updates : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. सोमवारपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून त्याचा आज पाचवा दिवस आहे. तिथे आणि महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय त्याचा आढावा एका क्लिकवर घ्या...
20 Dec 2024, 16:39 वाजता
संजय राऊतांच्या जीवाला धोका : आदित्य ठाकरे
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे.
20 Dec 2024, 16:13 वाजता
परळी पालिकेत किरकोळ कारणावरून कर्मचाऱ्याला मारहाण
परळी नगरपालिकेत घरकुल विभाग पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
20 Dec 2024, 16:01 वाजता
मराठी कुटुंब मारहाण प्रकरणी अखीलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात
कल्याण मराठी कुटुंब मारहाण प्रकरणी अखीलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर पोलिसांना आत्मसमर्पण केल्याची माहिती.
20 Dec 2024, 15:30 वाजता
नागपुरात युवक काँग्रेसचा विधीमंडळावर मोर्चा
नागपुरात युवक काँग्रेस नेते बंटी शेळके यांच्या नेतृत्वात विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला आहे. नागपूर महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचा मुद्दा, वाढत्या घरपट्टीमुळे त्रस्त झालेल्या नागपूरकरांचा मुद्दा, वाढलेले वीज बिल, दिव्यांग, तसेच बेरोजगार तरुणांचा प्रश्न घेऊन हा मोर्चा काढण्यात आला आहे.
20 Dec 2024, 15:16 वाजता
मराठी माणसाला मारहाण प्रकरणी राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाणीची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. फेसबुकवर पोस्ट करुन त्यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, कल्याण प्रकरणात आरोपीना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा. आणि जर सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका.
20 Dec 2024, 15:04 वाजता
खासदार संजय राऊतांच्या घराची रेकी?
संजय राऊतांच्या भांडुपमधील घराची दुचाकीस्वारांनी रेकी केल्याचा आरोप. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी चौकशी सुरू केली आहे. रेकी करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर मास्क लावले होते.
20 Dec 2024, 14:59 वाजता
एकनाथ शिंदे यांची नाराज आमदारांशी चर्चा
जास्त लोक निवडून आल्याने काहींनी संयम ठेवावा. मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही त्यांना पक्षसंघटनेत संधी मिळेल. बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांची शिकवण महत्वाची. आम्ही सर्वजण कुटुंब आहोत, नाराजी नाही. आमच्या कामाची पोचपावती आम्हाला जनतेनं दिली. असं एकनाथ शिंदे म्हणाले.
20 Dec 2024, 14:31 वाजता
मुंबईत मंत्रालयाबाहेर भाजपविरोधात काँग्रेस आक्रमक
मुंबईत मंत्रालयाबाहेर भाजपविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हातात घेत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून 'जय भीम'च्या घोषणा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राजीनामा देण्याची मागणी.
20 Dec 2024, 14:06 वाजता
मुख्यमंत्री कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत : सुनील प्रभू
बीड, परभणीसंदर्भातील फडणवीसांची उत्तरं असमाधानकारक. ते गोलगोल फिरवत आहेत. मुख्यमंत्री कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही उद्या महाविकास आघाडीची भूमिका ठरवणार. सुनील प्रभू यांची माहिती.
20 Dec 2024, 13:44 वाजता
कांद्यावरील निर्यात शुल्क काढावे मागणीसाठी खासदार निलेश लंकेंचे संसदेत आंदोलन
कांद्यावरील निर्यात शुल्क पूर्णपणे काढावे या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांनी संसदेत आंदोलन केले. तसेच वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन निवेदनही सादर केले आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क केंद्र सरकारने 20 टक्क्यांनी वाढवल्यामुळे कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे कांद्याच्या किंमती घसरल्या आणि परिणामी शेतकऱ्याचे नुकसान झाले. कांद्यावरील निर्यात शुल्क सरकारने पूर्णपणे काढले पाहिजे यासाठी खासदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या इतर खासदारांसोबत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. गोयल यांना निवेदनाचे पत्र दिले. त्याचप्रमाणे लोकसभेच्या मकरद्वारावर उपोषण करण्यात आले.