Maharashtra Breaking News Live Update : विधानसभा निवडणुकी जवळ आली असून सगळ्यांचं त्याकडेच लक्ष लागलं आहे. या निमित्तानं महाराष्ट्रात अनेक केंद्रीय मंत्री पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसभरात काय काय घडतंय हे जाणून घेऊया? या लाईव्ह अपडेटमध्ये
16 Nov 2024, 19:51 वाजता
भाजपच्या केंद्रीय नेत्यांची फौज उद्या मुंबईत, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सभांचा धडाका
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा उद्या रविवारी शेवटचा दिवस असून यादिवशी भाजपच्या केंद्रीय नेत्यांची फौज मुंबईत असणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल मुंबईत प्रचार करणार असून पश्चिम बंगालचे सुवेंदू अधिकारीही मतदारांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या उद्या मुंबईत 2 तर ठाण्यात 2 जाहीर सभा घेणार. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल गुजरात भवन येथे गुजराती समाजासोबत साधणार संवाद तर बीकेसीमध्ये व्यावसायिकांशी करणार चर्चा करणार आहेत. तर सिंधी समाजाच्या एकत्रिकारणासाठी राज्यसभा खासदार महेश जेठमलानी बोरिवली, अंधेरी, विलेपार्ले आणि सायन कोळीवाड्यात सिंधी समाज संमेलनात सहभागी होणार आहेत.
16 Nov 2024, 18:47 वाजता
मनसे नेते अमित ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घरी भेट देणार
माहीम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी निवडणूक लढवणारे मनसेचे नेते अमित ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घरी भेट देणार आहेत. सावरकरांच्या घरी भेट देऊन ते सावरकरांची कन्या सुंदर सावरकर यांचे आशीर्वाद घेणार असून अमित ठाकरे थोड्याच वेळात सावरकर सदनात येतील.
16 Nov 2024, 18:10 वाजता
सांगली विधानसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील यांचे काँग्रेस पक्षातून निलंबन
सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारा विरोधात बंडखोरी करणा-या जयश्रीताई पाटील यांच्यावर काँग्रेस पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. हे जयश्रीताई पाटील यांना ६ वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले.
16 Nov 2024, 17:06 वाजता
काँग्रेस उमेदवार धनंजय चौधरी यांच्या घरासमोर शमिभा पाटील यांचा ठिय्या!
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य आणि आरोप काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचार सभेत करण्यात आले होते. त्यावर शमिभा पाटील यांनी हे आरोप सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान काँग्रेसला दिले होते. संबंधितावर कारवाई करावी यासाठी निवडणूक आयोगाने पोलिसांना पत्र देऊनही अद्याप करवाई करण्यात आली नाही. काँग्रेस उमेदवार धनंजय चौधरी यांनी तेथून पळ काढला असून, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील यांनी स्टार प्रचारक दिशा पिंकी शेख यांच्यासह चौधरी यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आरोप सिद्ध करण्याचे आव्हान शमिभा यांनी दिले होते. मात्र, आरोप सिद्ध न केल्याने शमिभा पाटील यांनी ठिय्या दिल्याचे सांगितले जात आहे.
16 Nov 2024, 16:14 वाजता
Uddhav Thackeray Exclusive : 'महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तो में बाटेंगे...' म्हणत उद्धव ठाकरेंकडून भाजपचा टप्प्यात कार्यक्रम
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा,
16 Nov 2024, 16:03 वाजता
महाविकास आघाडीमधील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार शरद पवारांनी जाहीर करावा, असं विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत केलंय.. शरद पवारांनी त्यांच्या मनातील नावं सांगावं.. असंही उद्धव ठाकरेंनी झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत म्हटलंय...
सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.
16 Nov 2024, 15:58 वाजता
मनसे नव्हे गुनसे झाल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय. झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉईंट या मुलाखतीत मनसेवर उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. त्यांनी महाराष्ट्रद्रोह्यांना मदत केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
16 Nov 2024, 15:13 वाजता
नातं जपायला ताकद लागते नाती तोडायला नाही, सुप्रिया सुळेंनी वळसेपाटलांना सुनावले
वळसेपाटील आणि पवार कुटुंबाचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहे हे मी कधीच विसरणार नाही समोरचा कसाही वागला तरी मी तरी त्यांबद्दल काहीही बोलणार नाही पण नातं जपायला ताकद लागते... नाती तोडायला नाही...! अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी दिलीप वळसेपाटलांना सुनावले. नाती जपायची ताकद माझ्यात आहे वळसेपाटलांनी साथ सोडल्याचे जास्ती दु:ख माझ्या आईला झालंय असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. देवदत्त निकम यांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे टाकळी हाजी येथे बोलत होत्या.
16 Nov 2024, 14:17 वाजता
- प्रियंका गांधींनी घेतलं साईबाबांचं दर्शन
- प्रियंका गांधी साईचरणी लीन
- काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी शिर्डीमध्ये दाखल झाल्यात
- बाळासाहेब थोरातांनी शिर्डी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं
- साई दर्शनानंतर प्रियंका गांधी महाराष्ट्र दौ-याला सुरुवात करणारेत
सगळ्यांना एकाच चष्मातून बघू नका, अजित पवारांची अल्पसंख्याक समाजाला विनंती
16 Nov 2024, 13:27 वाजता
सगळ्यांना एकाच चष्मातून बघू नका, अजित पवारांची अल्पसंख्याक समाजाला विनंती
आम्हाला 60 जागा आल्या पण त्यातला दहा टक्के जागा मुस्लिम उमेदवाराला दिल्या;असं अजित पवारांनी सोलापूरच्या जाहीर सभेत सांगितलं. मात्र यावेळी त्यांनी अल्पसंख्याक समाजाला विनंती केलीय की, सगळ्यांना एकाच चष्म्यातून बघू नका. यामुळे अजित पवारांचा नेमका निशाणा कुणावर? असा प्रश्न उपस्थित होत आहे.