Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत मुंबईच्या माहिम मतदार संघात होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. कारण, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे माहिम मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर हे अमित राज ठाकरेंविरोधात निवडणूक लढवत आहेत. निवडणूकीतून माघार घेण्यासाठी सदा सरवणकर यांच्याविरोधात दबावतंत्र अवलंबण्यात आले. मात्र, सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. अशातच आता अमित राज ठाकरेंविरोधात लढणाऱ्या सदा सरवणार यांच्या बाबत थेट देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता या पाठिंब्याची बिनशर्त परतफेड करण्यासाठी अमित ठाकरे यांच्यासाठी महायुती आपला उमेदवार मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, सर्व प्रयत्न अपयशी ठरले. शेवटपर्यंत सदा सरवणकर यांनी आपला निर्णय बदलला नाही. यामुळे सदा सरवणर हे अमित ठाकरेंसाठी मोठे चॅलेंज आहे. अशातच देवेंद्र फडणवीस सदा सरवणार यांच्या बाबत मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे अमित ठाकरेंसाठी ही निवडणूक जड जाणार आहे.
माहीम विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांचा प्रचार करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी माहीम विधानसभा मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांना दिले आहे. प्रचाराचे शेवटचे 3 दिवस उरले असताना सदा सरवणकर यांना दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवणुतकीत मनसे ने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता यावेळी या मतदार संघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यावा असा एक सूर भाजपामध्ये निघाला होता होता. काही नेत्यांनी अमित ठाकरे यांना पाठिंबाही जाहीर केला होता.आज, मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांनी सदा सरवणकर यांच्यासाठी प्रचार करण्याचं सांगितलं आणि भाजप कार्यकर्ते कामाला लागले यामुळे माझा विजय सुकर झाला अस सदा सरवणकर म्हणाले.
2009 मध्ये माहिम विधानसभा मतदारसंघातून मनसेचे नेते नितीन सरदेसाई 48 हजार मतांनी निवडून आले होते. तर, 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून संदीप देशपांडे यांना 42 हजार मतं मिळाली होती. 2014 मध्ये सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. त्यावेळी भाजपच्या विलास आंबेकर यांना 33 हजार मतं मिळाली होती. त्यामुळं माहिमध्ये भाजपचे देखील चांगली ताकद आहे.