Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील विधानसभेची मुदत नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपत असल्याने आता राज्याला विधानसभेच्या निवडणुकींचे वेध लागले आहेत. युती आणि आघाडीमधील घटक पक्षांच्या वाटाघाटी सुरु असतानाच राज्या सरकारने निर्णयांचा धडका लावल्याने राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. या शिवाय राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडीही सुरु असून याचसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी....
15 Oct 2024, 19:47 वाजता
रामटेक भाजपा माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचे 6 वर्षासाठी निलंबन
रामटेक भाजपा माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचे 6 वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशिष जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर केली होती. या विरोधात भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी विरोध दर्शवत भूमिका घेतली होती.यावर विरोध पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे मल्लिकार्जुन रेड्डी यांना सहा वर्षासाठी भाजपा पक्षातून निलंबित करण्याची कारवाई करण्यात आलीय.अनुशासन भंगाची कारवाई केलीय.त्यामुळे आता निलंबीत करण्यात आलेले मल्लिकार्जुन रेड्डी कारवाईनंतर स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची भूमिका घेतात का याकडे सर्वांचे लक्ष असेल. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध भूमिका घेणाऱ्याविरुद्ध पक्ष कठोर कारवाई करेल असा इशाराही दिलाय.
15 Oct 2024, 18:50 वाजता
मुंबईकडे जाणाऱ्या फास्ट ट्रॅकवरील लोकल ट्रेन सेवा ठप्प
मुंबईकडे जाणाऱ्या फास्ट ट्रेकवरील लोकल ट्रेन सेवा ठप्प झाली आहे.कुर्ला या भागात ओव्हर हेड वायर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल थांबल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.
15 Oct 2024, 17:52 वाजता
आमचे उमेदवार येत्या 2 ते 3 दिवसात जाहीर होतील- जयंत पाटील
आमचे उमेदवार येत्या 2 ते 3 दिवसात जाहीर होतील, असे विधान जयंत पाटील यांनी केले. अनेक योजना लाच म्हणून सरकार जनतेला देत आहे. विरोधक सर्व मार्गांचा अवलंब करतील, पण आपण ढळू न देता पवार साहेबांच्या मनातील उमेदवार निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
15 Oct 2024, 14:51 वाजता
बच्चू कडू मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, तासभरापासून चर्चा सुरु
बच्चू कडू मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. गेल्या एक तासांपासून बच्चू कडू मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आहेत.केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत आज मतदान आणि आचारसंहितेची तारीख ठरण्याच्या अगोदरच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थाने खलबत सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी मुख्यमंत्र्यांसोबत राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
15 Oct 2024, 13:32 वाजता
महायुतीची पत्रकार परिषद पुढे ढकलली
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज होणारी महायुतीची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच पुढील पत्रकार परिषदेचा दिनांक आणि स्थळ कळवण्यात येणार आहे.
15 Oct 2024, 12:45 वाजता
निवडणूक जाहीर होण्याच्या 3 तास आधीच 7 जणांनी घेतली आमदारकीची शपथ
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांचा शपथ विधी आज पार पडला. या शपथविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवारही अनुपस्थित होते. कोणत्याही महत्त्वाच्या नेत्याची उपस्थिती नसताना हा शपथविधी या नेत्यांच्या समर्थकांच्या उपस्थितीत पार पडला. हेमंत पाटील, पंकज भुजबळ, मनिषा कायंदे, इद्रिस नायकवडी, विक्रांत पाटील, बाबूसिंह महाराज राठोड आणि चित्रा वाघ यांनी आमदारकीची शपथ घेतली. विशेष म्हणजे साडेतीन वाजता विधानसभेची निवडणूक जाहीर होणार असून त्याच्या अवघ्या तीन तास आधी हा शपथ विधी पार पडला.
15 Oct 2024, 12:28 वाजता
राज ठाकरेंनी घेतलं अतुल परचुरेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं अतुल परचुरेंच पार्थिवचं अंत्यदर्शन. अतुल परचुरेंचं पार्थिव स्मशानभूमीच्या दिशेने रवाना. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार होणार.
15 Oct 2024, 10:56 वाजता
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याला ब्रेन स्ट्रोक; रुग्णालयात दाखल
नगर जिल्ह्यातील अकोल्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेन स्ट्रोक झाला आहे. माजी आदिवासी मंत्री असलेल्या पिचड यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत. नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आहे.
15 Oct 2024, 10:13 वाजता
महाविकास आघाडी उद्या जाहीर करणार पहिली यादी?
महाविकास आघाडीचं जागावाटप उद्या जाहीर होऊ शकते अशी शक्यता आहे. ही घोषणा मुंबईत होईल असं सांगितलं जात आहे. महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. कोणता पक्ष किती जागा लढणार उद्या जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
15 Oct 2024, 10:11 वाजता
अजित पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते शरद पवारांच्या भेटीला
अजित पवारांच्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील हे पवारांच्या भेटीला आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्ष सोडू नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले मात्र, उमेश पाटील आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले. महाविकास आघाडीतील पक्षाकडून त्यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण मिळाले असून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेणार, याची मोहोळच्या राजकारणात चर्चा रंगली आहे. मात्र आज ते शरद पवारांच्या भेटीला आले आहेत.