Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील विधानसभेची मुदत नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपत असल्याने आता राज्याला विधानसभेच्या निवडणुकींचे वेध लागले आहेत. युती आणि आघाडीमधील घटक पक्षांच्या वाटाघाटी सुरु असतानाच राज्या सरकारने निर्णयांचा धडका लावल्याने राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. या शिवाय राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडीही सुरु असून याचसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी....
15 Oct 2024, 10:09 वाजता
शरद पवारांच्या भेटीला अनेक नेते
पुण्यात शरदचंद्र पवार यांच्या भेटीला अनेक नेते आज पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात दाखल होत आहेत. पिंपरी चिंचवडचे माजी आमदार विलास लांडे पुन्हा शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. भाजप नेते पृथ्वीराज जाचक आणि अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील हे पवारांच्या भेटीला आले आहेत.
15 Oct 2024, 08:49 वाजता
आजच राज्यात लागणार आचारसंहिता! निवडणूक कार्यक्रम दुपारी साडेतीन वाजता होणार जाहीर
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. दिल्लीत होणाऱ्या या पत्रकार परिषदेत दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्राबरोबरच झारखंडमधील निवडणूका जाहीर होणार आहेत. विज्ञान भवनात ही पत्रकार परिषद पार पडणार आहे.
15 Oct 2024, 08:42 वाजता
नागपूरमध्येच फडणवीस भाजपा कार्यकर्त्यांमुळे अडचणीत; थेट पक्ष सोडण्याचा इशारा
रामटेक विधानसभेसाठी आशिष जयस्वाल यांची मुख्यमंत्री यानी उमेदवारी जाहीर केल्यानं भाजपच्या स्थानिक पदाधिकारी नाराज आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पारशिवणी विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्यात आशीष जयस्वाल यांचा पक्षप्रवेश करत त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. आशिष जयस्वाल यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी स्थानिक भाजप पदाधिकारी करत आहेत. भाजपच्या मसनर कार्यालयात बैठक पार पडली असून त्यात रामटेक भाजपने लढावी अशी भुमिका देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आशिष जयस्वाल यांची उमेदवारी कायम राहिल्यास भाजपच्या प्राथमिक सदस्य पदाचे राजीनामे देणार असाही सूर पदाधिकाऱ्यांनी लावला आहे.
15 Oct 2024, 08:40 वाजता
पुण्यातील स्कूलबस संदर्भात RTO चा मोठा निर्णय; आता...
पुण्यातील वानवडीतील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आरटीओकडून मोहीम सुरू करण्यात आली आहे. आता पुण्यातील सर्व स्कूल बसची माहिती वेबसाईटवर टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या पंधरा दिवसात स्कूल व्हॅन व बसची माहिती सर्व शाळा महाविद्यालयाने आरटीओच्या वेबसाईटवर टाकावी असे आदेश देण्यात आळे आहेत. माहिती न भरणाऱ्या शाळा महाविद्यालयांना शिक्षण विभागामार्फत नोटीस बजावण्यात येणार आहे. सहा हजार स्कूल व्हॅनची नोंदणी असताना 60% स्कूल बस योग्यता प्रमाणपत्र घेतलेल्या आहेत. प्रमाणपत्र न घेतलेल्या स्कूलबसची नोंदणी रद्द होणार आहे.
15 Oct 2024, 08:37 वाजता
राज्यपालनियुक्त आमदार प्रकरणी ठाकरे गट आक्रमक; घेणार मोठा निर्णय
महायुतीच्या राज्यपाल नियुक्त जागा नियुक्त केल्या तर ठाकरे गट पुन्हा न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. 12 पैकी महायुतीतील 7 जणांची नाव निश्चित केल्यानंतर ठाकरे गटाकडून न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी 7 ऑक्टोबरला सदर याचिकाचे युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर अजूनही निकाल बाकी आहे. या याचिकेचा निर्णय राखीव असताना आणि वादग्रस्त विषयाचा निर्णय प्रलंबित असताना त्या विषयावर निर्णय घेणे उचित होणार नाही असं ठाकरे गटाच म्हणणं आहे. अशा परिस्थितीत राज्यपालांनी जर या नावांना मान्यता दिली तर त्यांच्याविरुद्ध ठाकरे गट उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती समोर येत आहे.
15 Oct 2024, 08:36 वाजता
मध्यरात्री मनोज जरांगे-पाटील CM शिदेंच्या पक्षातील नेत्याला भेटले
मध्यरात्री मंत्री उदय सामंतांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. अंतरवाली सराटी येथे ही भेट झाली. दोघांमध्ये 2 तास चर्चा झाली. मनोज जरांगे यांच्या आरक्षणाबाबतच्या मागण्यांबाबत चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी भेट झाल्याने चर्चला उधाण आलं आहे.
15 Oct 2024, 08:33 वाजता
राज्यपालनियुक्त आमदारांपैकी 7 नावं महायुतीकडून निश्चित; विधान परिषदेवर वर्णी
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांची नावं महायुतीने निश्चित केली आहेत. भाजपकडून महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांना संधी देण्यात आली असून त्याचबरोबर सरचिटणीस विक्रांत पाटील आणि पोहरादेवी संस्थांचे महंत बाबूसिंह महाराज यांची वर्णी लागल्याचं वृत्त आहे. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवाडी यांची नावं निश्चित झाली आहे. तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील यांच्यासहीत मनीषा कायंदेना संधी दिली जाणार आहे.
15 Oct 2024, 08:31 वाजता
कॅनडातील उच्चायुक्तांना भारताने परत बोलवलं
उग्रवादी कारवाया थांबल्या नाहीत तर पुढली कार्यवाही देखील करू असा सज्जड दम भारताने कॅनेडाला दिला आहे. कॅनडातील खलिस्तानी उग्रवादयांकडून भारतीय राजदूत, उच्चायुक्त यांना लक्ष्य करण्याचे प्रकार झाले होते. त्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र खात्याने मोठा निर्णय घेतला आहे. भारताचा उच्च आयोग आता कॅनडात काम करणार नाही, असं भारताने स्पष्ट केलं आहे.
15 Oct 2024, 08:29 वाजता
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण : दुसऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक
पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून त्याला काल ताब्यात घेतले आहे. हाच मुख्य आरोपी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. नागपूर, अलाहाबाद, प्रयागराज असा शोध घेत उत्तर प्रदेशमधून आरोपीला ताब्यात घेतले आहे. आज दुपारपर्यंत या दुसऱ्या आरोपीला पुण्यात आणलं जाईल असं सांगितलं जात आहे.
15 Oct 2024, 08:26 वाजता
पुण्यात शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर भेटीगाठी
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी आज सकाळी आठ वाजल्यापासून पुण्यातील निवासस्थानी मोदी बागेत कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.