Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्या क्षणापासून राजकीय गणितं आणि डावपेचांना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. येणारा प्रत्येक दिवस नवं काहीतरी दाखवून जात आहे. आजच्या दिवशी कोणत्या घडामोडींना असणार महत्त्वं? कोणत्या घडामोडी ठरणार गेम चेंजर? पाहा LIVE UPDATES...
17 Oct 2024, 07:29 वाजता
विधानसभेच्या निवडणुकीसाठी उरले 3 दिवस
पालिका आयुक्तांकडे मुंबई उपनगर व मुंबई शहर या दोन्ही जिल्ह्यांसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बुधवारी पालिका मुख्यालयात बैठक घेत मतदानाच्या प्रक्रियेसंदर्भात माहिती दिली. मुंबई शहर व उपनगरात मिळून एक कोटीहून अधिक नोंदणीकृत मतदार आहेत.
17 Oct 2024, 07:26 वाजता
उदयनराजे- शिवेंद्रराजे यांच्यामध्ये बैठक
खासदार उदयनराजे आणि त्यांचे बंधू शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावलीये. साता-यात ही बैठक पार पडणारेय. विधानसभा आणि जिल्ह्यातील भाजप पक्षाच्या निवडणूक कार्यक्रमाची बैठकीत चर्चा होणारेय.
17 Oct 2024, 06:56 वाजता
आज भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
आज भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता. विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत दिग्गज नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता. पुढील काही तासात भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता. हरियाणाचे मुख्यमंत्र्यांचा चंदीगडमध्ये शपथविधी पार पडणार आहे या शपथविधी सोहळ्यानंत अमित शाहांसोबत शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत अमित शाहांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे.
17 Oct 2024, 06:55 वाजता
मविआचं जागावाटपाचं सूत्र ठरलं
महाविकास आघाडीचं विधानसभेसाठी मुंबईतील जागावाटपाचं सूत्रही ठरल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालीये. ठाकरे पक्षाला मुंबईमध्ये सर्वाधिक 18 जागा मिळणार, काँग्रेसला 14, शरद पवार पक्षाला 2, समाजवादी पक्षाला 1 अशा पद्धतीने जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तर आज महाविकास आघाडीची मुंबई बैठक होणार आहे. विधानसभेच्या जागांबाबत आज पुन्हा एकदा चर्चा होणार असून आजची बैठक ही अंतिम असण्याची माहिती आहे.