Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: राज्यात विधानसभा निवडणुकांमुळं राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील घडामोडींचा सविस्तर आढावा एका क्लिकवर
8 Nov 2024, 08:18 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाराशिव जिल्ह्यात आज तीन सभा
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज धाराशिव जिल्ह्यात तीन सभा असणार आहेत. आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या भूम परंडा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिली सभा घेणार आहेत. ही सभा आत्तापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक सभा असणार असून मुख्यमंत्र्यांची धाराशिव जिल्ह्यातील सभा म्हणजे विजयाची नांदी आहे असा दावा आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केला आहे. दुपारनंतर धाराशिव व उमरगा या दोन मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा सभा होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर धाराशिव जिल्ह्यात सभांचा धडाका सुरू होणार आहे
8 Nov 2024, 07:09 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: पूजा खेडकरविरोधात युपीएससी आणि दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळला जावा अशी मागणी केली आहे. पूजा खेडकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण होईपर्यंत दरवेळी पुढील तारखेपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण मिळते आहे
8 Nov 2024, 07:04 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा आज महाराष्ट्र दौरा
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यातील महत्त्वाच्या शहरांत जाहीर सभा होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा
दुपारी 12 वाजता - धुळे
दुपारी 2 वाजता - नाशिक
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सभा
शिराळा विधानसभा
सकाळी 11:00 वाजता..
स्थळ - विश्वासराव नाईक कॉलेज मैदान, शिराळा, सांगली
कराड दक्षिण विधानसभा
दुपारी: 12. 30
स्थळ - आदर्श विद्यामंदिर, कराड, सातारा
सांगली विधानसभा
दुपारी - 02:15 वाजता
स्थळः डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, खणभाग, सांगली
इचलकरंजी विधानसभा
संध्याकाळी - 04:15 वाजता
स्थळ: व्यंकोबा मैदान चौक, कोल्हापुर
8 Nov 2024, 07:03 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: ठाण्यात ९३३ मतदारांना करायचंय घरातूनच मतदान
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: विधानसभा निवडणुकीत ८५ वर्षांपेक्षा जास्त वयोमानाचे ज्येष्ठ मतदार व दिव्यांग असे ९३३ जण यावेळी घरून मतदान करणार आहेत. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात ८०१ ज्येष्ठ मतदार व दिव्यांगांनी घरून मतदान केले होते. या योजनेची जनजागृती होत असल्याने घरून मतदान करणाऱ्यांची संख्या ठाणे जिल्ह्यात १३३ने वाढली. ज्या मतदारांनी वेळेत 'फॉर्म १२ डी' भरून दिला त्यांना घरून मतदानाची संधी मिळाली.