अल्लू अर्जुनवरचं संकट संपता संपेना; 'त्या' महिलेच्या मुलगा Brain Dead, हैदराबाद पोलिसांची काय असणार पुढची कारवाई?

Pushpa 2 Stampede Case:  अल्लु अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमा एकीकडे भरघोस कमाई करत आहे तर दुसरीकडे सिनेमाला गालबोट लागणाऱ्या घटना एकापाठोपाठ घडत आहे. 8 वर्षांच्या तेजचा जीव धोक्यात आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 18, 2024, 12:19 PM IST
अल्लू अर्जुनवरचं संकट संपता संपेना; 'त्या' महिलेच्या मुलगा Brain Dead, हैदराबाद पोलिसांची काय असणार पुढची कारवाई? title=

Allu Arjun Pushpa 2 Stampede Case: अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट थिएटरमध्ये येऊन दोन आठवडे झाले आहेत. मात्र प्रीमियरदरम्यान झालेल्या अपघाताशी संबंधित बातम्या सतत चर्चेत असतात. 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिला रेवतीचा मृत्यू झाला आणि तिचा 8 वर्षांचा मुलगा श्री तेज गंभीर जखमी झाला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तो आपल्या जीवनाशी झुंज देत आहे. अल्लू अर्जुन आणि तेज यांची अद्याप भेट झालेली नाही.

मात्र, दरम्यान हैदराबादचे पोलीस आयुक्त रुग्णालयात पोहोचले. जिथे त्यांनी श्री तेजच्या प्रकृतीचा आढावा घेतला. त्यावेळी तेलंगणाच्या आरोग्य सचिव क्रिस्टीना झेड चोंगथू उपस्थित होते. या भेटीनंतर त्यांनी मुलाच्या प्रकृतीबद्दल दुःखद माहिती दिली. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. हिंदू वृत्तपत्रानुसार, पोलिस आयुक्त आनंद यांनी सांगितले की, मुलाच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचे ब्रेन डॅमेड झाले असून डॉक्टरांनी आता त्याला ब्रेन डेड घोषित केलं आहे. ही स्थिती सुधारण्यास वेळ लागेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

पोलिस आयुक्तांनी घेतली मुलाची भेट 

8 वर्षांचा तेज सध्या व्हेंटिलेटरवर आहे. दरम्यान अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आणि विचारले की तो अद्याप मुलाला का भेटला नाही? त्याने लिहिले, 'मी श्रीमान तेज यांच्या प्रकृतीबद्दल खूप काळजीत आहे. या घटनेनंतर तो रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कायदेशीर प्रक्रियेमुळे मला यावेळी त्याची भेट टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मी त्याच्या कुटुंबासोबत आहे आणि त्यांच्यावर उपचार आणि मदत करण्यास मी बांधील असल्याच अल्लु अर्जुनने सांगितलं आहे. तो लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.

पोलीस उचलली कठोर पावले

याप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला गेल्या शुक्रवारी अटकही करण्यात आली होती. मात्र, त्याच दिवशी त्यांना न्यायालयातून जामीन मिळाल्याने शनिवारी त्यांची सुटका झाली. 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर 4 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. एका मीडिया रिपोर्टनुसार, तेलंगणा पोलीस आता या अंतरिम जामिनाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. आता या प्रकरणाचे पुढे काय होते हे पाहायचे आहे.