Khalapur Landslide LIVE Updates: राज्यात सुरु असणाऱ्या पावसामुळं आता अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिथं मुंबईमध्ये पावसाचा जोर सकाळच्या वेळात काहीसा ओसरला असला तरीही राज्याच्या उर्वरित भागात पावसानं उसंत घेतलेली नाही. त्यातच बुधवारी रात्री उशिरानं रायगडमधील इरसालगड येथे असणाऱ्या इरसाल वाडी या आदिवासी वस्ती असणाऱ्या पाड्यावर दरड कोसळल्यामुळं मोठं संकट ओढावलं आहे. रात्री उशिरा ही घटना घडल्याचं लक्षात येताच तताडीनं बचावकार्य हाती घेण्यात आलं. ज्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीसुद्धा बचावकार्यामध्ये लक्ष घालताना दिसत आहेत.
20 Jul 2023, 17:50 वाजता
हे ही वाचा : चक्क डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले मुख्यमंत्री, इरसालवाडीच्या पीडितांशी साधला संवाद
20 Jul 2023, 17:34 वाजता
रायगड दुर्घटनेबाबत विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलं निवेदन
Khalapur Landslide LIVE Updates: रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड येथे दरड कोसळण्याच्या घटनेनंतर अधिक मनुष्यबळाची गरज असल्याने सिडकोमार्फत 1000 कामगार यंत्रसामुग्रीसह घटनास्थळी पाठविण्यात आले आणि ते तेथे दाखल झाले आहेत. एनडीआरएफच्या देखरेखीत ते काम करीत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 3 बॉबकट मशिन्स उपलब्ध झाल्या असून त्यातील 1 मशीन तेथे पोहोचली असून उर्वरित 2 थोड्याच वेळात पोहोचतील. मात्र हेलिकॉप्टरने त्या मशिन्स प्रत्यक्ष उपयोगात आणण्यासाठी हवामानाचे अडथळे येत आहेत. दुपारी 3 पर्यंत 10 मृतदेह सापडले असून 4 जण जखमी आहेत.स्वतः 1.30 तास चालत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी गेले. कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यात सुमारे 11,500 नागरिकांचे स्थलांतर गेल्या 2 दिवसात करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2 दिवसात 235 मिमी पाऊस झाला. भद्रावती तालुका, कचराळी गावांचा संपर्क तुटला होता, आता तो पूर्ववत झाला आहे.
20 Jul 2023, 13:34 वाजता
Khalapur Landslide LIVE Updates: मानवी प्रयत्नांच्या आधारे बचावकार्य हाती घेण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या वतीनं स्थानिक यंत्रणांच्या मदतीनं बचावकार्य हाती घेण्यात आलं आहे.
20 Jul 2023, 13:34 वाजता
Khalapur Landslide LIVE Updates: परिस्थिती अतिशय भयावह असून, आपल्या परिनं जे काही करता येईल ते सर्व प्रयत्न करावेत असा सूर युवा नेते आदित्य ठाकरे यांन आळवला. आम्हीही स्थानिकांची भेट घेऊन दुर्घटनाग्रस्तांना आधार देण्य़ाचा प्रयत्न करत आहोत. गावकऱ्यांची भेट घेताना घटनास्थळी गर्दी करण्यात अर्थ नसून, यामुळं एनडीआरएफच्या बचावकार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो, ही वस्तुस्थितीही त्यांनी मांडली.
20 Jul 2023, 12:54 वाजता
Khalapur Landslide LIVE Updates: 'रायगडची घटना दुर्देवी आहे. अशी घटना घडू नये यासाठी सरकारकडे विनंती करत असतो. शेकडो गावं राज्यातील डोंगर पायथ्याशी आहेत. त्यामुळं पश्चिम घाट पट्ट्यातील गावांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची असतानाही सरकारकडून मात्र त्याबाबत गंभीर दखल घेतली जात नाही', असं विनायक राऊत म्हणाले.
20 Jul 2023, 12:28 वाजता
Khalapur Landslide LIVE Updates: इरसालवाडी दरड दुर्घटनेतील मृतांची नावं खालीलप्रमाणं-
1) रमेश हरी भवर, वय 26
2) जयश्री रमेश भवर, वय 22
3) रुद्रा रमेश भवर, वय 1 वर्ष
4) विनोद भगवान भवर, वय 4 वर्ष
5) जिजा भगवान भवर, वय 36
दुर्घटनेत दोन चिमुकल्यांच्या मृत्यू
जखमींची नावं -
1) प्रवीण पांडुरंग पारधी, 21 वर्षं
2) यशवंत राघो डोरे, वय 37 वर्षं
3) भगवान हरी भवर, वय 25 वर्षं
4) मनीष यशवंत डोरे, वय 35 वर्षं
बचाव कार्यासाठी नवी मुंबई येथील अग्निशमन दलाचे पथ इरसालवाडी येथे जात असताना पथकातील कर्मचारी शिवराम यशवंत ढुमणे यांचा मृत्यू झाला आहे. श्वसनाचा त्रास झाल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
20 Jul 2023, 12:15 वाजता
Maharashtra Rain : मुंबई कोल्हापूरच्या गगनबावडा परिसरात धुवांधार पावसाला सुरूवात झालीये. या धुवांधार पावसामुळे समोर रस्ता देखील दिसेनासा झालाय. या रस्त्यावरून वाहनचालक आपला जीव मुठीत टाकून प्रवास करताना दिसताये. मुसळधार कोसळणा-या पावसामुळे नदी, नाले देखील दुथडी भरून वाहताये. त्यामुळे पूर येण्याची शक्यता वर्तवली जातेय.
20 Jul 2023, 11:57 वाजता
Khalapur Landslide LIVE Updates: पुणे जिल्ह्यातल्या दरडप्रवण आणि पूरप्रवण गावांवर जिल्हा प्रशासनाचं अधिक लक्ष, सर्व गावांना सतर्कतेचा इशारा.
20 Jul 2023, 11:43 वाजता
Maharashtra Rain : मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळ सर्व्हिस रोडचा संरक्षक कठडा सकाळी कोसळलाय. तो कोसळतानाचा व्हिडिओ झी २४ तासच्या हाती लागलाय. महामार्गावर महाडजवळ सावित्री नदीच्या किनाऱ्याला लागूनच हा सर्व्हिस रोड आहे. सकाळी हा भाग खचून कठडा कोसळला. तर नडगाव गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या संरक्षक भिंतीला तडे गेल्याची बाबही काल समोर आली होती. या घटनेने मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झालाय.
20 Jul 2023, 11:40 वाजता
Khalapur Landslide LIVE Updates: 'साडेदहावाजता भूई दणाणली. आम्ही जीव घेऊन पळालो, आता तिथून आम्हाला इथं परत आणलं. एकदम जोराच आवाज झाला आणि आम्ही तिथून पळालो', अशी माहिती इसरालवाडीतील एका महिलेनं दिली. 'सकाळी वाडीत जाऊन नेमकं काय घडलं ते बघायला जाऊ, असा विचार आम्ही केला पण आता फक्त मातीच राहीली.... सगळं गेलं... ', असं म्हणत त्या महिलेनं एकच टाहो फोडला