Mumbai Rain LIVE: पावसाने बेहाल झालेली मुंबई हळूहळू पूर्वपदावर, रेल्वे स्थानकातील गर्दी ओसरली

Mumbai Rain Live Updates: मुंबई, ठाणे, रायगडमधील शाळांना गुरुवारी सुट्टी. महाराष्ट्रात ऑरेंज अर्लट जारी करण्यात आल्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पालघर शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Mumbai Rain LIVE:  पावसाने बेहाल झालेली मुंबई हळूहळू पूर्वपदावर, रेल्वे स्थानकातील गर्दी ओसरली

Maharashtra Weather LIVE Updates : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर अधिकाधिक वाढताना दिसत असून, मुंबईसह कोकण पट्ट्याला पावसानं झोडपून काढलं आहे. इथं विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही परिस्थिती वेगळी नसून, मुंबई लोकलवरही पावसाचा थेट परिणाम दिसून येत आहे. राज्यात येत्या काळात नेमका पावसाचा काय अंदाज असेल, हवामान खात्यानं नेमका काय अंदाज वर्तवला आहे, याची सविस्तर माहिती या लाईव्ह ब्लॉगमध्ये 

 

19 Jul 2023, 14:25 वाजता

Maharashtra Rain Updates : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतीसह तालुक्यातील अनेक भागात पावसाचे पाणी हे घरांमध्ये घुसल्याचे पाहायला मिळत आहे. रावेर तालुक्यातील सावदा या परिसरातील नाल्याला मुसळधार पावसामुळे नदीचे स्वरूप आले असून नाल्याचे पाणी हे गावातील लोकांच्या घरात शिरले आहे. त्यामळे नागरिकांना प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. 

 

19 Jul 2023, 14:21 वाजता

Maharashtra Rain Updates : पोलादपूर तालुक्यातील सवाद माटवण रस्त्यावर पुराचे पाणी आल्याची माहिती मिळत आहे. माटवण फाट्याच्या पुढे रस्त्यावर 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी सवाद गावात पाणी शिरायला सुरुवात झाल्यामुळं काही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम यंत्रणांनी हाती घेतले आहे. 

19 Jul 2023, 14:03 वाजता

Maharashtra Rain Updates : वसई विरार मध्ये काल रात्रीपासून दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या पावसाचा फटका आता मुंबई अहमदाबाद महामार्गाला बसला आहे. महामार्गावर पडलेले खड्डे व साचलेल्या पाण्यामुळे गुजरात ते मुंबई दिशेने जाणारी वाहतूक ही संपूर्ण ठप्प झाली असून वर्सोवा पुलापासून वसई पर्यंत वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 

 

19 Jul 2023, 13:15 वाजता

Maharashtra Rain Updates : महाड मधील पुराच्या पाण्यात वाढ. सावित्री, गांधारी नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी. मुख्य बाजारपेठेत दोन फुटांवर पाणी आल्याची माहिती आहे. या परिस्थितीमुळं सध्या हजारो वाहनं मुंबई गोवा महामार्गावर उभी आहेत. 

 

19 Jul 2023, 13:03 वाजता

Maharashtra Rain Updates : तापी नदीच्या उगम स्थानावर मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे, हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने हतनूर धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले असून, पाण्याचा विसर्ग तापी नदीत सोडण्यात आला आहे. यापुढे पाणी पातळीत वाढ होत राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे. यामुळे सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पातुन पुढील 3 ते 4 तासात साधारण ३० ते ३५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात येणार असून, तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीत आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये अशा सुचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आले आहेत

19 Jul 2023, 12:46 वाजता

Maharashtra Rain Updates : मध्य मुंबईमध्ये जोर ओसरला. उपनगरांमध्ये मुसळधार सुरुच. मध्ये रेल्वेवर पावसाचा थेट परिणाम. पुढील दोन-तीन तासांत शहरात पुन्हा मुसळधार. 

 

19 Jul 2023, 12:14 वाजता

Maharashtra Rain Updates : पावसाच्या माऱ्यामुळं वसईमध्येही सखल भाग जलमय झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक नेटकऱ्यांनी आपआपल्या भागातील पावसाचे व्हिड़ीओ सोशल मीडियावर शेअर केले. वसईचा असाच एक व्हिडीओ... 

19 Jul 2023, 12:09 वाजता

Maharashtra Rain Updates : पावसाचा तडाखा पोलीस स्थानकालाही बसला. एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केली पहिली दृश्य... 

 

19 Jul 2023, 12:05 वाजता

19 Jul 2023, 11:58 वाजता

Maharashtra Rain Updates : पुणे वेधशाळेचे महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार पुढील 2 ते 3 तासांमध्ये कोकण, मुंबई, पालघर या भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल. तिथं चंद्रपूर, गडचिरोलीमध्येही परिस्थिती वेगळी नाही.