Mumbai Rain LIVE: पावसाने बेहाल झालेली मुंबई हळूहळू पूर्वपदावर, रेल्वे स्थानकातील गर्दी ओसरली

Mumbai Rain Live Updates: मुंबई, ठाणे, रायगडमधील शाळांना गुरुवारी सुट्टी. महाराष्ट्रात ऑरेंज अर्लट जारी करण्यात आल्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पालघर शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Mumbai Rain LIVE:  पावसाने बेहाल झालेली मुंबई हळूहळू पूर्वपदावर, रेल्वे स्थानकातील गर्दी ओसरली

Maharashtra Weather LIVE Updates : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर अधिकाधिक वाढताना दिसत असून, मुंबईसह कोकण पट्ट्याला पावसानं झोडपून काढलं आहे. इथं विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही परिस्थिती वेगळी नसून, मुंबई लोकलवरही पावसाचा थेट परिणाम दिसून येत आहे. राज्यात येत्या काळात नेमका पावसाचा काय अंदाज असेल, हवामान खात्यानं नेमका काय अंदाज वर्तवला आहे, याची सविस्तर माहिती या लाईव्ह ब्लॉगमध्ये 

 

19 Jul 2023, 19:00 वाजता

Schools Closed Tomorrow : महाराष्ट्रात ऑरेंज अर्लट जारी करण्यात आल्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पालघर शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि कलेक्टर यांच्याकडून माहिती घेऊन ही सु्ट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातली आपत्कालीन यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. 

19 Jul 2023, 18:35 वाजता

Mumbai Rain : रेल्वे स्टेशनच्या बाहेरुन बसेस सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सीएसटीए,भायखळा दादर, घाटकोपर ठाणे स्थानकाच्या बाहेरून एसटी आणि बसेस सोडण्यात येणार आहे. तर चर्चगेट, मुंबई सेट्र्ल, दादर, वांद्रे, अधेरी आणि बोरिवली स्टेशनच्या बाहेर एसटी आणि बसेसची सोय करण्यात येणार आहे. 

19 Jul 2023, 17:34 वाजता

Mumbai Rain : मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहिला मिळतं आहे. ठाण्यापुढे लोकल जात नसल्याने आज घरी कसं पोहोचणार असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. 

19 Jul 2023, 17:24 वाजता

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान अंबरनाथ लोकल थांबली असताना एक महिला लहान बाळासोबत खाली उतरली. पण नाल्यात चार महिन्याचं बाळ वाहून गेल्याची दुर्घटना घडली. आताच मिळालेल्या माहितीनुसार एनडीआएफ जवानाने या बाळाला वाचवलं. 

 

बातमी सविस्तर वाचा - मुंबईत नाल्यात वाहून गेलं 4 महिन्यांचं बाळ; लोकल थांबली असताना हातातून निसटलं

19 Jul 2023, 17:16 वाजता

मुंबई मुसळधार पाऊस

मुसळधार पावसाची परिस्थिती लक्षात घेता मुंबई आणि परिसरातील मंत्रालय, सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना घरी लवकर सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री

19 Jul 2023, 17:03 वाजता

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्ये रेल्वेची वाहतूक प्रचंड विस्कळीत झालीय. सीएसएमटी ते डोंबिवली अशीच वाहतूक सुरू आहे. डोंबिवलीच्या पुढे गाड्या जात नाहीयत. तर डोंबिवली ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते डोंबिवली वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. सकाळपासूनच ट्रेन्स रखडतायत. रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांची मोठी गर्दी झालीय. सकाळपासूनच प्रवाशांचे हाल होतायत. 

19 Jul 2023, 15:36 वाजता

Maharashtra Rain Updates : कल्याण कर्जत रेल्वे वाहतुक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद. या निर्णय़ामुळं प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून, कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवासी अडकले आहेत. अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकात दरम्यान रेल्वे रुळावर पाणी आल्याने अंबरनाथ ते कर्जत ही रेल्वे वाहतूक आधीच बंद  आहे. शासनाने पर्यायी व्यवस्था करावी अशी प्रवाशांची मागणी

 

19 Jul 2023, 15:22 वाजता

Maharashtra Rain Updates : कल्याण मुरबाड मार्गावरील वाहतूक पूर्णपण ठप्प. पावसाचा जोर वाढत असल्यामुळं नागरिकांच्या अडचणी वाढल्या. 

 

19 Jul 2023, 15:10 वाजता

मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे  वाहतूक बंद
12123 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे - डेक्कन क्वीन (19 जुलै)
12124 – पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - डेक्कन क्वीन (20 जुलै)
11009 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे - सिंहगड एक्स्प्रेस (19 जुलै)
11010 – पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सिंहगड एक्स्प्रेस (20 जुलै)
11008 - पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - डेक्कन एक्स्प्रेस (19 जुलै)
11007 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे - डेक्कन एक्स्प्रेस (20 जुलै)
12128 - पुणे - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी सुपरफास्ट एक्स्प्रेस (19 जुलै)
12127 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे इंटरसिटी सुपरफास्ट एक्स्प्रेस (20 जुलै)
22106 - पुणे - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - इंद्रायणी सुपरफास्ट एक्स्प्रेस (19 जुलै)
22105 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे - इंद्रायणी सुपरफास्ट एक्स्प्रेस (20 जुलै)

19 Jul 2023, 15:06 वाजता

मध्य रेल्वे ठप्प

कल्याण-ठाणे-कल्याण लोकल सेवा ठप्प झालीये.. तासाभरापासून कल्याणहून CMSTच्या दिशेनं एकही लोकल रवाना झालेली नाहीये. अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं रुळांखालची खडी वाहून गेलीय. अंबरनाथ बदलापूर परिसरातर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दुरुस्तीच्या कामाला उशीर होतोय... त्यामुळे रेल्वे सेवा सुरू होण्यास बराच अवधी लागण्याची शक्यता आहे. अंबरनाथ ते कर्जतदरम्यान लोकलसेवा ठप्प झालीय.. बदलापूर-अंबरनाथदरम्यान पाणी भरल्यानं लोकलसेवा ठप्प झालीय..