Maharashtra Weather LIVE Updates : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर अधिकाधिक वाढताना दिसत असून, मुंबईसह कोकण पट्ट्याला पावसानं झोडपून काढलं आहे. इथं विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही परिस्थिती वेगळी नसून, मुंबई लोकलवरही पावसाचा थेट परिणाम दिसून येत आहे. राज्यात येत्या काळात नेमका पावसाचा काय अंदाज असेल, हवामान खात्यानं नेमका काय अंदाज वर्तवला आहे, याची सविस्तर माहिती या लाईव्ह ब्लॉगमध्ये
19 Jul 2023, 11:53 वाजता
Maharashtra Rain Updates : बदलापूर- अंबरनाथदरम्यान, अप आणि डाऊन मार्गावरील लोकलसेवा पूर्णपणे ठप्प; रेल्वेरुळांवर पाणी साचल्यामुळं घेतला निर्णय.
Ambarnath- Badlapur (UP+DOWN) section closed from 11.05 hrs as a safety measure due to heavy rains and water above track level.
CSMT to Ambarnath section and Badlapur to Karjat section running.
— Central Railway (@Central_Railway) July 19, 2023
19 Jul 2023, 11:45 वाजता
Maharashtra Rain Updates : मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वडगाव बुद्रुक येथील मुठा नदी पुल परिसरात रस्त्यावर पडलेल्या मोठं मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुक व्यवस्था ठप्प झालेली आहे. नदी पुला पासून नविन कात्रज बोगद्या पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे वाहन चालक, नागरिक, कामगार, विद्यार्थी हैराण झाले आहेत.
19 Jul 2023, 11:39 वाजता
Maharashtra Rain Updates : कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोकापातळी गाठली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.
19 Jul 2023, 11:21 वाजता
Maharashtra Rain Updates : कर्जतकडून कल्याणकडे येणारी वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद. मुसळधार पावसामुळे अप दिशेची वाहतूक थांबवण्याचा मध्यरेल्वेचा निर्णय. कल्याणहून कर्जतकडे जाणारी वाहतूक मात्र सुरु.
19 Jul 2023, 11:18 वाजता
Maharashtra Rain Updates : रायगड जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळी...
हेसुद्धा वाचा : महाराष्ट्रात धुवांधार! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, महाडमध्ये पूरस्थिती; साताऱ्यात कोसळली दरड
19 Jul 2023, 11:17 वाजता
Maharashtra Rain Updates : अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी. वाकण ते खोपोली महामार्गावरील पाली येथील पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाल्यामुळं दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली आहे. ज्यामुळं दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सुधागड तालुक्यात पावसाची संततधार सुरूच.
19 Jul 2023, 11:16 वाजता
Maharashtra Rain Updates : रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. खालापूर तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून पावसाचे पाणी रसायनी पोलीस ठाण्यात शिरले आहे. रसायनी पासून जवळच आपटा बाजार पेठेत रस्त्यावर कमरे इतके पाणी साचले असून आजबाजुची घरे आणि दुकानात पाणी शिरले आहे.