Maharashtra Rain Live Updates : कोल्हापूरातील राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले

Maharashtra Rain Live Updates : पावसाच्या या दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र ओलाचिंब झाला आहे. राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात काय परिस्थिती? पाहा एका क्लिकवर...   

Maharashtra Rain Live Updates : कोल्हापूरातील राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले

Maharashtra Rain Live Updates : महाराष्ट्रात पावसानं चांगलाच जोर धरलेला असताना शुक्रवारपर्यंत हे चित्र कायम राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. असं असतानाच तिथं कोल्हापुरातून राधानगरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळं प्रशासन आणि यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. 

तिथं कोकणासह सातारा आणि पुण्यातील काही भागांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत मात्र पावसाचा जोर अंशत: ओसरेल असा अंदाज आहे. तिथं अहमदनगर शहराबरोबरच जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पावसाला सुरुवात आहे. मागील आठ दिवसापासून ढगाळ वातावरण होतं मात्र पाऊस पडत नव्हता मात्र आज दुपारपासूनच पावसाची संततधार सुरू झाली आहे जून महिन्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेक भागात खरिपाची पेरणी झाली नाही तर काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट ओढावलं होतं मात्र आता सर्व दूर पाऊस होत असल्याने पिकांना जीवदान मिळालं आहे. 

26 Jul 2023, 16:04 वाजता

Maharashtra Rain Live Updates : कोल्हापूरातील राधानगरी धरण 100 टक्के भरलंय. शहरात पावसानं उसंत घेतली असली तरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी धरण 100% भरल्याने 5 दरवाजे उघडण्यात आलेत. धरणातून एकूण 8 हजार 540 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरूय. या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यताय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर अनेक जणांना स्थलांतर करण्याचं आवाहन केलंय.

26 Jul 2023, 15:12 वाजता

Maharashtra Weather Rain Live Updates :  वसई विरार मध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे या पावसाचा फटका शहरासह मुंबई अहमदाबाद महामार्गाला बसला आहे. महामार्गावर पडलेले खड्डे व साचलेल्या पाण्यामुळे गुजरात ते मुंबई दिशेने जाणारी वाहतूक ही संपूर्ण ठप्प झाली असून वर्सोवा पुलापासून नायगाव पर्यंत वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत . गेल्या अनेक दिवसांपासून हे चित्र पाहायला मिळत असल्याने या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी हैराण झाले आहेत. तासनतास या कोंडीत अडकून पडत असल्याने नोकरी जाण्याची भीती काही जण व्यक्त करत आहेत. 

 

26 Jul 2023, 13:52 वाजता

Maharashtra Weather Rain Live Updates :  सिंधुदुर्गात सध्या संततधार पाऊस पडत असून सातत्याने पडणाऱ्या या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक छोटी मोठी धरणे भरून गेली आहेत.सह्याद्रीच्या कुशीतील हरकुळ धरण ही शंभर टक्के भरून गेलं आहे. गेले आठ दिवस कोसळत असलेल्या संततधार पावसाने हरकुळ येथील धरण भरून ओंसडून वाहू लागले आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत असलेल्या या धरणाचे विहंगम दृष्य ड्रोन कॅमेऱ्यातून आणखीनच खूलुन दिसत आहे

 

26 Jul 2023, 13:39 वाजता

Maharashtra Weather Rain Live Updates :  राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले. धरणक्षेत्रानजीकच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, सध्या यंत्रणा प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवून आहेत. 

 

26 Jul 2023, 13:10 वाजता

26 Jul 2023, 12:38 वाजता

Maharashtra Weather Rain Live Updates :  काही तासांची उसंत घेतल्यानंतर मुंबईतील बऱ्याच भागांमध्ये पुन्हा मुसळधार 

26 Jul 2023, 11:16 वाजता

Maharashtra Weather Rain Live Updates :  हवामान खात्यांना रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिला त्यामुळे कालपासूनच जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आज बंद राहणार आहेत. त्याचबरोबर खेडची जगबुडी नदी आणि संगमेश्वरची शास्त्री नदी ही इशारा पातळीवर वाहत आहेत.

 

26 Jul 2023, 10:38 वाजता

Maharashtra Weather Rain Live Updates :  रायगड जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. जिल्ह्याच्या सर्वच भागात अती मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरड प्रवण भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मोठ्या पावसाच्या शक्यतेने जिल्हाधिकारी यांनी आज जिल्ह्यातील शाळा, कॉलेजेसना सुटी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान आज पहाटे पासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी सर्वत्र ढग दाटून आले आहेत.

 

26 Jul 2023, 10:37 वाजता

Maharashtra Weather Rain Live Updates :  सातारा जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून त्यामुळे धरणांच्या पाणी पातळी वाढ होताना पाहायला मिळत आहे.गेल्या 24 तासात नवजा 215 मिमी,कोयना 149 मिमी महाबळेश्वर 163 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे डोंगर माथ्यावरील, दरड प्रवण क्षेत्रातील लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे

 

26 Jul 2023, 10:37 वाजता

Maharashtra Weather Rain Live Updates :  उत्तर पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू असून संततधार पावसामुळे खेड तालुक्यातील सर्वात मोठे धरण असलेले चासकमान धरण 80 टक्के क्षमतेने भरले असून भिमाशंकर परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरणार असल्याने बळीराजा शेतकऱ्याचा वर्षभराचा पाणी प्रश्न मिटणार आहे