Maharashtra Rain Live Updates : कोल्हापूरातील राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले

Maharashtra Rain Live Updates : पावसाच्या या दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र ओलाचिंब झाला आहे. राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात काय परिस्थिती? पाहा एका क्लिकवर...   

Maharashtra Rain Live Updates : कोल्हापूरातील राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले

Maharashtra Rain Live Updates : महाराष्ट्रात पावसानं चांगलाच जोर धरलेला असताना शुक्रवारपर्यंत हे चित्र कायम राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. असं असतानाच तिथं कोल्हापुरातून राधानगरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळं प्रशासन आणि यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. 

तिथं कोकणासह सातारा आणि पुण्यातील काही भागांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत मात्र पावसाचा जोर अंशत: ओसरेल असा अंदाज आहे. तिथं अहमदनगर शहराबरोबरच जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पावसाला सुरुवात आहे. मागील आठ दिवसापासून ढगाळ वातावरण होतं मात्र पाऊस पडत नव्हता मात्र आज दुपारपासूनच पावसाची संततधार सुरू झाली आहे जून महिन्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेक भागात खरिपाची पेरणी झाली नाही तर काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट ओढावलं होतं मात्र आता सर्व दूर पाऊस होत असल्याने पिकांना जीवदान मिळालं आहे. 

26 Jul 2023, 10:36 वाजता

Maharashtra Weather Rain Live Updates : मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण भरून वाहु लागले आहे. धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून त्यातून 1100 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने तानसा धरणाखालील आणि नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वाडा आणि वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा याअगोदरच देण्यात आला आहे. धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी नदी पात्रातून जाताना काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.