Maratha Reservation LIVE: आरक्षण मिळाल्याशिवाय पाण्याला हात लावणार नाही; मनोज जरांगे यांचा निर्धार

Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु असणारी शक्तिप्रदर्शनं आता आणखी ज्वलंत झाली असून, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे.   

Maratha Reservation LIVE: आरक्षण मिळाल्याशिवाय पाण्याला हात लावणार नाही; मनोज जरांगे यांचा निर्धार

Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शासनानं निर्णय घेतला नाही तर, आपण बुधवारपासून पाणीही पिणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण द्यावं, शासनानं काहीही करावं पण, आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा. असं न केल्यास आपण पाण्याचा थेंबही घेणार नसून होणाऱ्या परिणामांना शासनच जबाबदार असेल असं ते म्हणाले. 

1 Nov 2023, 10:51 वाजता

Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आता आमदारांनी सहभाग घेतला आहे. एकीकडे जरांगे पाटील यांनी विशेष अधिवेशनाची मागणी केलेली असताना दुसरीकडे आमदारांनीच मंत्रालयाला टाळं ठोकलं आहे. मंत्रालयाबाहेर आमदारांनी आंदोलन सुरु केलं आहे.

1 Nov 2023, 10:39 वाजता

Maratha Reservation LIVE: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाची सुरक्षा वाढविली

कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी आमदार नीवासासमोर आज सकाळी फोडण्यात आली. त्यानंतर मंत्रालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथक,राज्य राखीव पोलीस दल,मुंबई पोलिस त्याच बरोबर साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आले आहे.वरिष्ठ पोलीस अधिकारीही निषेध लक्ष ठेऊन आहे.

1 Nov 2023, 10:19 वाजता

1 Nov 2023, 09:43 वाजता

Maratha Reservation LIVE: तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई नको, मी सुखरुप आहे. चिंता नसावी. आमदार निवासात उभी असणारी कार फोडली, त्यावेळी कारमध्ये कोणीही नव्हतं. मी सुरुवातीपासूनच मराठा समाजासोबत होतो आणि यापुढंही राहीन अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. शिवाय मराठा समाजाच्या आंदोलनाला अशा घटनांमुळे गालबोट लागतंय असंही सूचक वक्तव्य त्यांनी केलं. 

 

1 Nov 2023, 09:42 वाजता

Maratha Reservation LIVE: आकाशवाणीजवळ  या ठिकाणी हसनमुश्रीफ यांची गाड्यांची तोडफोड केल्यानंतर मुंबईतल्या विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे . 

 

1 Nov 2023, 09:40 वाजता

Maratha Reservation LIVE: बीडमधील संचारबंदी मागे घेवून जमावबंदी लागू केल्याने आता इथं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येवू लागले आहे. परंतु इंटरनेट सुविधा अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी 

 

1 Nov 2023, 09:06 वाजता

Maratha Reservation LIVE: आकाशवाणी आमदार निवासाजवळ मराठा आंदोलकांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. फोडलेल्या गाड्या मरिन लाईन्स पोलीस स्टेशनकडे रवाना करण्यात आल्या आहेत. या गाड्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या असल्याची माहिती समोर आली आहे.

1 Nov 2023, 08:58 वाजता

Maratha Reservation LIVE:  मावळ मध्ये आता जरांगे पाटील यांना वाढता पाठिंबा दिसून येत आहे. मावळ मधील नागाथली गावात देखील संध्याकाळी मशाल आणि कॅडल मोर्चा काढण्यात आला. यावेळी गावातील लहान मुलांसह महिला आणि वृद्ध यांनी देखील मोठा सहभाग घेतला. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी आता मावळ मधील गावागावांत मशाल मोर्चे निघू लागले आहेत.

1 Nov 2023, 08:07 वाजता

Maratha Reservation LIVE: कसे मिळणार कुणबी प्रमाण? पाहा... 

कुणबीप्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे

  • कुणबी प्रमाणपत्र देताना १९६७ पूर्वीचे महसुली पुरावे ग्राह्य.
  • गाव नमुना क्रमांक १४मध्ये जन्म-मृत्यूची नोंद आढळून येते.
  • एखाद्याचा जन्म किंवा मृत्यू कुणबी म्हणून नोंद असेल, तर त्यांनाच प्रमाणपत्र.
  • शाळा सोडल्याचा दाखला; तसेच जुन्या फेरफारमधील नोंदीत एका कुणब्याने दुसऱ्या कुणब्याला जमीन विक्री केल्याचा उल्लेख असल्यास प्रमाणपत्र.
  • सातबारा उताऱ्यात उतरंडीनुसार कुणबी वंशावळ असल्यासही मिळणार प्रमाणपत्र.

 

1 Nov 2023, 08:00 वाजता