Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शासनानं निर्णय घेतला नाही तर, आपण बुधवारपासून पाणीही पिणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण द्यावं, शासनानं काहीही करावं पण, आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा. असं न केल्यास आपण पाण्याचा थेंबही घेणार नसून होणाऱ्या परिणामांना शासनच जबाबदार असेल असं ते म्हणाले.
1 Nov 2023, 07:59 वाजता
Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आज पुणे मार्केट यार्ड बंद
मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आज पुण्याच्या मार्केट यार्डातील भाजीपाला बाजार, फुल बाजार तसेच फळ बाजार बंद आहे. त्याचप्रमाणे महात्मा फुले मंडईत देखील बंद पाळण्यात येत आहे. मार्केट यार्ड मधील व्यापारी तसेच आडतदारांनी हा बंद पुकारला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला विविध माध्यमातून पाठिंबा मिळत आहे. पुण्यातील शेतमाल व्यापारी तसेच शेतकरी देखील त्यात सहभागी झाले आहेत.
1 Nov 2023, 07:59 वाजता
Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणासाठी पुणे नगर महामार्गावर कँडल मार्च मोर्चा
मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या सणसवाडी येथे मराठा बांधवांनी कॅण्डल मार्च मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशाराही यावेळी मराठा बांधवांनी सरकारला दिला.
1 Nov 2023, 07:56 वाजता
Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणासाठी थाळी वाजवत आंदोलन करत सरकारचा निषेध
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी ग्रामस्थांनी मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने अनोख्या पध्दतीने आंदोलन करत सरकारचा निषेध केला ,कोरोणा काळात पंतप्रधानांनी गो कोरोणा गो ह्या साठी थाळी बजाव उपक्रम राबविला होता त्याच अनुषंगाने गावडेवाडी येथील ग्रामस्थांनी थाली बजाव सरकार हटाव अशा घोषणा देत गावांमध्ये थाळी वाजवत महिलांनी आरक्षणाची मागणी केली.
1 Nov 2023, 07:27 वाजता
Maratha Reservation LIVE: सर्वपक्षीय बैठकीत ठाकरे गटाला वगळल्यानं वाद निर्माण झालाय. सर्वपक्षीय बैठकीचं शिवसेना ठाकरे गटाला निमंत्रण मिळालेलं नसल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. एक आमदार असलेल्यांना निमंत्रण, पण शिवसेनेला नाही अशी टीका राऊतांनी केलीय.
1 Nov 2023, 07:22 वाजता
Maratha Reservation LIVE: कुणबी पुरावे असलेल्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठीचा राज्य सरकारकडून जीआर. मंत्रिमंडळ बैठकीत न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल.
1 Nov 2023, 07:12 वाजता
Maratha Reservation LIVE: राज्य सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने आज सर्व पक्षीय बैठक बोलावलीये. सकाळी साडे दहा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर होणा-या या बैठकीला शरद पवार हजर राहणार आहेत.
1 Nov 2023, 06:54 वाजता
Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शासनानं निर्णय घेतला नाही तर, आपण बुधवारपासून पाणीही पिणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण द्यावं, शासनानं काहीही करावं पण, आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा. असं न केल्यास आपण पाण्याचा थेंबही घेणार नसून होणाऱ्या परिणामांना शासनच जबाबदार असेल असं ते म्हणाले.
1 Nov 2023, 06:54 वाजता
Maratha Reservation LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत बोलवलेल्या सर्व पक्षीय बैठकीत आरक्षणाबाबत विविध पक्षांची आरक्षणाबाबत मतं जाणून घेतली जाणार आहेत.
1 Nov 2023, 06:53 वाजता
Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु असणारी शक्तिप्रदर्शनं आता आणखी ज्वलंत झाली असून, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे.