भिवंडी : या मतदारसंघातून काँग्रेसने माजी खासदार सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे. पण पक्षातूनच त्यांना विरोध होत आहे. ४२ नगरसेवकांनी त्यांना विरोध केला. सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनीही अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. २९ एप्रिलला येथे निवडणूक होणार आहे. भाजपकडून पुन्हा कपिल पाटील हेच निवडणुकीच्या रिंगणात असतील. पण शिवसेनेने कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने नाराजी दर्शवली आहे. कपिल पाटील यांना यामुळे निवडणुक कठीण जाऊ शकते.
२०१४ मध्ये भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील हे विजयी झाले होते. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे विश्वनाथ पाटील यांचा पराभव झाला होता. मोदी लाटेत कपिल पाटील यांना जवळपास १ लाख १० हजार मतांनी विजय झाला होता.
उमेदवार |
पक्ष |
मतदान |
कपिल पाटील | भाजप | 411070 |
विश्वनाथ पाटील | काँग्रेस | 301620 |
सुरेश म्हात्रे | मनसे | 93647 |
अन्सारी मुमताज अब्दुल सत्तार | बसपा | 14068 |
मधुकर पाटील | कम्युनिस्ट पक्ष | 13720 |